Skip to main content

चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता म्हाणजे" व्यक्त अव्यक्त" कवितासंग्रह....


      नांदेड :दि :

        अंतर्मनातून आलेले शब्द कवितेच्या प्रांतात आपली नवी ओळख निर्माण करतात.तसेच

 चिंतनाच्या पातळीवर परिपूर्ण असलेली कविता हीच साहित्याची खरी ओळख असते.कवी जनक यांची कविता आणि त्यांचे शब्द नवी ओळख निर्माण करणारे असल्याचे  प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत देवीदास फुलारी यांनी केले.

   हाळदा गावचे भूमिपुत्र आणि नवोदित कवी जनक जगदीश कुलकर्णी यांच्या "व्यक्त -अव्यक्त"या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नांदेड येथील ताज पाटील च्या सभागृहात संपन्न झाले.त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते बोलत होते.

         कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंधार -लोहा विधानसभेचे आमदार आणि हाळदा गावचे भूमिपुत्र श्यामसुंदर शिंदे,समाजसेविका सौ. आशाताई शिंदे,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्रमुख,विचारवंत प्रा.डॉ. दिलीप चव्हाण, लेखक,कवी आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी,राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि कवी शिवा कांबळे,साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे,रोहित शिंदे, जेष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर,  भार्गव राजे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, संभाजी आलेवाड,  वैजनाथ हंगरगे, उर्दु घराचे व्यवस्थापक प्राचार्य सुजात अली, प्राचार्य हिराप्रकाश बोड्डावार,  उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, यशवंतराव शिंदे, डॉ. अंजली दिग्रसकर, संतोष लोंढे, प्रा. अजित बुरपल्ले, विश्वनाथ देशमुख,  रुकमाजी चव्हाण, संदीप पांडे, सिमंत पांडे, प्रकाशक संजय सुरनर आदींची उपस्थिती होती.

      पुढे बोलताना देवीदास फुलारी म्हणाले की,जनक कुलकर्णी यांच्या कवितेला वैश्विक अधिष्ठान असून त्यांच्या कवितेला सामाजिक मूल्ये असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

         प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना

 कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की लेखक आणि कवींनी महाराष्ट्राला एक नवा विचार दिला असून आमच्या गावचा जनक कुलकर्णी यांनी साहित्य प्रांतात  असलेली भरारी निश्चितच आमच्या गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

          यावेळी प्रसिद्ध समाज सेविका आशाताई शिंदे यांनी जनकच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांनी मराठी साहित्यातील अनेक पैलूचा धांडोळा घेत जनकच्या साहित्यकृतीचे कौतुक केले.साहित्य हे जगण्याला प्रेरणा देते. कमी वयात जनक कुलकर्णी यांनी साहित्यवर्तुळात केलेले पदार्पण निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या प्रत्येक कवितेतून मानवी मनाच्या भावभावनांचा समर्पक असे मूल्ये असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी आणि कवी व्यंकटेश चौधरी यांनी मांडले. साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि परिवर्तनाची नवी दिशा मिळत असून जनक कुलकर्णी यांच्या कवितेतून परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा विचार असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त  शिक्षक तथा कवी शिवा कांबळे यांनी मांडले.

         कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन  डॉ. अनुराधा पत्की यांनी केले तर आभार पंकजा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पुरुषोत्तम हळदेकर,  दत्तात्रय कुलकर्णी, श्रीनिवास पवळे, अभिजीत हळदेकर, विश्वेश कुलकर्णी, श्रद्धा झंवर, अभिषेक भुरे, ज्योती गायकवाड, विठ्ठल मोरे, ख्वाजा सिद्दिकी, मारोती गौलोर, माधव पटने, आदित्य देशमुख, अभय कुलकर्णी, आकाश कुलकर्णी, आदेश हंगरगे, सुदेश हंगरगे, यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...