Skip to main content

विषमतावादी व्यवस्थे विरोधात बहुजनांनी एकत्रितपणे लढा देणे काळाची गरज -सक्षणा सलगर

 


किनवटः विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यामुळे दलित शोषित पीडित समाजात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या हे अलीकडच्या काळातील ज्वलंत उदाहरणे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व्यवस्था टिकवायची असेल तर भारतीय संविधान वाचविण्यासाठी बहुजनानी एकत्रित लढा देणे काळाची गरज बनली आहे असे मौलिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी किनवट येथे केले आहे.


किनवट येथील समता नगर येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित 14 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेतील समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सक्षणाताई सलगर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय सोळंके किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान प्राध्यापक राम भरणे राज बनकर विकास कुडमेथे बालाजी बामणे निमंत्रक निखिल वाघमारे यांची प्रामुख्याने पस्थिती होती.

पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यापासून दलित शोषित पडितावर अन्यायाचे सत्र सुरू झाले. सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या हत्या इथल्या विषमतावादी व्यवस्थेने घडून आणल्या या देशात सामाजिक एकोपा स्वातंत्र्य बंधुता व न्याय टिकून ठेवायचा असेल तर भारतीय संविधान वाचविणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी बहुजनांनी एकत्रितपणे लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. धम्म परिषदा सामाजिक चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करत गेल्या 14 वर्षापासून किनवट सारख्या मागास दुर्गम भागात भव्य दिव्य अशा धम्म परिषदांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक राहुल कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले, महाराष्ट्रला शाहू फुले आंबेडकर अहिल्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे येथे जातीपातीला मुळीच थारा नाही. धम्म परिषदेतुन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर विचारांचं प्रतिबिंब दिसतं असेही सक्षनाताई सलगर म्हणाल्या. या धम्म परिषदेला मराठवाडा विदर्भ व तेलंगणा राज्यातून हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...