Skip to main content

खतांची दरवाढ रोखली तरच शेतकरी जगेल- खासदार हेमंत पाटील दरवाढ मागे घेण्याची केली पंतप्रधानाकडे मागणी

 




हिंगोली/नांदेड /यवतमाळ  : खरीप पेरणीचा  हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना  केंद्र सरकारने रासायनिक खतांची  केली  आहे 

ही केलेली दरवाढ रोखली तरच या देशातील शेतकरी जगेल

 अन्यथा कोरोनाच्या आणि आर्थिक मंदीच्या लाटेत या देशातील शेतकरी आर्थिक ओझ्याने भरडून निघेल  

त्यामुळे केंद्राने केलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे केली आहे.

   खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ने खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत दरवाढ केल्यामुळे  देशातील शेतकऱ्यांला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे 

सदैव शेतकरी प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे मांडणारे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सुद्धा शेतकरी हित लक्षात घेऊन खतांच्या दरवाढी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, खरीप पिकाची पेरणी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना केंद्र सरकारने केलेली खतांची दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे.
याबाबत सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून या दरवाढीचा गांभीर्यने दखल घेऊन तातडीने दरवाढ मागे घ्यावी.सध्या  प्रत्येक ५० किलो खतांच्या पोत्यामागे १००० ते २००० 

रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे,यामध्ये डीएपी पूर्वी किंमत - १२०० आता वाढीव १९०० 

रु.पोटॅश पूर्वी किंमत ८५० आता वाढीव  १००० रु.तर १०:२६:२६ पूर्वी किंमत ११७५ आता 

वाढीव १७७५रु. १२: ३६ पूर्वी किंमत ११८५ आता वाढीव किंमत १८०० रु तर १६:१६:१६ ची 

पूर्वीची  किंमत ११७५ आणि आताची वाढीव किंमत १४०० रुपये करण्यात आली आहे .

सर्व खतामध्ये एकूण ५५ टक्के दरवाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना या चार खतांसाठी १० हजार पर्यंत किंमत मोजावी लागत आहे.त्यामुळे ही  करण्यात आलेली

 दरवाढ देशातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईत नेऊन टाकणारी आहे .
     
  आधीच कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतमालाचे भाव गडगडले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यात 

ऐन  खरीप पिकाच्या पेरणीच्या तोंडावर खताची  दरवाढ करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचा प्रकार आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या 

खात्यावर पैसे टाकून सहानुभूती दाखवायची आणि दुसरीकडे अश्या मार्गाने भरपाई करून घ्यायची  अश्या प्रकारचे अन्यायकारक आणि 

दुटप्पी धोरण केंद्र सरकार राबवत असल्याचा  घणाघाती आरोप  खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. 

कोरोनाच्या आजाराच्या काळात आर्थिक मंदीची लाट सुरू असताना देशातील हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश आणि असंतोष 

देशाच्या पंतप्रधानांनी ऐकला पाहिजे तरच या देशातील शेतकरी जगेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांच्या समवेत आ.संतोष बांगर,आ.बालाजी कल्याणकर,

जिल्हा परिषद सदस्य भानुदास जाधव, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, 

उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक राम कदम, 

दिनकर गंगावणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...