Skip to main content

बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे -खासदार हेमंत पाटील

 

-----------------------------------------------------------

हिंगोली : खरीप हंगाम पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी- बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी  हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करावे याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेऊन बँकांनी  अद्याप कोणतीही  सक्षम यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यानेच शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत आहे . त्यामुळे बँकांनी तात्काळ  पीककर्जाचे वाटप करण्यासाठी  याबाबत यंत्रणा कार्यन्वित  करण्याचे निर्देश दिले . 

        खरीप हंगाम तोंडावर येऊनही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करीत नसल्यामुळे हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. कोरोना विषाणू कालखंड , लॉकडाऊन , आणि मागील वर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अश्या अवस्थेत अडकलेला शेतकऱ्याला पीककर्ज हा एकमेव पर्याय शिल्लक आहे . जगाचा पोशिंदा जगाला तरच देश जगेल, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले जावे ,  दरवर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटानी भरडून निघतो , त्यामुळेच शेतकऱ्यांकडे पीककर्ज घेऊन पेरणी करण्या व्यतिरिक्त पर्याय उरलेला नाही . खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली असून शेतकऱ्यांना आता पेरणीची  प्रतीक्षा लागली आहे आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने बँकेकडून मिळणाऱ्या पीककर्जाची वाट पाहत आहेत,  परंतु जिल्ह्यातील बँकांनी अजून कोणतीच यंत्रणा उपलब्ध केली नसल्याने अनेक शेतकऱ्यानी  खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रारी करून पीककर्ज वाटपाची मागणी केली होती  या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान त्यांनी बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करावा या साठी जिल्हयातील सर्व बँक अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावावी अशी मागणी  केली. या सोबतच बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी, अरेरावीची भाषा वापरू नये,कोणत्याही कागद पत्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना सहकार्य करावे  अशा सूचनाही खासदार हेमंत पाटील यांनी या वेळी केल्या.

     या बैठकीस शिवसेना हिंगोली जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, उध्दवराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...