किनवट तालुका प्रतिनिधी-
(दि.११) किनवट तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. यातील इस्लापूर येथील दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड ही तीन परीक्षा केंद्रे वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ नियोजन म्हणून हिमायतनगर येथील परिरक्षक कार्यालयास (कस्टडी) जोडण्यात आली आहेत.
तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते. त्यापैकी आज मंगळवारी इंग्रजीचा पेपर देण्यासाठी प्रत्यक्षात ३ हजार २४५ विद्यार्थी उपस्थित होते तर ६८ विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. आज प्रारंभीच्या इंग्रजीच्या पेपरला किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर ५४३, बळीराम पाटील महाविद्यालय ५८०, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय ४१०, संगीतादेवी विद्यालय दहेली तांडा २४३, संत फुलाजी बाबा परीक्षा केंद्र, उमरी बाजार १७०, शासकीय आश्रम शाळा पाटोदा केंद्र २८६, सुधाकरराव नाईक विद्यालय, पळशी २५९, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २४६, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, इस्लापूर २८५ आणि शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड २२३ अशा एकूण दहा केंद्रांवर ३ हजार २४५ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सरस्वती विद्यामंदिर विद्यालय किनवट परीक्षा केंद्रावर वी.एस मुंडे, बळीराम पाटील महाविद्यालय केंद्रावर प्रा. विजय खुपसे, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा येथे ए. बी. होनराव, संगीता देवी विद्यालय दहेली तांडा येथे अनिल जाधव, संत फुलाजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे बी.पी केंद्रे, शासकीय आश्रम शाळा पाटोदा येथे एम.एस. आडे, सुधाकरराव नाईक विद्यालय पळशी येथे आर. व्ही. चौधरी, संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर येथे काळेवाड सर, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर येथे दिलीप राख तर शासकीय आश्रमशाळा सहस्त्रकुंड येथे पंढरीनाथ बुरकुले हे परीक्षा केंद्र अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा पहिला दिवस मात्र कॉपीमुक्त वातावरणात शांततेत पार पडला. संपूर्ण परीक्षेचा कालावधी कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त व परीक्षा नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांनी सांगितले.

Comments
Post a Comment