Skip to main content

विशाल हलवले यांचा जनसंपर्क चांगला असल्याने मोहपुर गटात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु असुन लोंकाच्या आग्रहास्तव मोहपुर येथुन निवडणुक ताकतीने लढणार



 किनवट प्रतिनिधी:-

 नव्याने निर्माण झालेल्या मोहपूर जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून गतवेळी शिवसेनेकडून मांडवी गणातून निर्णायक मतदान घेणारे अंबाडी येथील तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले यांनी आता जिल्हा परिषदेसाठी दंड  थोपटले असून  मोहपूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकआग्रहास्तव मी ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले


  नांदेड जिल्हा परिषदेची गट व गणनिहाय प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून किनवट तालुक्यात मोहपूर या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे या  गटात अंबाडी गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे आतापासूनच राजकीय हालचाली वाढल्या असून प्रमुख पक्षांसह जुने व नवीन चेहरे निवडणुकीचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत यात प्रामुख्याने गतवेळी शिवसेनेकडूनकडून मांडवी गणातून निवडणूक लढवलेले तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले  यांच्या नावाची आता जिल्हा परिषदेसाठी चर्चा  सुरू झाली असून त्यांच्यासाठी आंबाडी व परिसरातील असंख्य कार्यकर्ते आतापासूनच गावभेटी घेऊन वातावरण निर्मिती करण्यावर भर देत आहेत गेल्यावेळी  हलवले यांनी अठराशे च्या आसपास मतदान घेऊन मांडवी गटात खळबळ उडवून दिली होती या भागातील आदिवासी, बंजारा, दलित व मुस्लिम समाजात त्यांचा दांडगा संपर्क असून गोरगरीब, शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात युवा नेते विशाल हलवले यांनी आता नव्याने अस्तित्वात आलेल्या मोहपूर गटासाठी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असून त्यांच्या उमेदवारीला जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे  नव्या गटातील  एक निष्पक्ष निष्कलंक नवाचेहरा म्हणून  विशाल हलवले यांच्याकडे पाहिले जात आहे त्यांच्या पाठीमागे असलेली युवा कार्यकर्त्यांची फळी व या भागातील मतदारांचा पाठिंबा लक्षात घेता हलवले यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे दरम्यान या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले की मी गेल्या दहा वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करत आलो मोहपूर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाग्रहास्तव मी  निवडणूक लढण्यास इच्छुक आहे सध्या मी कोणत्याही पक्षात नसलो तरी लोकांसाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या भागातील मतदारांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे ही निवडणूक एखादया पक्षाकडून   लढवायची की अपक्ष लढवायची याचा निर्णय आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते व मतदारांना विचारपूस करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

 निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच इच्छुकांच्या दाव्याला महत्त्व येणार असले तरी   एखाद्या प्रमुख पक्षाकडून  हलवले यांना उमेदवारी मिळाल्यास या गटात चुरसीची लढत पहावयास मिळणार आहे हे मात्र नक्की!

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.