घाटंजी/ डोर्ली प्रतिनिधी-
राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्मपरिषद डोर्ली तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे संपन्न झाली..
हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका उपस्थित होते.
या कार्यक्रमात जागतिक कीर्तीचे विद्वान बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक महाबोधी मुक्ती आंदोलन पाली भाषेचे अभ्यासक प्रसिद्ध विचारवंत धम्म संघनायक अखिल भारतीय भिकू संघ महाराष्ट्र ऑल इंडिया धम्म प्रचारक बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे महान भंदत डॉ प्राचार्य खेमोधम्मो मुळावा महाविहार दाभड नांदेड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. उत्तम शेंडेनी केलं कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भैय्यासाहेब पाईकराव आयोजक प्रशिक पाईकराव तसेच संयोजक रमेश जाधव व सर्व डोरली येथील उपासक /उपासिका होते या कार्यक्रमाला मुंबईचे दिग्गज कार्यकर्ते उपस्थित होते आणि प्रवचन दरम्यान मी रमाई बोलते ही नाटिका सादरीकरण झाले.


Comments
Post a Comment