26 मे 2021 वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्ताने सुप्रसिद्ध कवयत्री रुचीरा बेटकर यांची रचना आम्हास बुद्ध हवा
आम्हास बुद्ध हवा
शत्रूवर चालून जाणारा मार्ग हवा
युद्ध नको आम्हास बुद्ध हवा...
मनी प्रकाशाची ज्योत पेटवणारा
संसाराच्या चक्रव्यूहातून तारणारा...
आम्हास बुद्ध हवा...
अंतर्मनातील द्वेष,मत्सर
यांचा संहार करणारा
शांतीचा संदेश देणारा...
आम्हास बुद्ध हवा...
अहंकाराचा वारा शमवणारा...
संत,महंत मानवतेचा
उपासक घडवणारा
आम्हास बुद्ध हवा...
अनंताला जाणणारा
जीवनाहुती देणारा...
बहुजन हित जोपासणारा...
आम्हास बुद्ध हवा...
बुद्ध म्हणजे शांती,समता,शील,करूणा,
मानवता,व्यर्थता,दिव्यता...
माणसामाणसाला जोडणारा...
अहिंसा तोडणारा...
आम्हास सुर्यकूल बुद्ध हवा...
रूचिरा बेटकर, नांदेड.
मो.9970774211


Comments
Post a Comment