आरोग्य विभाग व पोलिस विभागात निवड झाल्या बद्दल२ विद्यार्थ्यांचा राईज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्रां तर्फे सत्कार
किनवट प्रतिनिधी:-
दि.११ मार्च:-
चेतन राठोड आरोग्य विभाग ठाणे व रोहीत राठोड मुंबई पोलीस या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आरोग्य व पोलिस विभागात निवड झाल्याबद्दल राईज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गोकुंदा तालुका किनवट वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी राईज अकॅडमीचे संचालक लक्ष्मीकांत कापसे , प्रा. भीमराव घुले किशोर जाधव,राम तिळेवाड,रामेश्वर नेवारे,गजानन बोके,मयुर देशमुख आदी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment