Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे व महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित



अकलूज (सोलापूर) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने उत्कृष्ट सेवा पुरस्कार सोहळा, पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या हस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार तर लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील यांना उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लहुकुमार शिंदे यांनी २००३ पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली असून, २००४ मध्ये महाराजकारण या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. 


त्यांना नेहरू युवा पुरस्कार, राजाभाऊ महाळंगी विशेष प्रतिनिधी म्हणून निवड, स्नेहल संस्कृतीक प्रतिष्ठान पुणेचा कविवर्य सन्मान, अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबई उत्कृष्ट नवकवी सन्मान,१४ वे अखिल भारतीय परिषदेचा पुरस्कार, २००८ मध्ये वेदना साहित्य संग्रह प्रकाशित २००९ मध्ये समाजसेवेसाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून निवड, कै. ॲड. देविदास जमदाडे प्रबोधन व विचारमंच राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य पुरस्कार, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक संस्था व माता रमाई फाउंडेशन बोट मोगरा मुखेडचा जीवन गौरव पुरस्कार, राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था समाजरत्न पत्रकार पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिंदे यांनी तू ही मेरी जान या हिंदी चित्रपटात पंडितजीची उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. २०१२ पासून सुवर्णयुग या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट संपादक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भगवानराव पाटील या साप्ताहिक पुरोगामी विचाराचा विकास व विकास दर्पण या यूट्यूब चॅनलच्या मुख्य संपादिका म्हणून कार्य करीत आहेत.

त्यांना दिल्लीचा नॅशनल पुरस्कार, ( मराठवाड्याची वन कन्या ) पर्यावरणचा पुरस्कार, कोल्हापूरी बाणा पुरस्कार, महात्मा जोतिबा फुले शिक्षक परिषदेकडून राज्यस्तरीय नारीरत्न नागरी पुरस्कार, जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूरकडून क्रांतिज्योती पुरस्कार, संकल्प भारत मंचच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, उपाध्यक्ष नाथा सावंत, करमाळा तालुका सचिव अक्षय वरकड, सहसचिव हर्षवर्धन गाडे, सांगोला तालुका अध्यक्ष प्रवीण सावंत, सातारा जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे-पाटील, संपादक भाग्यवंत नायकूडे, नानासाहेब नाईकनवरे, रजनी साळवे, दादा साळवे, अतुल मदने, मयूर भोरे, सागर वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, निकम वाघमारे, दिनेश बंडगर, विश्वजीत जाधव, दत्तात्रय नाईकनवरे, संतोष अडगळे, रवी ढोबळे, इस्माईल पठाण, सुनील चेळेकर यांचेसह सोलापूर, लातूर सातारा, पुणे जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, शशिकांत कडबाने, नौशाद मुलानी व गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...