______________________
□ केरवाडी विज्ञान केंद्रास भेट
□ ज्येष्ठ साहित्यिकांनी हिरवी झेंडी दाखवून सहल रवाना..
____________________
नांदेड:
कवी कट्टा या लोकप्रिय साहित्यिक समूहाची सहल दरवर्षीप्रमाणे यावर्षी जांभुळबेट येथे जाऊन आली. या निसर्ग सहलीला कला मंदिर भागातून मान्यवर साहित्यिक प्रा.डॉ.जगदीश कदम,इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे, प्रसिद्ध साहित्यिक महेश मोरे आणि प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार आदी मान्यवर साहित्यिकांनी जांभूळ बेट कडे जाणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आणि सहलीची गाडी जांभूळ बेट मार्गाने रवाना झाली.
पालम तालुक्यातील जांभुळबेट हे नदीपात्रात बेट तयार झाले असून चारी बाजूंनी पाण्याचा वेढा या बेटाला आहे त्यामुळे अतिशय नयनरम्य असं निसर्ग ठिकाण म्हणून ओळखले जाते. कवी कट्टा साहित्यिक लेखकांचा समूहातील नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील साहित्यिक लेखकांना एकत्रित येऊन निसर्ग ठिकाणी सहल गेली. जांभुळबेटकडे जातांना स्वप्नभूमी आणि विज्ञान केंद्र त्यातील प्रयोग पाहिले.
कविता /गप्पा /गोष्टी /गाणी/गझल तळ्यात मळ्यात/ असे खेळ या सहलीत घेण्यात आले. जांभूळ बेटावर काव्यमैफील आणि गझल आणि गण्या ची मैत्रीण खूप रंगली. कवी कट्टा हा गेल्या दहा वर्षापासून आपली साहित्यिक नवीन प्रयोग करत असतो कवी कट्ट्याची ही सहावी सहल होती. या अगोदर सहस्त्रकुंड केदारगुडा, कंधार किल्ला, माहूर, बासर आदी ठिकाणी ही सहल काढण्यात आली होती. प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद या सहलीला मिळत असतो. महाराष्ट्रात कवी कट्टा या समूहाचे सोळा हजार सदस्य आहेत. या सर्वांना येणे शक्य नाही पण नांदेड आणि परिसरातील कवी कट्यातील कवी एकत्रित यावे. सर्वांना गप्पा गोष्टी करता याव्या. मैत्री व्हावी आणि एकमेकांच्या सहवासात राहता यावे. हा प्रामाणिक हेतू यामागे आहे.लेखक साहित्यिकांचा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी ही सहल कोकण कोल्हापूरकडे काढण्याचा मानस संयोजकांचा आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असेही अवाहन करण्यात आले आहे.लोहा येथील कविमित्र जगन्नाथ पाटील यांनी सहलीचे स्वागत केले.तर गोपीनाथ शिनगारे यांनी पेठशिवनी येथे स्वागत केले आणि केरवाडीसाठी मार्गदर्शन केले.
या सुंदर अशा सहलीचे आयोजन कवी कट्टा समूहाचे अशोक कुबडे आणि दत्ता वंजे यांनी केले होते.या सहलीत बेटावर विविध कार्यक्रम घेण्यात आले.याचे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी पुरणशेट्टीवार या होत्या प्रास्ताविक अशोक कुबडे यांनी केले तर आभार दत्ता वंजे यांनी मांनले. यावेळी मागील सहालींचा फोटोंचा दस्ताऐवज संकलन जीवन मांजरमकर यांनी केले त्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यासाठी संजय बोधणे, शंकर माने, दिगंबर माने, राजश्री विभुते,अंजली मुनेश्वर,गोदावरी गायकवाड,ज्योती गायकवाड, पवन कुसुंदल,राजेंद्र उपाध्याय, संघपाल कांबळे, नारायण पोटेवाड, शंतनु सोने, पांडुरंग दाभाडे, इंजि. लक्ष्मण लिंगापुरे आदींनी सहभाग घेतला होता.


Comments
Post a Comment