किनवट,दि.११: सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, शाखा नांदेडच्या वतीने छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष
डॉ. अशोक राणा यांचा जाहीर सत्कार बुधवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजता पीपल्स कॉलेज, नांदेड येथे आयोजित केला आहे. या सत्कार समारंभास जिल्ह्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.रामप्रसाद तौर, प्रा. डॉ. पंजाब शेरे,ॲड.मिलिंद सर्पे,उत्तम कानिंदे व राजा तामगाडगे यांनी केले आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. ई. हरिदास हे राहणार आहेत. यावेळी सत्कारमूर्ती व
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा
डॉ. वासुदेव मुलाटे( १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
-------------------------------------------------------

Comments
Post a Comment