किनवट वृत्तांत:/
सेवार्थ फाऊंडेशन कडून नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी तालुक्यातील घोटी या गावी चालत असलेल्या शैक्षणिक संध्या या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 6-3-2022 रोज रविवारी विद्यार्थांसाठी संगीत खुर्ची चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सेवार्थ फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या या नावाने उपक्रम राबवत असून दर रविवारी हा उपक्रम घेण्यात येतो.
या उपक्रमा अंतर्गत भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, चित्रकला, खेळ असे कार्यक्रम घेत असून या रविवारी खेळामधील एक खेळ म्हणजे संगीत खुर्ची ही स्पर्धा या रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील सर तसेच विष्णू मूनेश्वर सर सेवार्थ फाऊंडेशन तर्फे ऋषीकेश लढे, तेजस पाटील, प्रसेनजित कयापाक, ऋषिकेश शेंडे, रणजित पाटील, प्रीतेश पाटील, आशिष शेंडे, सुनील वाढे, अनिकेत कयापाक, व गावातील नागरिक उपस्थित होते...
Comments
Post a Comment