Skip to main content

प्रा. डॉ.गणेशराव शिंदे यांच्या जाण्याने शैक्षणिक अपरिमित हानी झाली , विद्यापीठासाठी त्यांचे अमुल्य योगदान - प्रा.डॉ. शेखर घुंगरवार




नांदेड:

प्रा.डाॅ. गणेश शिंदे सरांचा आणि माझा परिचय युवक महोत्सवाच्या माध्यमातून झाला होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा ..म्हणून त्यांना सरजी असेच मी नेहमी म्हणतं असे, त्यांना जेंव्हा समजले की मी हदगांव तालुकातला आहे, तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते मला नेहमी 'शेखरराव' असे आदरपूर्वक संबोधीत असत. 

हदगांव तालुकातल्या  माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहात असत . तेंव्हा मला त्याच्याबद्दल अत्यंत आदर वाटायचा...  गेल्या २० वर्षात त्यांच्या सहवासात राहण्याचे अनेक प्रसंग आले. मी प्राचार्य झाल्याच समजाच त्यांनी मला पहिला अभिनंदनचा फोन केला होता. कुठेही मोठेपणा मिरवताना त्यांना मी पाहिले नाही. जात पात हा विषय त्यांच्या आचरणात कधीच आढळला नाही. एक कर्तव्यकठोर आणि सतत कार्यमग्न असणे हा त्यांचा स्थायीभाव होता.

विद्यापीठाचा युवक महोत्सव असला की गणेशराव व त्यांचे जीवलग मित्र प्रा.डाॅ.आंबादास कांबळे(हे सुद्धा आपल्या सर्वांना काही दिवसापूर्वी कायमचे सर्वांना सोडून गेले आहेत) हे संपूर्ण कामे अगदी अंगावर घेऊन दिवसरात्र ते काम करायचे. इतकेच नव्हे तर जेंव्हा गणेशराव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक झाले तेंव्हा युवक महोत्सव अत्यंत हसत खेळत, कोणते गालबोट न लागू देता अगदी यशस्वीपणे त्यांनी युवक महोत्सव संपन्न केले.

त्यांच्या काळात विद्यापीठाची 'नवीन  युवक महोत्सव नियमाली' तयार करण्यात आली.आज जी युवक महोत्सवाच्या स्पर्धामध्ये सूत्रबद्धता आली आहे, त्याचे सर्व श्रेय प्रा.डाॅ.शिंदे सरांना जाते, यात दुमत नाही.

अत्यंत हृदयस्पर्शी माणूस, हळव्या मनाचा  , कवी साहित्यिक, नाटककार , अभिनेता अशा अनेक क्षेत्रात लिलया आपली छाप सोडणारे ते 'बेताज बादशहा' होते. 

विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय  व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा होता.  हरहुन्नरी  कलाकार असलेले प्राध्यापक शिंदे सर हे मराठी विषयातले व्यासंगी... अभ्यासक आज आपल्यात नाहीत... . हे मनाला पटत नाही ... गणेशराव तुम्ही इतक्या लवकर आम्हा सर्वांना सोडून जायला नको होते...............

निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐💐



Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.