Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या तुळजापूर तहसीलदारावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करा ...पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 तुळजापूर : पत्रकारांना अरेरावी करून केबिन मधून हाकलून अपमान करणाऱ्या तुळजापूर जि. धाराशिव तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर गुन्हा नोंद होणार. दि. 25 फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील तहसील मध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे वीना परवाना वीट भट्टीधारका विरोधी सामूहिक आत्मदहन आंदोलन होते.ती बातमी संकलन व व्हिडिओ घेण्यासाठी पत्रकार गेले असता तहसीलदार अरविंद बोळंगे हे पत्रकारांना म्हणाले तुम्ही अगोदर बाहेर जा, शूटिंग करू नका, मला माहित आहे पत्रकार कसे असतात ते. असे म्हणून बाहेर हुस्कावण्याचा  प्रयत्न केला व पत्रकारांना अपमानित केले. सदर आंदोलन तुळजापूर पीआय अनिल मांजरे यांच्या मदतीने स्थगित करण्यात आले. नंतर सर्व पत्रकार तहसीलदार यांच्या केबिनमध्ये गेले व म्हणाले आंदोलनाविषयी बाईट द्या (आपले म्हणणे सांगा) परंतु बाईट न देता पत्रकारांना अरेरावी करून पत्रकारांना केबिन मधून हाकलून दिले. अशाप्रकारे पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या मुजोर व कर्तव्यहीन, विटभट्टी धरकाबरोबर मिलीभगत असणाऱ्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मु...

डोर्ली येथे राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद

घाटंजी/ डोर्ली प्रतिनिधी-  राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्मपरिषद डोर्ली तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे संपन्न झाली.. हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका उपस्थित होते.  या कार्यक्रमात  जागतिक कीर्तीचे विद्वान बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक महाबोधी मुक्ती आंदोलन पाली भाषेचे अभ्यासक प्रसिद्ध विचारवंत धम्म संघनायक अखिल भारतीय भिकू संघ महाराष्ट्र ऑल इंडिया धम्म प्रचारक बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे महान भंदत डॉ प्राचार्य खेमोधम्मो मुळावा महाविहार दाभड नांदेड हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. उत्तम शेंडेनी केलं कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भैय्यासाहेब पाईकराव आयोजक प्रशिक पाईकराव तसेच संयोजक रमेश जाधव व सर्व डोरली येथील  उपासक /उपासिका होते या कार्यक्रमाला  मुंबईचे दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते  आणि प्रवचन दरम्यान मी रमाई बोलते ही नाटिका सादरीकरण झाले.

व्हीआय.टी.एम महाविद्यालयाचे ग्रामीण शिबीर संपन्न

नांदेड: नांदेड येथील व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण शिबीर बेटमोगरा तालुका मुखेड येथे संपन्न झाला. व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाच्या एम एस डब्ल्यू या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ग्रामीण शिबीर बेटमोगरा येथे पार पडले. एम एस डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी दचौथ्या सत्रात एका खेडेगावात जाऊन तेथील ग्रामीण जीवन समजून घेणे गाव स्वच्छ करणे गावातील सुख-सुविधा, उद्योग,उत्पन्नाची साधने, शेतीची प्रगती यांचा अभ्यास करून गावकऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे. हे अभ्यासक्रमाचा भाग आहे. या उद्देशाने व्हीआयटीएम समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी बेटमोगरा तालुका मुखेड या ठिकाणी गेले होते. शिवलिंग बादशहा या मठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आपले वास्तव्य केले होते. तेथे वास्तव्यास राहून विद्यार्थ्यांनी बेटमोगरा हे गाव स्वच्छ केले. प्रभात फेरी काढून झाडे लावा झाडे जगवा,मुलगी वाचवा, हुंडाबंदी असे विविध नारे देऊन प्रभात फेरी काढली. गाव स्वच्छ केला. गावातील उद्योगधंदे आणि शेती तसेच उत...

कवी रामस्वरूप मडावी यांना काव्यनिनादचा राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

  किनवट: येथील साहित्यिक कवी रामस्वरुप मडावी यांना राज्यस्तरीय 'संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी देवाची आळंदी येथे काव्यनिनाद साहित्य मंच पुणे यांच्या वतीने काव्यनिनाद साहित्य मंच पुणे या परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित राज्यस्तरीय 'संत ज्ञानेश्वर साहित्यरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष- प्रकाश भि. पाठक (छ.संभाजीनगर), उद्घाटक- सौ. अनुराधा बेके (मुंबई), प्रमुख अतिथी- सौ. विनिता कदम (मुंबई),सौ. निता भामरे (नाशिक), समूह संस्थापक अध्यक्ष विकास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक असे होते. तसेच या दिनानिमित भव्य राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी झालेल्या राज्यस्तरीय कवि संमेलनात राज्यातील प्रसिद्ध कवी यांनी हजेरी लावली होती. या समूहाचे अध्यक्ष विकास पालवे व संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश भि. पाठक यांच्या हस्ते सर्व सहभागी कवी यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरव करण्यात आला.  कवी राम...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू

सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेवाडी- अकलूज येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. सदर वाचनालयाचे उद्घाटन सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. देवन्या मोहिते-पाटील म्हणाल्या की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे. या वाचनालयमुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडणार असल्याचे सांगितले.  याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रमुख रामलिंग सावळजकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर, पत्रकार संजय लोहकरे, सुनील कांबळे, विशाल साठे, सचिन झेंडे, अनु...

कवी कट्टा सहल जांभूळ बेट येथे यशस्वीरीत्या संपन्न

  ______________________ □ केरवाडी विज्ञान केंद्रास भेट □ ज्येष्ठ साहित्यिकांनी हिरवी झेंडी दाखवून सहल रवाना.. ____________________ नांदेड: कवी कट्टा या लोकप्रिय साहित्यिक समूहाची सहल दरवर्षीप्रमाणे यावर्षी जांभुळबेट येथे जाऊन आली. या निसर्ग सहलीला कला मंदिर भागातून मान्यवर साहित्यिक प्रा.डॉ.जगदीश कदम,इसाप  प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे, प्रसिद्ध साहित्यिक महेश मोरे आणि प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार आदी मान्यवर साहित्यिकांनी जांभूळ बेट कडे जाणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आणि सहलीची गाडी जांभूळ बेट मार्गाने रवाना झाली. पालम तालुक्यातील जांभुळबेट हे नदीपात्रात बेट तयार झाले असून चारी बाजूंनी पाण्याचा वेढा या बेटाला आहे त्यामुळे अतिशय नयनरम्य असं निसर्ग ठिकाण म्हणून ओळखले जाते. कवी कट्टा साहित्यिक लेखकांचा समूहातील नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील साहित्यिक लेखकांना एकत्रित येऊन निसर्ग ठिकाणी सहल गेली. जांभुळबेटकडे जातांना स्वप्नभूमी आणि विज्ञान केंद्र त्यातील प्रयोग पाहिले. कविता /गप्पा /गोष्टी /गाणी/गझल तळ्यात मळ्यात/ असे खेळ या सहलीत घेण्यात आले. जांभूळ बे...

आशिष शेळके यांच्या VIP OFFICE आणि VIP REAL ESTATE कार्यालयाचे थाटामाटात शुभारंभ.

  आमदार भिमरावजी केराम व बेबीताई प्रदिपजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाबाई शेळके यांच्या हस्ते उद्घाटन. किनवट : शिवजन्मोत्सवच्या दिवशी आशिष शेळके यांनी त्यांचे संपर्क कार्यालय व्हिआयपी ऑफीस व व्हिआयपी रियल इस्टेट या कार्यालयाचे शुभारंभ अत्यंत थाटामाटात व हर्षोल्लास मध्ये केले. आमदार भिमरावजी केराम व बेबीताई प्रदिपजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आशिष शेळके यांच्या आई रमाबाई शेळके यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.          आशिष शेळके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, किनवट तालुक्यातील हे एकमेव रियल इस्टेट कार्यालय आहे, ज्यांना कुणाला किनवट तालुक्यात कुठेही घर, प्लाॅट, शेती इत्यादी खरेदी अथवा विक्री करायची असेल त्यांनी या व्हिआयपी कार्यालयाला अवश्य भेट द्यावे. किनवट तालुक्यातील कुठल्याही भागात, कुठल्याही नगर अथवा काॅलनी मध्ये घर, प्लाॅट, शेती खरेदी व विक्री चे सर्व कामे व्हिआयपी कार्यालय मध्ये केले जातील असे शेळके म्हणाले.           कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभानंतर लगेच भो...

भारतीय संविधान नवीन युगाला सामावून घेणारे ; विधीतज्ञ ॲड. सचिन भिमराव दारवंडे यांचे प्रतिपादन

  किनवट, ता. २२ (बातमीदार) : भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदृष्टी असलेले विद्वान होते. भारताच्या संविधानात त्यांनी बदलत्या वेळ - काळानुसार संविधानात बदल करण्याची तरतूद केली, म्हणून भारतीय संविधान बदलत्या युगाला समाऊन घेणारे जीवित दस्तावेज आहे, असे प्रतिपादन विधीतज्ञ ॲड. सचिन भिमराव दारवंडे यांनी केले.   गोकुंदा येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यशाळा, व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये रुजवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख व्यक्ते म्हणून बोलत होते. केशवानंद भारती निवड्याचा दाखला देत त्यांनी, भारतीय संसदेला बदलत्या काळानुसार संविधानात बदल करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु, भारतीय संविधानाचा जो मूलभूत गाभा आहे त्यात बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. भारताच्या सर्वोच्च व उच्च न्यायालयांनी मूलभूत अधिकाराचा अर्थ लावताना मूलभूत अधिकाराची व्याप्ती कशी वाढवली आहे, याबद्दल ॲड. दारवंडे यांनी उल्लेखनीय निवाड्यांचा व संविधानात...

ई-केवायसी न केल्यास रेशन मिळणे होणार बंद :२८ फेब्रुवारी अंतिम तारीख

किनवट,दि.२२ : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तालुक्यातील २०१ रेशन धान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा अन्नधान्याचे "वितरण केले जाते. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाहीत. जे पात्र लाभार्थी ई-केवायसी करून घेणार नाहीत, ते धान्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे २८ फेब्रुवारी ही ई-केवायसी करून घेण्याची शेवटची तारीख आहे. तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना सुरुवातीपासूनच ई-केवायसी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचनाही सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आल्या.   ||शिधापत्रिका आधार संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकाचा आधार क्रमांक अचूक आणि तोच आहे का? याची पडताळणी म्हणजे ई-केवायसी होय. पत्ता व ओळखीच्या दृष्टीने ई-केवायसी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी २८ फेब्रुवारीपूर्वी आपली ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा त्यांचा धान्य पुरवठा बंद केला जाईल.||    ...

ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर शासनाची उदासीनता कारणीभूत ठरत असल्याची खंत

  किनवटदि.२२ : शासनाच्या ग्रंथालय चळवळीच्या बाबतीत उदासीन वेळकाढू धोरणामुळे ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 'गाव तेथे ग्रंथालय' ही चळवळ सक्षम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी किनवट व माहूर तालुक्यातील ग्रंथालयीन कर्मचारी व पदाधिकारी यांची आहे.   नांदेड जिल्ह्यात एकूण ७५८ ग्रंथालये आहेत. त्यापैकी अनेक ग्रंथालये बंद पडली आहेत. 'गाव तेथे ग्रंथालय' असे शासनाचे धोरण असले तरी ही ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवण्याकडे मात्र शासनाचे लक्ष नाही वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह व ग्रंथालयीन चळवळ चालवणे अवघड होत असल्याने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी गेली बारा वर्षांपासून होत आहे, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६० टक्के अनुदानात वाढ केली व उर्वरित ४० टक्के लवकरच देऊ तसेच जून २०२४ पासून दर्जावाढ देऊ, असे आश्वासन दिले; पण वेतनश्रेणीच्या प्रश्नास बगल दिली.शासनाने ग्रंथालयीन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वरील सर्व प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी किनवट तालुका ग्रंथालय  संघाचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व सचिव प...

धम्म उपासिका शिबिराला सुरवात

किनवट: (ता.२२)भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा तालुका किनवट येथे आज दि.  22/02/2025  रोजी शनिवार           *दहा दिवसिय धम्म उपासिका शिबिराचे उदघाटन झाले* या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजाराम वाघमारे सर (सरचिटणीस भा. बौद्ध म.) किनवट, शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका  उपा. अनिताताई खंदारे (केंद्रीय शिक्षिका तथा नांदेड जिल्हा महिला अध्यक्षा) नांदेड, शिबिराचे प्रास्ताविक- बौध्दाचार्य महेंद्र नरवाडे सर (जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार विभाग), यांनी केले,  उपा. आम्रपाली वाठोरे (कांबळे) महिला सचिव,    सुत्रसंचालन -महिलाउपाध्यक्षा वंदनाताई तामगाडगे यांनी केले. या वेळी उपा. भारत कावळे सर( कोषाध्यक्ष भा. बौ. म.) किनवट, बौध्दाचार्य अनिल उमरे (संस्कार सचिव भा. बौ. म. ) किनवट, उपा. राहुल घुले (संरक्षण विभाग) किनवट,उपा. बंडू भाटशंकर(वार्ड शाखा अध्यक्ष),  उपा. ॲड. पंडित घुले सर, प्रा.दिलीप पाटील, वार्ड अध्यक्ष कैलास पाटील यांची उपस्थिती होती.शिबिरात गोकुंदा व किनवट ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किनवट व माहुरात विद्यार्थी वसतिगृह मंजुर युवा पॅंथर संघटनेच्या मागणीला यश

  किनवट,दि.१८ : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ हे किनवट दौऱ्यावर नुकतेच आले होते. यावेळी त्यांना किनवट येथे समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह मंजूर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन "युवा पँथर ",संघटने तर्फे देण्यात आले.या संदर्भाने रात्री झालेल्या जागतिक धम्म परीषदेच्या मंचावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी घोषणा केली की,'किनवट येथील १०० मुलांच्या क्षमतेच्या व माहूर येथे १००मुलींच्या क्षमतेच्या वसतिगृहासाठी एकूण २० कोटी रुपये निधी आपण मंजुर करत आहोत. याबाबत ३ महिन्यात कार्यवाही करण्यात येईल व येत्या ६ महिन्यात इमारत उद्घाटना साठी आपण स्वतः येणार आहोत.'    युवा पॅंथर तर्फे निवेदन देतांना निखिल कावळे,विनोद भरणे,ॲड. सम्राट सर्पे, गौतम पाटील आदी उपस्थित होते. -------------------------------------------------------•

किनवटच्या तहसीलदार चौंडेकर यांचा वकील संघाकडून निषेध

  किनवट (तालुका प्रतिनिधी) न्यायालयीन कामकाजासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या वकिलाचा पक्षकारासमोर अवमान केल्याप्रकरणी किनवटच्या वकील संघाने तहसीलदार शारदा चौंडेकर यांचा निषेध करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात किनवटच्या दिवाणी न्यायाधीशांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वकील विलास सूर्यवंशी हे दि. ५ फेब्रुवारी रोजी पक्षकारासोबत न्यायालयीन कामकाजासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी आक्षेप क्रता / प्रतिवादी यांचे म्हणणे सादर करण्यासाठी केस मधील वादपत्राच्या / अर्जाच्या व सोबत दिलेल्या कागद पत्राच्या प्रति तहसीलदार शारदा चौंडेकर यांना मागितल्या असता त्यांनी फाईल न बघता तुम्ही कागद सांगा असे उद्धट बोलून पक्षकारासमक्ष "गेट आऊट" असे अँड . सूर्यवंशी यांना उद्देशून पदाला कलंकित करणारी अवमानकारक व वकिली व्यवसायाची अवमूल्यन करणारी भाषा केली. शिवाय, सूर्यवंशी यांच्या पक्षकाराला 'यांना कशाला वकील म्हणून लावले' असा प्रश्न करत पुन्हा सूर्यवंशी यांचा अवमान केला. तालुका दंडाधिकाऱ्यांच्या या कृतीचा किनवट वकील संघाने निषेध केला. अवमानाच...

किनवटमध्ये १२ वीच्या परीक्षेस प्रारंभ, तालुका प्रशासन सज्ज

  किनवट तालुका प्रतिनिधी- (दि.११) किनवट तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. यातील इस्लापूर येथील दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड ही तीन परीक्षा केंद्रे वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ नियोजन म्हणून हिमायतनगर येथील परिरक्षक कार्यालयास (कस्टडी) जोडण्यात आली आहेत. तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी आज मंगळवारी इंग्रजीचा पेपर देण्यासाठी प्रत्यक्षात ३ हजार २४५ विद्यार्थी उपस्थित होते तर ६८ विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. आज प्रारंभीच्या इंग्रजीच्या पेपरला किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर ५४३, बळीराम पाटील महाविद्यालय ५८०, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय ४१०, संगीतादेवी विद्यालय दहेली तांडा २४३, संत फुलाजी बाबा परीक्षा केंद्र, उमरी बाजार १७०, शासकीय आश्रम शाळा पाटोदा केंद्र २८६, सुधाकरराव नाईक विद्यालय, पळशी २५९, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २४६, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २८५ आणि शासकीय आश्रम श...

किनवट येथे १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद भीमराव आंबेडकर, मंत्री संजय सिरसाठ, जिग्नेश मेवानी यांची उपस्थिती

  किनवट प्रतिनिधी:  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता नगर येथील बौद्धमूर्ती परिसरात दि १५ व १६ असे दोन दिवस १४ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे भव्य स्वस्मात आयोजन केले असून या परिषदेला देश विदेशातील भन्ते, भाबौमसचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ, आ. भीमराव केराम आमदार हेमंत पाटील, मंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त रात्री ९ वा. ख्यातनाम गायक अजय देहाडे मंजुषा शिंदे भाग्यश्री इंगळे संविधान मनोहरे रेश्मा सोनवणे यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे या धम्म परिषदेला पंचक्रोशीतील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक दया भाऊ पाटील, निमंत्रक विशाल हलवले यांनी केले आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दु.४ वा. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, प्रा डॉ मोहन मोरे दराटीकर, बापूराव गजभारे, विनोद भरणे मिलिंद धुळे मारोती भगत हे उपस्थिती राहतील. सायं ६ते रात्री ८ वाजेपर्यंत धम्मदेशना, धम्मकवी संमेलन व धम्म संवाद कार्यक्रम संप...

विषमतावादी व्यवस्थे विरोधात बहुजनांनी एकत्रितपणे लढा देणे काळाची गरज -सक्षणा सलगर

  किनवटः विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यामुळे दलित शोषित पीडित समाजात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या हे अलीकडच्या काळातील ज्वलंत उदाहरणे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व्यवस्था टिकवायची असेल तर भारतीय संविधान वाचविण्यासाठी बहुजनानी एकत्रित लढा देणे काळाची गरज बनली आहे असे मौलिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी किनवट येथे केले आहे. किनवट येथील समता नगर येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित 14 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेतील समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सक्षणाताई सलगर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय सोळंके किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान प्राध्यापक राम भरणे राज बनकर विकास कुडमेथे बालाजी बामणे निमंत्रक निखिल वाघमारे यांची प्रामुख्याने पस्थिती होती. पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यापासून दलित शोषित पडितावर अन्यायाचे सत्र सुरू झाले. सोम...

भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर

 किनवट:-     भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.२२फेब्रुवारी २०२५ ते३मार्च२०२५या कालावधीत सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथे दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  सदर शिबिरात केंद्रीय शिक्षिका अनिता ताई कंधारे यांचे दहा दिवस मार्गदर्शन लाभणार आहे.शिबिराचा समारोप भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.ज्या इच्छुक महिला उपासिकांना शिबीरात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर नांव नोंदणी करावी असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके साहेब, तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, कोषाध्यक्ष भारत कावळे, संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे,माजी जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी केले आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.अशोक राणा यांचा सत्कार समारंभ

  किनवट,दि.११: सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, शाखा नांदेडच्या वतीने छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा जाहीर सत्कार बुधवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजता पीपल्स कॉलेज, नांदेड येथे आयोजित केला आहे. या सत्कार समारंभास जिल्ह्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.रामप्रसाद तौर, प्रा. डॉ. पंजाब शेरे,ॲड.मिलिंद सर्पे,उत्तम कानिंदे व राजा तामगाडगे यांनी केले आहे.    समारंभाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष  के. ई. हरिदास हे राहणार आहेत. यावेळी सत्कारमूर्ती व १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा डॉ. वासुदेव मुलाटे( १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. -------------------------------------------------------

रानडुकराच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू..

   किनवट (तालुका प्रतिनिधी) सुलतानी व आसमानी संकटाचं वजन पेलत असताना किनवट तालुक्यातील लक्कडकोट  गट ग्रामपंचायत मारेगाव खालचे येथील शेतकरी रानटी प्राण्यां कडून पीक नासाडी करत असल्यामुळे मयत अंकुश बाळू हसबे वय 55 दिनांक 9/2/ 2025 रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता पिकाचे संरक्षण करण्यासाठी रानटी प्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतात गेला असता सदर शेतामध्ये पोहोचल्याच्या नंतर दोन रान डुकराने अचानकपणे हल्ला केला हल्ला एवढा गंभीर स्वरूपाचा होता की शेतकरी गंभीर दुखापत होऊन त्याला लगेच गावकरी मंडळीने खाजगी वाहनांमध्ये टाकून गोकुंदा येथे नेण्यात आले गोकुंदा येथे डॉक्टरांनी गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला आदिलाबादच्या सरकारी रुग्णाला रेफर करण्यात आले दिना  आदीलाबाद येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले असता तिथे डॉक्टरांनी  मृत घोषित त्यांना केले त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 10 /2/ 2025 रोजी संध्याकाळी चार वाजता तमाम मारेगाव व लक्कडकोट व तसेच परिसरातील नागरिकांच्या हजरी मध्ये पार झाला सर्वच नागरिकांच्या मनावर एक दुःखाचे सावट होते शेतकऱ्याला अशा अनेक संकटाला तोंड द्यावं...

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून नांदेड पोलीस सदानंद सपकाळे यांचा सन्मान

नांदेड (प्रतिनिधी)  संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे साठी पोलीस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सदानंद सपकाळे यांनी कोषागारातील कर्मचाऱ्यांना सलामीव पथसंचलनाचे प्रशिक्षक दिले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक आणले होते. त्याबद्दल सदानंद सपकाळे यांचा जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृता कश्यप बगाटे, बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांच्यावतीने पुष्प आणि प्रम  ाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.