Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे हिंगोलीमध्ये होणार आयुष रुग्णालय


हिंगोली  : राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे  आयुष रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री  श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मंजुरी मिळवून आणली आहे .  

               कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आणि लोकसभा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघाचा दौरा केला होता. यादरम्यान अनेक ठिकाणी आढळून आलेल्या असुविधांबाबत संबंधितांना सूचना आणि निर्देश देऊन  सुविधा करून घेतल्या आहेत . आयुष राष्ट्रीय मंत्रालयांतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या  दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी आयुष रुग्णालय स्थापनेस  मंजुरी दिली आहे . खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत सन २०१९ मध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती तसेच राज्यशासनाकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा केला होता.   त्यानुसार राज्यशासनाच्या  आरोग्य विभागाकडून आयुष रुग्णालयांकरिता  मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ तयार करून दाखल करण्याचे निर्देश सुद्धा हिंगोली जिल्हा आरोग्य यंत्रणेला  देण्यात आले आहेत . त्यानुसार आता रुग्णालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असून हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मोकळ्या  जागेची पाहणी करण्यात येत आहे आली आहे .  राज्यात यापूर्वी अहमदनगर , नंदुरबार , सिंधुदुर्ग आणि पुणे या चार ठिकाणी ३० खाटांच्या आयुष  रुग्णालयास मंजुरी मिळाली असून,  निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात आयुष रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे आयुष रुग्णालयामुळे हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील आरोग्य  यंत्रणेला बळकटी मिळणार आहे तसेच रुग्णांना चांगल्या दर्जाचा औषधोपचार मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...