✍🏻राजेश पाटील
किनवट प्रतिनिधी:-
प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डि.टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस सेवा संघाची विविध विषयावर बैठक घेण्यात आली .
या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान स्मारक, किनवट मधुन चाललेला राष्ट्रीय महामार्गाची परीपत्रकानुसार बांधकाम होत आहे का? किनवट येथील नप च्या हद्दीतील पथदिवे बंद अवस्थेत आहेत त्याची चर्चा तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी काही उपक्रम घेण्यात येईल का? रमजान ईद निमित् अनाथ लोंकाना मदत करता येईल का ? वाढीव पाणी पुरवठा योजना कशा प्रकारे सुरु आहे लोकांना काय मदत करता येईल अशा विविध विषयांवर आज कि न्युज या वृत्त कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी प्रेस सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अशिष शेळके, उपाध्यक्ष राजेश पाटील,शेख अतीफ, ,सचिव नसीर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम, तालुका सदस्य बापुराव वावळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment