किनवट:-
बराच काळ प्रतीक्षा करायला लावल्यानंतर अखेर शनिवारी किनवट शहर आणि ग्रामिण परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे बऱ्याच दिवसा पासुन उकाड्याने त्रस्त असलेल्या किनवटकरांना दिलासा मिळाला ऐवढेच नाहीतर पहिल्याच पावसात भिजण्याचा आंनद अनेकांनी घेतला.
दुपारी साडे चार ते८:३० पर्यंत पाऊस सुरू होता .
जूनचा पहिला आठवडा उलटूनही शहरात ढगाळ हवामान होते;पण पावसाने हुलकावणीच दिली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत ऊन आणि ढगाळ हवा असा खेळ सुरू असतानाच, चारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शहराच्या बहुतेक सर्वच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी पडल्या. या जोराच्या पावसामुळे शहरात नेहमी निर्माण होणाऱ्या समस्यांनी लगेच डोके वर काढले रस्ते नवीन पुल चिखलमय झाले.
शहरात शुक्रवारी दुपारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे विविध भागांत बत्ती गुल झाली होती त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागला.
Comments
Post a Comment