Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

लॉकडाऊन मध्ये शिथिलता निर्बंध ७ते २ पर्यंत मा.मुख्यमंत्र्याची नवी नियमावली

 राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून यावेळी सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई : राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून लॉकडाऊन कडक नसला तरी निर्बंध लागू असणार अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पण यावेळी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. यासाठी २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील २०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रश

हिंगोली जिल्ह्यातील बँकांनो, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी खा. हेमंत पाटील यांची बँकांना ताकीद

  हिंगोली : - जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांना होणारा पिक कर्ज पुरवठा तीन वर्षात अत्यंत कमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे.  कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी ताकीद खासदार हेमंतभाऊ पाटील यांना बँक अधिकाऱ्यांना दिली.      आज दि. २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या पीक कर्ज वाटप संदर्भात राष्ट्रीयकृत बँकाना येणाऱ्या अडचणी बाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत खा. हेमंत पाटील बोलत होते.     या बैठकीस हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.      या वेळी आढावा घेताना खा. हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुरळीत होऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी यासाठी बँकाना महत्वपूर्ण सूचना केल्या.     बँकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत तसेच शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त करीत हे पुन्हा होऊ देऊ नका अशी स्पष्ट ताकीद दिली.  

प्रा. डॉ.गणेशराव शिंदे यांच्या जाण्याने शैक्षणिक अपरिमित हानी झाली , विद्यापीठासाठी त्यांचे अमुल्य योगदान - प्रा.डॉ. शेखर घुंगरवार

नांदेड: प्रा.डाॅ. गणेश शिंदे सरांचा आणि माझा परिचय युवक महोत्सवाच्या माध्यमातून झाला होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा ..म्हणून त्यांना सरजी असेच मी नेहमी म्हणतं असे, त्यांना जेंव्हा समजले की मी हदगांव तालुकातला आहे, तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते मला नेहमी 'शेखरराव' असे आदरपूर्वक संबोधीत असत.  हदगांव तालुकातल्या  माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहात असत . तेंव्हा मला त्याच्याबद्दल अत्यंत आदर वाटायचा...  गेल्या २० वर्षात त्यांच्या सहवासात राहण्याचे अनेक प्रसंग आले. मी प्राचार्य झाल्याच समजाच त्यांनी मला पहिला अभिनंदनचा फोन केला होता. कुठेही मोठेपणा मिरवताना त्यांना मी पाहिले नाही. जात पात हा विषय त्यांच्या आचरणात कधीच आढळला नाही. एक कर्तव्यकठोर आणि सतत कार्यमग्न असणे हा त्यांचा स्थायीभाव होता. विद्यापीठाचा युवक महोत्सव असला की गणेशराव व त्यांचे जीवलग मित्र प्रा.डाॅ.आंबादास कांबळे(हे सुद्धा आपल्या सर्वांना काही दिवसापूर्वी कायमचे सर्वांना सोडून गेले आहेत) हे संपूर्ण कामे अगदी अंगावर घेऊन दिवसरात्र ते काम करायचे. इतकेच नव्हे तर जेंव्हा गणेशराव स्वामी रामान

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यातील १०७ कोटींचा पीकविमा मंजूर

हिंगोली :मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरलेल्या पिकविम्याच्या रक्कमेपोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात १०७ कोटींचा पीकविमा मंजूर झाला आहे . सलग दोन वर्ष हिंगोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाला असून गत  वर्षी  १२४ कोटीचा  पीकविमा मिळाला होता.  खासदार हेमंत पाटील यांनी सलग दोन्ही वर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडे यासंबंधी पाठपुरावा करून पीकविमा मंजूर करून घेतला आहे .                 मागच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पेरणी आणि काढणीच्या वेळी अतोनात नुकसान झाले होते . त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला . मागील हंगामात हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आणि शासनाने मिळून ९५ कोटी रुपये भरले आहेत यामध्ये थेट शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३ कोटी १८ लाख , केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख तर राज्य शासनाने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख  रुपये आहे . यावरून शेतकऱ्यांना यंदाच्या विम्याच्या रक्कमेपोटी १०७ कोटी रुपये मंजुर झाले  आहेत.एकूण विमा काढणारे शेतकरी ३लाख २ हजार आहेत त्यापैकी १ लाख २१ हजार लाभार्थी असून आजवर ७० ह

बँकांनो खबरदार ! शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवाल तर- खासदार हेमंत पाटील

  हिंगोली /नांदेड /यवतमाळ :  बँकांनो खबरदार ! जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा सज्जड दम खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत  बँकांना दिला.  खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही  हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत आपली आक्रमक  भूमिका स्पष्ट करतांना खासदार हेमंत पाटील बोलत होते  .                   शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये नेहमीच प्रशासन आणि राष्ट्रीयकृत  बँकांची  उदासीनता दिसून येते . त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित रहातो परिणामी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते त्यामुळेच शेतकरी आणखीनच कर्जाच्या फेऱ्यात अडकतो . वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो . खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेतली आहे.  बँकांना निर्देश दिले असून जिल्हाधिकाऱ्यासोब

किनवट येथे बुध्द पौर्णिमे निमित्त तथागतांना वंदन करण्यात आले

  किनवट, दि.२६: सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात आज (दि.२६)"बौद्ध पौर्णिमा", हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. प्रारंभी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. प्रा.सुबोध सर्पे यांनी बुध्द वंदना घेतली व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आनंदराव ठमके यांनी समयोचित विचार व्यक्त केले.      यावेळी वंचित बहुजन आघाडी चे माधव कावळे, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सहसचिव ॲड. मिलिंद सरपे, यादव नगारे, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर , मनोहर पाटील, कपील कावळे, राजेश पाटील , शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, विशाखा महिला मंडळाच्या कचरूबाई मुनेश्वर, सुशिला ठमके, जयमाला आळणे, सिंधुबाई कांबळे, सारजा कावळे,राहीबाई पाटील, लक्ष्मी पाटील, सूर्यकांता सर्पे, कृष्णावती धोटे, अॅड दिव्या सर्पे, रोहीनी मुनेश्वर, वर्षा ठमके, प्रतीक्षा ठमके, करुना पवार, वनीता पाटील , ललीता मुनेश्वर, रत्नमाला भरणे, सुजाता भरणे, रामबाई ठमके, सोमीत्रा कावळे, ज्योती कावळे, सुधाबाई परेकार, योजना पाटील, प्रभाबाई कापसे, शेशीकला कावळे, कौशल्या मुनेश्वर यांची उपस्थिती होती.    सिध्दार्थ नगर  नवयुवक मंडळचे निखील कावळे, गौतम

बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे -खासदार हेमंत पाटील

  ----------------------------------------------------------- हिंगोली : खरीप हंगाम पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी- बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी  हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करावे याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेऊन बँकांनी  अद्याप कोणतीही  सक्षम यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यानेच शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत आहे . त्यामुळे बँकांनी तात्काळ  पीककर्जाचे वाटप करण्यासाठी  याबाबत यंत्रणा कार्यन्वित  करण्याचे निर्देश दिले .          खरीप हंगाम तोंडावर येऊनही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करीत नसल्यामुळे हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. कोरोना विषाणू कालखंड , लॉकडाऊन , आणि मागील वर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अश्या अवस्थेत अडकलेला शेतकऱ्याला पीककर्ज हा एकमेव पर्याय शिल्लक आहे . जगाचा पोशिंदा जगाला तरच देश जगेल, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले जावे ,  दरवर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटानी भरडून निघतो

26 मे 2021 वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्ताने सुप्रसिद्ध कवयत्री रुचीरा बेटकर यांची रचना आम्हास बुद्ध हवा

आम्हास बुद्ध हवा शत्रूवर चालून जाणारा मार्ग हवा युद्ध नको आम्हास बुद्ध हवा... मनी प्रकाशाची ज्योत पेटवणारा संसाराच्या चक्रव्यूहातून तारणारा... आम्हास बुद्ध हवा... अंतर्मनातील द्वेष,मत्सर  यांचा संहार करणारा शांतीचा संदेश देणारा... आम्हास बुद्ध हवा... अहंकाराचा वारा शमवणारा... संत,महंत मानवतेचा  उपासक घडवणारा आम्हास बुद्ध हवा... अनंताला जाणणारा जीवनाहुती देणारा... बहुजन हित जोपासणारा... आम्हास बुद्ध हवा... बुद्ध म्हणजे शांती,समता,शील,करूणा, मानवता,व्यर्थता,दिव्यता... माणसामाणसाला जोडणारा...  अहिंसा तोडणारा... आम्हास सुर्यकूल बुद्ध हवा... रूचिरा बेटकर, नांदेड. मो.9970774211

सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता

  किनवट ता. प्र.:- सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठ नांदेड यांनी मराठी विषयासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. व्यंकटराव नेम्मानीवार, डॉ.केशव सखाराम देशमुख डॉ. पृथ्वीराज  तौर,प्राचार्य  अनुजा पाटील, प्राचार्य आनंद भंडारे ,प्राचार्य  किरण पाईकराव, ॲड. जी. एस. रायबोळे,डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ.पंजाब शेरे प्रा. प्रदीप एडके, प्रा. रमेश शिंदे, डॉ. हेमंत सोनकांबळे, डॉ. गजानन कोरतलवार, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. स्वेता राठोड, प्रा. विशाल गिमेकर, प्रा. अजय पाटील, सागर नेमानीवार, ॲड. मिलिंद सरपे, विजय जाधव, चंद्रकांत वंजारे,निलेश चहांदे,सागर पाटील, सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, कामराज जाधव, सुरेश सांवगेकर, रमेश सुरेशवार, गजानन भुरे, रवी सांवगेकर, नंदकिशोर जाधव, मोहन कोवे, गणेश येरकाडे, अशोक मोतेराव, सुनील मोतेराव, संदेश,राजनंदिनी, यशराज,विराट  यांच्यासह इतरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय

हिंगोली  : राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे  आयुष रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री  श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मंजुरी मिळवून आणली आहे .                  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आणि लोकसभा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघाचा दौरा केला होता. यादरम्यान अनेक ठिकाणी आढळून आलेल्या असुविधांबाबत संबंधितांना सूचना आणि निर्देश देऊन  सुविधा करून घेतल्या आहेत . आयुष राष्ट्रीय मंत्रालयांतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या  दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी आयुष रुग्णालय स्थापनेस  मंजुरी दिली आहे . खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत सन २०१९ मध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती तसेच राज्य

टिपु सुलतान ब्रिगेडची धर्माबाद तालुका कार्यकारीणीची बैठक संपंन्न

 ता. प्र. धर्माबाद:- धर्माबाद तालुक्यातील टिपू सुलतान ब्रिगेड,कार्यकारिणीची बैठक आज विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीत टिपू सुलतान ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष जहिरोद्दीन पठान सर व मराठवाडा सचिव नविद अहमद ,जिल्हा उपाध्यक्ष फयाज पठाण, यांच्या हातून धर्माबाद तालुकाध्यक्ष पदी म.मुबशीर (मुबु लाला,) शहराध्यक्ष शेख इरफान, तालुका उपाध्यक्ष मिर्झा शहजादे खुर्रम बेग, तालुका उपाध्यक्ष शेख सादिक फुलांवाले, तालुका सचिव सय्यद मुदस्सीर, सोशल मीडिया तालुका प्रभारी सय्यद शाहिद अली, तालुका विद्यार्थी अध्यक्ष वसीम खान, शहर विद्यार्थी अध्यक्ष शेख रिहान. या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.सर्व पदाधिकार्याचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले आणि टिपू सुलतान ब्रिगेड संघटना मानव सेवेसाठी कधीही तयार राहतील असे वचन देण्यात आले

किनवट तालुका काँग्रेस कमिटी कडून स्व. खा. राजीव भाऊ सातव व किनवट महिला काँग्रेस अध्यक्ष सुरेखाताई काळे यांना आज पक्ष कार्यालयाकडुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

ता. प्र.किनवट:  १९ मे २०२१ किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने संसदरत्न खा.राजीव सातव व सुरेखाताई काळे यांच्या निधनाबद्ल दुःख व्यक्त करुन काँग्रेस कमिटीचे वतीने पक्षा कार्यालयात भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आले याप्रसंगी व्यंकटराव नेम्मानीवार,शेख.चाँद,मुर्ती कलगोटूवार,सिराज जिवनी,प्रशांत रेड्डी,गिरीष नेम्मानीवार,अभय महाजन,अशिष कर्‍हाळे,शेख.शाहनजा,जावद आलम,शेमशर खिच्ची,फारुख बाबा,बिलाल बडगुजर,स्वामी कलगोटूवार,रवि चौधरी,गंगाधर कदम,जाधव,फारुख चव्हाण व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थिती होते.

खतांची दरवाढ रोखली तरच शेतकरी जगेल- खासदार हेमंत पाटील दरवाढ मागे घेण्याची केली पंतप्रधानाकडे मागणी

  हिंगोली/नांदेड /यवतमाळ  : खरीप पेरणीचा  हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना  केंद्र सरकारने रासायनिक खतांची  केली  आहे  ही केलेली दरवाढ रोखली तरच या देशातील शेतकरी जगेल  अन्यथा कोरोनाच्या आणि आर्थिक मंदीच्या लाटेत या देशातील शेतकरी आर्थिक ओझ्याने भरडून निघेल   त्यामुळे केंद्राने केलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे केली आहे.    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ने खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत दरवाढ केल्यामुळे  देशातील शेतकऱ्यांला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे  सदैव शेतकरी प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे मांडणारे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सुद्धा शेतकरी हित लक्षात घेऊन खतांच्या दरवाढी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, खरीप पिकाची पेरणी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना केंद्र सरकारने केलेली खतांची दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे. याबाबत सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून या दरवाढीचा गांभीर्यने दखल घेऊन तातडीने दरवाढ मागे घ्यावी.सध्या  प्रत्येक ५० किलो खतांच्या

काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले आहे

  पुणे:   काँग्रेस नेते आणि खासदार   राजीव सातव   यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. उद्या सोमवारी हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. राजीव सातव यांचे आज पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज आज संपली. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. सातव यांचे पार्थिव पुण्याहून हिंगोलीकडे रवाना झाले आहे. रुग्णवाहिकेत सातव यांची आई, पत्नी आणि इतर अप्तेष्ट आहेत. उद्या सकाळी कळमनुरीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलं. सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित: राज्यपाल राजीव सा

पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्या विरोधात" सेक्युलर मुव्हमेंट ",सह पंधराहून अधिक पक्ष व संघटनेचा एल्गार

  मुंबई :राज्य शासकीय निमशासकीय सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या महा विकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात आंबेडकरवादी राजकीय सामाजिक तसेच मागास वर्गीय अधिकारी कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा सात मे रोजी चा शासन आदेश त्वरित मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा "सेक्युलर मुव्हमेंट ", या संघटनेसह १५ हून अधिक संघटनांनी दिला आहे.    यासंदर्भात "सेक्युलर मुव्हमेंट", चे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे, कार्याध्यक्ष भरत शेळके, उपाध्यक्ष डॉ. अशोक गायकवाड, सरचिटणीस प्रा. डॉ. भरत नाईक यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे गवई गट सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष डॉ.सुरेश माने, भीम आर्मी चे सरचिटणीस अशोक कांबळे, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एस. आर. भोसले, सरचिटणीस रमेश सरकटे, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत वानखेडे, ऑल इंडिया बॅकवॉर्ड क्लास एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस एस. के. भंड

अठरा भाषा अवगत असलेले प्रतिभावंत साहित्यिक ,शाक्तवीर छञपती संभाजी राजे यांच्या३६४ व्या जयंती निमित्त प्रा. दगडु भरकड यांचा विशेष लेख

छञपती.. शिवरायांच्या निधनानंतर  स्वराज्य दुपटीने , सैन्य, शस्ञसाठा,  राज्य खजिना  तीन पटीने वाढविणारे स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती संभाजी राजे रणमैदानावरील शौर्य गाजविण्यासोबत लेखन बहाद्दर ही होते .त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्यावर सईबाईच्या पोटी झाला .सईबाई बाळांतपणापासून आजारी असल्याने त्यांचे निधन ५ सप्टेंबर १६५९ रोजी झाले .तेव्हा बाळ शंभूराजे  साधारणतः अडीच वर्षाचे होते .त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी राजमाता जिजाऊ यांच्यावर आली .छञपती शिवरायांप्रमाणे बाळ शंभूराजे यांच्यावर संस्कार , शिक्षण ,घोड्यावर बसणे ,तलवार ,दांडपट्टा चालविणे , युद्ध नितीचे,  राज्यकारभाराचे धडे दिले. १६६५ साली स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानाचे संकट आले .स्वराज्यात धुडगुस घातला ,रयतेला ञस्त करून सोडले तेव्हा छञपती शिवरायांना  रयतेसाठी मिर्झा राजे जयसिंगा सोबत पुरंदरचा अपमानकारक तह करावा लागला .या तहान्वये स्वराज्यातील तेवीस किल्ले मुघलास द्यावे लागले .शंभूराजास वयाच्या आठव्या वर्षी मुघलाकडे पंचहजारी मनसबदार व्हावे लागले .याचा अर्थ बाळ शंभूराजे आठ वर्षाचे होते तेव्हा

प्रत्येक गावात ग्रामपंचायतीने कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा आकाश सुर्यवंशी

  (प्रतिनिधी) :  नितीन कांबळे      शहरी भागामध्ये कोरोनाची संख्या जास्त प्रमाणात दिसुन येत होती. आता त्याच पाठोपाठ ग्रामीण भागामध्ये सुद्धा करोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतांना आपल्याला दिसुन येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येक गावामध्ये कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे ग्रामपंचायत सदस्य आकाश सुर्यवंशी यांनी म्हटले आहे.      सध्याच्या काळात ग्रामीण भागामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रसार पाहुन रुग्णांना लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असुन त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा हे कोविड सेंटर म्हणुन उपयोग करावा. त्यामुळे रुग्णालयावरील ताण कमी होईल व त्यांना ताबडतोब उपचार मिळण्यास चांगली मदत होईल आणि कोविड सेंटर गावात उभारल्यास रुग्णांना त्यांच्या घरचे जेवण मिळेल व कोणताही त्रास होणार नाही. गावामध्ये कमी खर्चात उपचार होईल. रुग्णांवर प्राथमिक अवस्थेत उपचार होणे गरजेचे आहे. लक्षणे असल्यास चाचणी करुन योग्य ते औषध उपचार केल्यास पेशंटची तबेत लवकर चांगली होईल व त्यांच्या मनातील कोरोनाची भिती निघुन जाईल व पेशंट

खावटी योजनेमुळे आदिवासी बहुल गावांना मिळणार संजीवनी – खासदार हेमंत पाटील चार तालुक्यातील ९ हजार ४७१ अर्ज मंजूर

  (किनवट ता. प्र.) हिंगोली लोकसभा क्षेत्रातील किनवट तालुक्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी खावटी अनुदान योजना खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतली आहे . तालुक्यातील आदिवासी गावांना यामुळे संजीवनी मिळणार आहे . हिंगोली लोकसभा मतदार संघातील चार तालुक्यातील ९ हजार ४७१ आदिवासी कुटुंबाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. राज्य शासनाने शेतकरी, आर्थीकदृष्टया दुर्बल व अनुसुचित जमातिच्या कुंटूबियांना आर्थीकसाह्य देण्याची सवेदनशिल भुमिका घेतलेली आहे,त्याचाच एक भाग म्हणुन दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही म्हणुन आर्थीक विवंचनेतुन अनुसुचित जमातिच्या कुंटूबियाची उपासमार होऊ नये म्हणुन सन,१९७८ पासुन खावटी कर्ज योजना राज्य शासनाकडुन सुरु करण्यात आली,आहे. परंतु मागील काही वर्षांपासून हि योजना बंद करण्यात आली होती. सध्या कोरोना विषाणूच्या काळात ग्रामीण भागातील आदिवासी समाज रोजगाराअभावी हवालदिल झाला आहे. त्यांना संजीवनी देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्य

दहावी पर्यंत उर्दू शिक्षण घेणाऱ्या किनवटची इफ्फत खान युसूफखान ही एमबीबीएस मध्ये पहिल्या श्रेणीत

  किनवट/प्रतिनिधी- किनवट दहावी पर्यंत उर्दू शिक्षण घेणाऱ्या किनवटची इफ्फत खान युसूफखान ही एमबीबीएस पहिल्या श्रेणीत स्वामी रामानंद तीर्थ रुलर मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे उत्तीर्ण झाली आहे इफ्फत खानचे माता पिता किनवट येथील जवाहेर उलूम उर्दू हायस्कूल मध्ये शिक्षक असून इफ्फत खानला दहावी मध्ये ९१ टक्के बारावी मध्ये ७५ टक्के गुण मिळाले आहे विशेष म्हणजे इफ्फत खान यांचे शिक्षण दहावी पर्यंत उर्दू शाळेत झाले आहे तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष ईसाखान , शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मा खातून  शिक्षक गुरुजनांनी कौतुक केले आहे

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला स्पष्ट बहुमत पश्चिम बंगालमधील जनतेनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी वर विश्वास ठेवला

  पश्चिम बंगालमधील २९२ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार तृणमूल काँग्रेसने २०४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा ९३ पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला स्पष्ट बहुमत पश्चिम पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला स्पष्ट बहुमत पश्चिम बंगालमधील जनतेनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी वर विश्वास ठेवला जनतेनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी वर विश्वास ठेवला आघाडीवर आहे. हा कल पाहता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनतेनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर सुरुवातीपासूनच भाजपाने मोठं आव्हान निर्माण केलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला होता. पक्ष आणि आघाडी खालील प्रमाणे... तृणमूल काँग्रेस - २०७ भाजप - ८२ इतर - ३ Advertisement:-