मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किनवट व माहुरात विद्यार्थी वसतिगृह मंजुर युवा पॅंथर संघटनेच्या मागणीला यश
किनवट,दि.१८ : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ हे किनवट दौऱ्यावर नुकतेच आले होते. यावेळी त्यांना किनवट येथे समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह मंजूर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन "युवा पँथर ",संघटने तर्फे देण्यात आले.या संदर्भाने रात्री झालेल्या जागतिक धम्म परीषदेच्या मंचावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी घोषणा केली की,'किनवट येथील १०० मुलांच्या क्षमतेच्या व माहूर येथे १००मुलींच्या क्षमतेच्या वसतिगृहासाठी एकूण २० कोटी रुपये निधी आपण मंजुर करत आहोत. याबाबत ३ महिन्यात कार्यवाही करण्यात येईल व येत्या ६ महिन्यात इमारत उद्घाटना साठी आपण स्वतः येणार आहोत.'
युवा पॅंथर तर्फे निवेदन देतांना निखिल कावळे,विनोद भरणे,ॲड. सम्राट सर्पे, गौतम पाटील आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------•

Comments
Post a Comment