Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यातील १०७ कोटींचा पीकविमा मंजूर


हिंगोली :मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरलेल्या पिकविम्याच्या रक्कमेपोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात १०७ कोटींचा पीकविमा मंजूर झाला आहे . सलग दोन वर्ष हिंगोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाला असून गत  वर्षी  १२४ कोटीचा  पीकविमा मिळाला होता.  खासदार हेमंत पाटील यांनी सलग दोन्ही वर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडे यासंबंधी पाठपुरावा करून पीकविमा मंजूर करून घेतला आहे . 

               मागच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पेरणी आणि काढणीच्या वेळी अतोनात नुकसान झाले होते . त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला . मागील हंगामात हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आणि शासनाने मिळून ९५ कोटी रुपये भरले आहेत यामध्ये थेट शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३ कोटी १८ लाख , केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख तर राज्य शासनाने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख  रुपये आहे . यावरून शेतकऱ्यांना यंदाच्या विम्याच्या रक्कमेपोटी १०७ कोटी रुपये मंजुर झाले  आहेत.एकूण विमा काढणारे शेतकरी ३लाख २ हजार आहेत त्यापैकी १ लाख २१ हजार लाभार्थी असून आजवर ७० हजार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ६५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत तर उर्वरित रक्कम टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे विम्याची रक्कम वाढण्याची शक्यता आहे . जिल्ह्यात एकूण पिकाचे क्षेत्र ३ लाख ४० हजार हेक्टर आहे तर  एकूण लागवडीचे क्षेत्र हे १ लाख ४७ हजार हेक्टर आहे .    हिंगोली जिल्ह्याला पहिल्याच टप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर होण्याची हि पहिलीच वेळ आहे याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण प केंद्र आणि राज्यस्तवर पाठपुरावा केला होता . सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद साजरा केला जात आहे . गतवर्षी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना १२४ कोटीचा पीकविमा मंजूर झाला होता.काही शेतकऱ्यांना पहिल्यांदाच पीकविमा मंजूर झाल्यामुळे आनंद साजरा केला आहे तर  सलग दोन वर्ष पीकविमा मंजुरीमुळे शेतकरी राजाने खासदार हेमंत पाटील यांच्या बद्दल आभार व्यक्त करतांना शेतकऱ्यांचे कैवारी असल्याची भावना बोलून दाखविली .खासदार हेमंत पाटील यांना सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नविषयी तळमळ आहे . त्यामुळेच ज्या- ज्या वेळी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी , दुष्काळ , गारपीट यामुळे नुकसान झाल्यानंतर थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे  तसेच सदैव जागरूक राहून पीकविमा मिळवून दिला आहे .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...