Skip to main content

किनवट चे पत्रकार आनंद भालेराव यांचा जिल्हाअध्यक्ष नागेलीकर यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षप्रवेश

 


डिजिटल सदस्य नोदणी जास्तीत जास्त करण्याचे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांना केले अवाहन


किनवट/प्रतिनिधी:     आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव  शिंदे पाटील नागेलीकर यांच्या हस्ते तसेच किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,राजेंद्र केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार आनंद भालेराव यांचा भाजपातून काँग्रेस पक्षात प्रवेश  झाला.

       राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून या निमित्य जिल्हाअध्यक्षा चा अध्यक्षतेखाली माहूर येथील कपीलेश्वर धर्मशाळेत पदाधिकारी व कार्यकर्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

 याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष नागेलिकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री व पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेशअध्यक्ष  नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील नांदेड जिल्ह्यातील  डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सुरु असून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून नांदेड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान केले.

या प्रसंगी काँग्रेस नेते यादवराव जाधव,किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,माजी नगराध्यक्ष माहूर राजेंद्र केशवे,किसनराव राठोड,ईश्वर चव्हाण, निरंजन केशवे,गिरीश नेमानीवार,जवाद आलम, आनंद तुपदळे,जयकुमार अडकीने,फारुख चव्हाण, प्रीती मुनेश्वर, शेख शहेनज, शेख परवीन, जयश्री भरणे,डॉ. तौफिक,राहुलवार सर, व पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...