नांदेड:
नांदेड येथील व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण शिबीर बेटमोगरा तालुका मुखेड येथे संपन्न झाला.
व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाच्या एम एस डब्ल्यू या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ग्रामीण शिबीर बेटमोगरा येथे पार पडले. एम एस डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी दचौथ्या सत्रात एका खेडेगावात जाऊन तेथील ग्रामीण जीवन समजून घेणे गाव स्वच्छ करणे गावातील सुख-सुविधा, उद्योग,उत्पन्नाची साधने, शेतीची प्रगती यांचा अभ्यास करून गावकऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे. हे अभ्यासक्रमाचा भाग आहे. या उद्देशाने व्हीआयटीएम समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी बेटमोगरा तालुका मुखेड या ठिकाणी गेले होते. शिवलिंग बादशहा या मठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आपले वास्तव्य केले होते. तेथे वास्तव्यास राहून विद्यार्थ्यांनी बेटमोगरा हे गाव स्वच्छ केले. प्रभात फेरी काढून झाडे लावा झाडे जगवा,मुलगी वाचवा, हुंडाबंदी असे विविध नारे देऊन प्रभात फेरी काढली. गाव स्वच्छ केला. गावातील उद्योगधंदे आणि शेती तसेच उत्पन्नाची साधने गावाचा सांस्कृतिक इतिहास अधिक गोष्टींचा अभ्यास करून माहिती घेतली व गावकऱ्यांचे मनोरंजन म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यात लोकनाट्य,पथनाट्य, नृत्य गायन अशा विविध कला विद्यार्थ्यांनी बेटमोगरा गावकऱ्या समोर सादर केला. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे या कलागुणांना विशेष दाद दिली. बेटमोगरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढली.अंधश्रद्धा निर्मूलन पर प्रात्यक्षिक कमलाकर जमदाडे या विद्यार्थ्याने दाखवले व गावाला प्रबोधन केले व्हीआयटीएम समाज कार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचा व्हिलेज कॅम्प ग्रामीण शिबीर हे बेटमोगरा येथे मोठा उत्साहात पार पडले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवाजी शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश पाटील टाकळीकर तसेच समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत दुगाणे बडूरकर यांनी मार्गदर्शन केले. तर एम एस डब्ल्यू विभागाचे प्रा. स्वप्निल दोरवे,प्रा. सम्राट हाटकर, एमजे विभागाचे प्रा.अशोक कुबडे तसेच प्रा.जयश्री दुधाटे आणि प्रा. श्रेया जाधव आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर या ग्रामीण शिबिरात एम एस डब्ल्यू अभ्यासक्रमाचे व एमजे अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment