Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू



सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम


सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह (शिवबाबा) मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेवाडी- अकलूज येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. सदर वाचनालयाचे उद्घाटन सौ. देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. देवन्या मोहिते-पाटील म्हणाल्या की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे. या वाचनालयमुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडणार असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलनचे व्याख्याते व वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रमुख रामलिंग सावळजकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, पत्रकार लक्ष्मीकांत कुरूडकर, पत्रकार संजय लोहकरे, सुनील कांबळे, विशाल साठे, सचिन झेंडे, अनुराग खंडागळे, पृथ्वीराज कारंडे, प्रकाश भोसले, लालुभाई शेख, बल्लू देशमुख, विजय सुर्यवंशी, रघुनाथ देशमुख, अण्णासाहेब जगदाळे, दादा थीटे, अशोक कोळी, सुनिल कांबळे, विशाल साठे, पृथ्वीराज कारंडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत कडबाने तर आभार सोमनाथ खंडागळे यांनी मानले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीने उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य संघटक अनिल राठोड, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, मराठवाडा संघटक बा. पू. गायकर, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड. परेश जाधव, प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...