नांदेड (प्रतिनिधी)
संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे साठी पोलीस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदानंद सपकाळे यांनी कोषागारातील कर्मचाऱ्यांना सलामीव पथसंचलनाचे प्रशिक्षक दिले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक आणले होते. त्याबद्दल सदानंद सपकाळे यांचा जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृता कश्यप बगाटे, बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांच्यावतीने पुष्प आणि प्रम ाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Comments
Post a Comment