किनवट येथे १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद भीमराव आंबेडकर, मंत्री संजय सिरसाठ, जिग्नेश मेवानी यांची उपस्थिती
किनवट प्रतिनिधी:
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता नगर येथील बौद्धमूर्ती परिसरात दि १५ व १६ असे दोन दिवस १४ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे भव्य स्वस्मात आयोजन केले असून या परिषदेला देश विदेशातील भन्ते, भाबौमसचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ, आ. भीमराव केराम आमदार हेमंत पाटील, मंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त रात्री ९ वा. ख्यातनाम गायक अजय देहाडे मंजुषा शिंदे भाग्यश्री इंगळे संविधान मनोहरे रेश्मा सोनवणे यांचा बुद्ध भीम गीतांचा
प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे या धम्म परिषदेला पंचक्रोशीतील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक दया भाऊ पाटील, निमंत्रक विशाल हलवले यांनी केले आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दु.४ वा. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, प्रा डॉ मोहन मोरे दराटीकर, बापूराव गजभारे, विनोद भरणे मिलिंद धुळे मारोती भगत हे उपस्थिती राहतील. सायं ६ते रात्री ८ वाजेपर्यंत धम्मदेशना,
धम्मकवी संमेलन व धम्म संवाद कार्यक्रम संपन्न होतील रात्री ९ वा धम्म संस्कृतिक संध्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या नामांकित गायिका रेश्मा सोनवणे
संविधान मनोहरे व दामोदर यांचा बुद्ध गीतांचा दणदणीत
कार्यक्रम होईल. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. धम्म सवाल, १२ वा भदंत संघरत्न महाथेरो हे धम्मदेशनात्त देतील. त्यानंतर धम्मसंगती प्रबोधन स्पर्धा होणार असून यात १२ ते २० वर्षे वयोगटातील मुला मुलींना सहभागी होता येईल सायं ५ः३० वा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अनन्य सन्मान व सत्कार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाठ आमदार भीमराव केराम व मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात, गुजरात येथील वडगाम विधानसभेचे आमदार जिग्नेश मेवाणी पद्मश्री
कल्पना सरोज लघु विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांचा यथोचित सत्कार होईल सायं ७:३० वा. समारोपीय सत्रात उमरखेडचे माजी आमदार विजयराव खडसे विधान परिषदेचे अध्यक्ष हेमंतभाऊ पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत आमदार प्रताप पाटील चिखलीकर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आमदार राजू तोडसाम आमदार बालाजी कल्याणकर आमदार श्रीजया चव्हाण आमदार बाबुराव कदम कोहळीकर तेलंगणाचे आमदार आमशा पाडवी, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी डॉ.अंकुश देवसरकर शिवसेनेचे ज्योतिबा खराटे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, स्वागत आयनेनीवार यांची उपस्थिती राहणार आहे. रात्री ९ वा धम्म संस्कृतिक संध्या कार्यक्रमात मंजुषा शिंदे अजय देहाडे भाग्यश्री इंगळे यांचा बुद्ध भीम गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. या धम्म परिषदेत हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे दयाभाऊ पाटील, विशाल हलवले, निखिल कावळे राहुल सर्पे, दीपकदादा ओंकार सुनील भरणे, दिलीप मुनेश्वर, गोलू आढागळे, संदीप दोराटे, अरुण शेंद्रे, निवेदक कानींदे आदींनी केले आहे.

Comments
Post a Comment