Skip to main content

स्त्रीयात्त्वाची साखळी .....सुप्रसिध्द लेखीका रुचीरा बेटकर यांचा जागतिक महिला दिनानिमित्त वाचनीय लेख



ती एक नैसर्गीक प्राकृती...

हलती, बोलती, चालती आकृती

म्हणजे स्त्री...

पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारी अनेक निर्बंध सहन करणारी स्त्री होती.  पण जसजसे जग आधुनिक होत गेले तसे तसे स्त्रियासुद्धा या आधुनिक विचारांच्या होत गेल्या.  आजची स्त्री महिला ज्या उच्चपदावर कार्य करीत  आहेत त्यानुषंगाने घरातील बंधने त्यांच्या वरील सेल होताना दिसत आहेत .

  आज पुरुषा पेक्षा स्त्रिया ह्या  मोठा पदावर कार्यरत असून ..जे कार्य पुरुष करीत आहेत व त्यांची मक्तेदारी दाखवत आहेत. त्याच क्षेत्रामध्ये महिलां कंबर कसून  कार्यरत आहेत.उदा: संरक्षणक्षण क्षेत्र, विमान वाहतूक, रेल्वे चालक, स्पेस, अनेक अवघड समजली जाणारी क्षेत्र व शेती,ग्रहउद्योग अशी क्षेत्र

आज महिलांनीकाबिज केली आहेत. व त्यात स्त्रिया अतुलनीय अशी प्रगती ही करीत आहे. 

आजच्या घडीला पाहता महिला व मुली या शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीयां वरती अनेक बंधने होती त्या शाळेत जात नव्हत्या किंवा शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या वर बंद होती.  परंतु आजचे चित्र बदलले आहे. 

भारतात आज 80 टक्के स्त्रिया हा स्वातंत्र्य काळात नंतर  सुशिक्षित झाल्या आहेत. आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलीला शाळेत पाठण्यासाठी व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी

पुढाकार घेत आहे. 

आजची स्त्री ही आधुनिक विचारसरणीची आहे. जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आवाज उठवणारी आहे .ऐवढेच नाही तर प्रत्येक महिला ही त्यांची परिधन करायची वस्त्र आणि गरज 

ही ओळखुन आहे. तसेच  लग्न जुळताना करण्यात येणार्या विचारवर सुद्धा आधुनिक झाल्या आहेत.  

महिलांवर होणार्या अत्याचाराचा विचार करता आज कायदा व सुव्यवस्था त्याच्या पाठशी आहे. त्यामुळे अत्याचारावर त्या ठामपणे बोलताना दिसत आहेत .याचबरोबर महिला संरक्षण कायदा किंवा महिला आरक्षण या विषयावर त्या लढाई देताना दिसत आहेत . 

आज महिला घरातील बंधने झुगारून देत आहेत.  ज्या महिला चूल आणि मूल एवढ्यावरच होत्या ते आज अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहेत . 

याचबरोबर

 "स्त्री हा समाजाचा मूलभूत घटक... नवी पिढी घडवणारी, कुटुंबव्यवस्थेला आकार देणारी, घराघरात सुसंवाद राखणारी... समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितकाच तो समाज सभ्य, सुसंस्कृत. समजला जातो...

 मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची ही नाती स्त्रियांमुळे जोपासली जातात.. स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होते. स्त्रियांमध्ये

 खरी आत्मनिर्भरता येते ती आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोपा शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून... केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्वविकास कसा साधावा...हा बदल स्त्रियां मुळेच शक्य आहे.

आजच्या युगात स्त्रीयाने मोठी प्रगती केली असली तरी, कुठे तरी त्यांच्या मनात इतरांविषयी ईर्षा, द्वेश,मत्सर आणि तिरस्कार अजून ही घर करून उरलेले आहे.

तो भाव जोपर्यंत बंद होत नाही... तो पर्यंत प्रत्येक स्त्री ही दुसर्या स्त्री ची वैरी राहणार आहे. त्यामुळें एकमेकास साह्य करून स्त्रियां च्या आत्मनिर्भर व आत्मसम्मान ची साखळी बनूया...

माझ्या सर्व सखीनां महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



रूचिरा बेटकर,नांदेड.

9970774211

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.