Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कारावास - संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे..... प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची माणगाव व महाड तालुका कार्यकारिणी जाहीर

माणगाव (रायगड) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाची माणगाव व महाड तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकार संरक्षण कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी, रायगड जिल्हा संघाटक प्रसाद गोरेगावकर, कोकण युवा संपर्क प्रमुख  सागर पवार, माणगाव तालुका अध्यक्ष रिजवान मुकादम, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे, महिला अध्यक्षा रेश्मा माने, अभिजित ढाणीपकर, राकेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून डी. टी. आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर हल्ला केल्यास, हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करील किंवा करण्याचा प्रयत्न करील, हिंसा करण्यास अपप्रेरणा, चिथावणी किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा होईल तसेच पत्रकारांच्या मालमत्तेचे नुकसान केल्यास सदर व्यक्तीने वैद्यकीय खर्च आणि नुकसानभरपाई दिली नसेल तर ती रक्कम जणू काही ती जमीन महसुलाची थ

पर्यावरण संवर्धनासाठी किनवट येथे भव्य मॅरेथॉन

पर्यावरण संवर्धनासाठी किनवट येथे भव्य मॅरेथॉन ✍🏻 राजेश पाटील प्रतिनिधी किनवट:- किनवट नगर  परिषद तर्फे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्लास्टीक मुक्त किनवट शहर  व वृक्ष पर्यावरण  सर्वंधन राखण्यासाठी किनवट शहरात आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हिरवी झेंडी दाखवली या प्रसंगी कॉस्मापाॅलिटन विद्यालयाचे  बाळकृष्ण कदम यांनी पर्यावरण सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांना शपथ दिली यावेळी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, दिनकर चाडावार, माजी नप उपाध्यक्ष नगर सेवक श्रीनिवास नेम्मानिवार, माजी नप अध्यक्ष साजिद खान, अभय महाजन, विजय जोशी, राजु पिलेवार ,स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे,गणराज गायकवाड, राहुल सोमवार, काकडे सर सोनटक्के सर ,देशमुख मॅडम ,पोले सर संदीप येशिमोड , सर्व नगर परिषद कर्मचारी स्टाफ राठोड सर व शालेय विद्यार्थी , शोटोकॉन डो अकॅडमीचे विद्यार्थी , सौ. लक्ष्मीबाई यशीमोड संस्थेचे विद्यार्थी आदी विद्

किनवट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

✍🏻राजेश पाटील किनवट शहर वृत्तान्त:- किनवट शहरात अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अस्तित्वात आहे परंतु या पुतळ्याच्या सभोवताली अति प्रमाणात अतिक्रमण वाढले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे किनवट येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 27 मार्च 2022 रोजी अत्यंत महत्वपूर्ण  बैठक जेष्ठ आंबेडकरी नेते दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले  या बैठकीस भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार,  प्रदेशाध्यक्ष ,माजी नगराध्यक्ष तथा बौद्ध मंगल परिणय मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष  अरुण आळणे,भारिप बहुजन महासंघाचे सुरेश जाधव, प्रा.रवीकांत सर्पे,सामाजिक कार्यकर्ते मारोती मुनेश्वर,एडवोकेट जीएस रायबोळे,नाभिक समाज विकास महासंघाचे विजय पोलसवार आदीवासी विद्यार्थी कृती समितीचे विकास कुडमते,माधव कावळे,ऍड सुनील येरेकार, सुरेश कावळे,राजेश पाटील,प्रविण गायकवाड,संतोष शिसले,विशाल हलवले,विशाल गिमेकार,दत्ता कसबे, दिनेश लढे अं

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे शानदार उद्घाटन पत्रकारांनी संघटित लढा देण्याची गरज-राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे नुकतेच साकोली येथे शानदार उद्घाटन पार पडले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखडे उपस्थित होते.   याप्रसंगी संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की, 'पत्रकारावर अन्याय होत असेल तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज आहे तसेच पत्रकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकारांनी एकत्रित येऊन लढा उभारावा असेही आवाहन केले. राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रगतीपथावर असून पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन अध्यक्षस्थानावरून त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले. तर आभार मनीषा काशीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्व

किनवट चे पत्रकार आनंद भालेराव यांचा जिल्हाअध्यक्ष नागेलीकर यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षप्रवेश

  डिजिटल सदस्य नोदणी जास्तीत जास्त करण्याचे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांना केले अवाहन किनवट/प्रतिनिधी:     आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव  शिंदे पाटील नागेलीकर यांच्या हस्ते तसेच किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,राजेंद्र केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार आनंद भालेराव यांचा भाजपातून काँग्रेस पक्षात प्रवेश  झाला.        राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून या निमित्य जिल्हाअध्यक्षा चा अध्यक्षतेखाली माहूर येथील कपीलेश्वर धर्मशाळेत पदाधिकारी व कार्यकर्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.   याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष नागेलिकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री व पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेशअध्यक्ष  नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील नांदेड जिल्ह्यातील  डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सुरु असून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून नांदेड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान केले. या प्रसंगी का

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारिणी जाहीर

  देगलूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशान्वये, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारिणी अशी :  सुनील मदनुरे देगलूर तालुका अध्यक्ष, चंद्रकांत गज्जलवार  तालुका उपाध्यक्ष, संतोष मंनधरणे तालुका सचिव, ईश्वर देशमुख तालुका कोषाध्यक्ष, मनोज बिरादार तालुका संघटक, एकनाथ गाडीवान तालुका सह सचिव, दादाराव बेळीकर तालुका सह-कोषाध्यक्ष, उमाकांत कोकणे देगलूर शहर अध्यक्ष, मलिकार्जुन कडलवार शहर उपाध्यक्ष, अमित पाटील शहर सचिव आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. येत्या काळात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याच्या वतीने पत्रकार व त्यांचे कुटुंब, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये खूप कार्य करणार असल्याचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांनी यावेळी सांगितले. देगलूर तालुका कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त

सेवार्थ फौंडेशन तर्फे बौधिक खेळाचे घोटी येथे आयोजन

घोटी बातमीदार:  सेवार्थ फाऊंडेशन तर्फे आज शैक्षणिक संध्या या उपक्रमामध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थांसाठी बौद्धिक खेळ घेण्यात आले.  यावेळी मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील सर तसेच विष्णू मूनेश्वर सर सेवार्थ फाऊंडेशन तर्फे ऋषीकेश लढे, तेजस पाटील, प्रसेनजित कयापाक, ऋषिकेश शेंडे, रणजित पाटील, प्रीतेश पाटील, आशिष शेंडे, सुनील वाढे, अनिकेत कयापाक, व गावातील नागरिक उपस्थित होते...

विद्यार्थ्याच्या गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन

किनवट वृत्तांत:/  सेवार्थ फाऊंडेशन कडून नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी तालुक्यातील घोटी या गावी चालत असलेल्या शैक्षणिक संध्या या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 6-3-2022 रोज रविवारी विद्यार्थांसाठी संगीत खुर्ची चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सेवार्थ फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या या नावाने उपक्रम राबवत असून दर रविवारी हा उपक्रम घेण्यात येतो. या उपक्रमा अंतर्गत भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला, खेळ असे कार्यक्रम घेत असून या रविवारी खेळामधील एक खेळ म्हणजे संगीत खुर्ची ही स्पर्धा या रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील सर तसेच विष्णू मूनेश्वर सर सेवार्थ फाऊंडेशन तर्फे ऋषीकेश लढे, तेजस पाटील, प्रसेनजित कयापाक, ऋषिकेश शेंडे, रणजित पाटील, प्रीतेश पाटील, आशिष शेंडे, सुनील वाढे, अनिकेत कयापाक, व गावातील नागरिक उपस्थित होते...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ठाणे, कल्याण :  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट महा मेडिकल कॅम्प कल्याण येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उपाध्यक्ष डॉ. वाघ यांनी सदर शिबिराचे आयोजन केले होते.  सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्याचा लाभ मिळावा व त्यांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये जापानीज मशीनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी, पथोलॉजी लॅब तर्फे रक्ततपासणी, दंतरोग तज्ञ डॉक्टर बोराडे यांच्याकडून दातांची तपासणी व टेक्निशियन प्रकाश वाघ यांनी डोळ्यांची तपासणी केली. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी एस वाघ, उपाध्यक्ष डॉक्टर सुरज चौधरी, डॉक्टर महाजन सर, सविता वाघ,  श्री युवराज खैरनार, डॉक्टर ललित बोराडे, श्री प्रकाश वाघ, योगेश पाटील, कु पूजा वाघ, शर्मिला गायकवाड तसेच पॅरामेडिकलचे सर्व विद्यार्थी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षकपदी निवड झाल्या बद्दल सुप्रिया सुरेंद्र राठोड यांचा सत्कार

  ता. प्र. किनवट:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन राज्यात तिसऱ्या क्रंमाकावर येऊन पोलिस उपनरीक्षक (PSI) पदी सुप्रिया सुरेंद्र राठोड यांची निवड झाल्या बद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियनच्या तालुका अध्यक्षा  व  ह्यूमन राइट्स फेडरेशनच्या परवीन शेख यांच्या तर्फे सुप्रिया राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन व लाडु चारवुन अभिनंदन करण्यात आले या वेळी तिचे वडील सुरेंद्र राठोड, सुप्रिया यांची आई ,भाऊ सुशील राठोड, अजय , शुभम, सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर सलीम चाऊस आदींनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा पुर्ण नावाचा उल्लेख करण्याची कार्यवाही करावी - लक्ष्मीकांत मुंडे

   किनवट प्रतिनिधी:- भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी किनवट मुख्याधिकरी व नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांना निवेदन दिले  छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रासाठी व अठरा पगड जातीसाठी केलेले कार्य स्वराज्य उभारणीचे कार्य,व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातुन देश उभारणीचे केलेले काम यांचा आदर्श घेऊन त्यांचा गौरव म्हणुन दुकानाच्या पाट्यावर एकेरी नावाचा उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा पाट्या लावण्याची कार्यवाही मुख्याधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अभिनेता दिग्दर्शक पत्रकर  यांनी दिले आहे .

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची विविध विषयांवर बैठक

✍🏻राजेश पाटील किनवट प्रतिनिधी:- प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डि.टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस सेवा संघाची विविध विषयावर बैठक घेण्यात आली . या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान स्मारक, किनवट मधुन चाललेला  राष्ट्रीय महामार्गाची परीपत्रकानुसार बांधकाम होत आहे का? किनवट येथील नप च्या हद्दीतील पथदिवे बंद अवस्थेत आहेत त्याची चर्चा तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी काही उपक्रम घेण्यात येईल का? रमजान ईद निमित् अनाथ लोंकाना मदत करता येईल का ? वाढीव पाणी पुरवठा योजना कशा प्रकारे सुरु आहे लोकांना काय मदत करता येईल अशा विविध विषयांवर आज कि न्युज या वृत्त कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी प्रेस सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अशिष शेळके, उपाध्यक्ष राजेश पाटील,शेख अतीफ, ,सचिव नसीर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम, तालुका सदस्य बापुराव वावळे आदी उपस्थित होते.

टिपू सुलतान ब्रिगेडची राज्यस्तरीय बैठक औरंगाबाद येथे संपन्न

  तालुका प्रतिनिधी /सय्यद नदीम टिपू सुलतान ब्रिगेडची राज्यस्तरीय बैठक आज औरंगाबाद येथील शासकीय विश्रामगृहात प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश संघटक डाॅ. नदीम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.  सर्वप्रथम या बैठकीचे आयोजक औरंगाबाद  जिल्हाध्यक्ष मुबीन पठाण यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले. बैठकीचे प्रास्ताविक जालना जिल्हाध्यक्ष सय्यद करीम बिल्डर यांनी केले. या बैठकीत सय्यद नदीम, इनामदार जकरीया, जावेद खान, फयाज पठाण, फेरोज पटेल, जाबेर पटेल, सलाम कुरेशी, मोहम्मद अवेस, इमरान बिल्डर, अरबाज बेग, सय्यद लईख  यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत राज्यस्तरीय कार्यकारिणी गठित करणे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यात टिपू सुलतान ब्रिगेडची शाखा स्थापित करणे, संघटनेची विचारधारा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचविणे इ. विषयांवर चर्चा करण्यात आली.  राज्य कार्यकारिणीच्या सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व जिल्हाध्यक्षांना प्रद

आरोग्य विभाग व पोलिस विभागात निवड झाल्या बद्दल२ विद्यार्थ्यांचा राईज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्रां तर्फे सत्कार

किनवट प्रतिनिधी:- दि.११ मार्च:- चेतन राठोड आरोग्य विभाग ठाणे व रोहीत राठोड  मुंबई पोलीस या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आरोग्य व पोलिस विभागात   निवड झाल्याबद्दल राईज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गोकुंदा तालुका किनवट वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी राईज अकॅडमीचे संचालक लक्ष्मीकांत कापसे , प्रा. भीमराव घुले किशोर जाधव,राम तिळेवाड,रामेश्वर नेवारे,गजानन बोके,मयुर देशमुख आदी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पालघर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली व पालघर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांच्या मार्गदर्शनानुसार पालघर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्हा कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अमेय पिंपळे, जिल्हा समन्वयक श्री.अतुल वझे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष कोरे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र सावे, जिल्हा सरचिटणीस श्री. मुकेश सिंह, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री.परेश संखे, जिल्हा सहसचिव श्री.संजोग संखे, पालघर तालुका महिलाध्यक्षा सौ.उज्वला जगताप यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबवून पत्रकार व सामान्य कुटुंबांना मदत केली आहे. सन २०२२-२३ मध्ये  पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवणे, सामान्य कुटुंबांना मदत करणे, वृक्षारोपण, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे य

स्त्रीयात्त्वाची साखळी .....सुप्रसिध्द लेखीका रुचीरा बेटकर यांचा जागतिक महिला दिनानिमित्त वाचनीय लेख

ती एक नैसर्गीक प्राकृती... हलती, बोलती, चालती आकृती म्हणजे स्त्री... पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारी अनेक निर्बंध सहन करणारी स्त्री होती.  पण जसजसे जग आधुनिक होत गेले तसे तसे स्त्रियासुद्धा या आधुनिक विचारांच्या होत गेल्या.  आजची स्त्री महिला ज्या उच्चपदावर कार्य करीत  आहेत त्यानुषंगाने घरातील बंधने त्यांच्या वरील सेल होताना दिसत आहेत .   आज पुरुषा पेक्षा स्त्रिया ह्या  मोठा पदावर कार्यरत असून ..जे कार्य पुरुष करीत आहेत व त्यांची मक्तेदारी दाखवत आहेत. त्याच क्षेत्रामध्ये महिलां कंबर कसून  कार्यरत आहेत.उदा: संरक्षणक्षण क्षेत्र, विमान वाहतूक, रेल्वे चालक, स्पेस, अनेक अवघड समजली जाणारी क्षेत्र व शेती,ग्रहउद्योग अशी क्षेत्र आज महिलांनीकाबिज केली आहेत. व त्यात स्त्रिया अतुलनीय अशी प्रगती ही करीत आहे.  आजच्या घडीला पाहता महिला व मुली या शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीयां वरती अनेक बंधने होती त्या शाळेत जात नव्हत्या किंवा शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या वर बंद होती.  परंतु आजचे चित्र बदलले आहे.  भारतात आज 80 टक्के स्त्रिया हा स्वातंत्र्

स्वर देवतेची स्वरयात्रा विसावली...

  ग्रीष्म ऋतूतील ती संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला गेले होते. तरीपण सूर्यदेवाच्या उष्णतेची दाहकता अजून जाणवत होती. मात्र एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. सभा संपत आली तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकाग्रहाखातर दीदींनी सूर लावला, कोणतेही वादय साथीला नसताना ‘मोगरा फुलला’ हा अभंग लतादीदी गाऊ लागल्या नि वातावरणातील दाहकता अचानक लुप्त झाली. सर्वत्र प्रसन्न समाधानी वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. हे सामर्थ्य असलेल्याला कलावती लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात होत्या. आपल्या सुरेल गळ्यातून अक्षरश: हजारो हिंदी-मराठी गाणी गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. गेली सहा दशकं, म्हणजे रसिकांच्या तीन पिढय़ा त्यांची सुमधुर हिंदी-मराठी चित्रपट गीतं ऐकत मोठय़ा झाल्या.  त्यांनी 980 पेक्षाही अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली याशिवाय इतर 20 प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली.  लता दीदींचा जन्म 280सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. फार कमी लोकांना माहीत असेल की, त्यांचं पाळण्यातलं नाव `हृदया' ह

डॉ. आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी फुले शाहु आंबेडकरी संघटना आक्रमक

  किनवट,दि.८ : शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून परिसराचे सुशोभिकरण करावे अन्यथा पंधरा दिवसानंतर समस्त आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने  आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे आज(ता.८) देण्यात आला आहे.      निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील मुख्य मार्गावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. परंतु, मागील अनेक वर्षापासून या पुतळ्याचे सुशोभीकरण केले नसल्याने पुतळ्यासह परिसराची अवस्था बिकट बनली आहे. पुतळ्याच्या सभोवताली अतिक्रमण वाढले असून आवाराच्या भिंतीला तसेच पुतळ्याच्या पायथ्याला भेगा पडल्या आहेत.आंबेडकर अनुयायी दरवर्षी अशाच अवस्थेत या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसराचे सुशोभीकरण करावे यासाठी आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर नगरपरिषदेने नवीन पुतळा उभारणी संदर्भात सभागृहात ठराव पास केला, मात्र, ठरावाच्या अनुषंगाने कित्येक वर्षे लोटली, तरी कार्यवाही झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा न

छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा

  किनवट (तालुका प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा जागेत बदल केल्यास आमरण उपोषणास बसण्यात येणार.या विषयाला अनुषंगिक निवेदन आज रोजी मुख्य कार्यकारी अधकारी याना सामाजिक व राजकीय संघटनाच्या पदाधिकाऱ्याने एकत्रित रित्या दिले.सदरील निवेदनात वरिल विषयास अनुसरुण आपणास निवेदन देण्यात येते आहे की, किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा जिर्ण करुण नविन पुतळा बसविण्याची प्रक्रिया आपल्या नगर परिषद प्रशासना तर्फे सुरु असल्याची माहीती प्राप्त आहे. तरी नगर परिषद प्रशासानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा जुन्या जागेवर चौकातच बसविण्यात यावा. जर राजकिय दबावास घाबरुण ईतरत्र न.प. च्या प्रांगणात बसविण्याचा प्रयत्न झाल्यास आमचा त्या प्रक्रियेस विरोध होऊन न.प. प्रशासानाच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्यात येईल त्या वेळेस सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अशी जनसामान्यांची ईच्छा आहे हे मात्र खरे.. सदर निवेदनावर जयवंत चव्हाण, अजय कदम पाटील, अशितोष बेंद्रे, सारंग पवार, निकेतन सूरोशे, शिवा पवार, राजू कदम

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व लक्ष्मीबाई यशीमोड सेवाभावी संस्था आयोजित पहिल्या आंतरराज्य कराटे स्पर्धेचे आयोजन

किनवट:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व किनवट येथील लक्ष्मीबाई यशीमोड सेवाभावी संस्था किनवटच्या संयुक्त विद्यमाने दिनांक  ५ व ६  रोजी किनवट येथील क्रिडा संकुल साई मंदिर येथील परिसरात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन मा. सहायक जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून किनवट- माहुरचे आमदार भीमराव केराम, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार उपविभागिय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलिस निरीक्षक अभिमन्यु सांळुळे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुन, सहायक प्रकल्प अधिकारी ( शिक्षण) मनोज टिळे, उत्तम कानिंदे समन्वयक मानव विकास किनवट नियोजन अधिकारी शंकर साबरे, लेखाधिकारी दमकोंडावार  उपस्थित राहणार आहेत तसेच  स्पर्धेसाठी राज्य व जिल्हाभरातुन कराटे प्रशिक्षण घेतलेले विविध कराटे अकॅडमी चे विद्यार्थी सहभागी होत आहेत. याचा लाभ सर्व क्रिडा प्रेमीनी घ्यावा असे आवाहन पहीली अंतर राज्य करारे स्पर्धेचे आयोजक  लक्ष्मीबाई यशीमोड संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष संदीप यशीमोड यांनी केले आहे

चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता म्हाणजे" व्यक्त अव्यक्त" कवितासंग्रह....

      नांदेड :दि :         अंतर्मनातून आलेले शब्द कवितेच्या प्रांतात आपली नवी ओळख निर्माण करतात.तसेच  चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता हीच साहित्याची खरी ओळख असते.कवी जनक यांची कविता आणि त्यांचे शब्द नवी ओळख निर्माण करणारे असल्याचे  प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत देवीदास फुलारी यांनी केले.    हाळदा गावचे भूमिपुत्र आणि नवोदित कवी जनक जगदीश कुलकर्णी यांच्या "व्यक्त -अव्यक्त"या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नांदेड येथील ताज पाटील च्या सभागृहात संपन्न झाले.त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते बोलत होते.          कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंधार -लोहा विधानसभेचे आमदार आणि हाळदा गावचे भूमिपुत्र श्यामसुंदर शिंदे,समाजसेविका सौ. आशाताई शिंदे,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्रमुख,विचारवंत प्रा.डॉ. दिलीप चव्हाण, लेखक,कवी आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी,राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि कवी शिवा कांबळे,साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे,रोहित शिंदे, जेष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर,  भार्गव राजे, राष्ट्रपती