Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी बांधव खावटी अनुदानापासुन वंचीत- भाजपा अनसुचीत जमाती मोर्चा नादेंड ग्रा. मोर्चाचे सहायक जिल्हाधिकारी , प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

  ता. प्र. किनवट:- राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदीवासी बांधवांना खावटी अनुदान वंचित असल्याने त्यांना त्वरीत खावटी अनुदान द्यावे असे भाजप नांदेड ग्रामिण अनु.जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण मार्फत निवेदन ता.३०रोजी देण्यात आले.  किनवट माहुरचे लोकप्रिय आमदार व भाजप अनुसुचीत जमाती मोर्चा ग्रामिण महाराष्ट्र  यांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठवले आहे . या खावटी अनुदान वाटप संदर्भात खालील मागण्यांचा समावेश १) खावटी अनुदान प्रति ४०००रू.लाभार्थ्याच्यां (DBT)थेट बँक खात्यात जमा करावे. २) आदीवासी बांधवाना वस्तु खरेदी ऐच्छीक करण्याबाबत  वस्तु, धान्य, किराणा, स्वरूपाच्या मटकी , चवळी ,हरभरा,वटाणा, उडीद, तुरदाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला , मिरची पावडर, मीठ , चहा, ई. मानवी जीवनावश्यक वस्तु करीता प्रती २००० नमूद आहे ती आदीवासी बांधवाना ऐच्छीक असावी  ३) आदीवासी बांधवाना निरक्षर समजु नये ४) स्थानिक पातळीवर हक्क देण्यात यावे  अशा मागण्या आहेत या निवेदनावर आमदार भीमराव केराम, गोवींद अंकुलवार, नादेंड ग्रामीण अ.ज. मोर्चा जिल्हाध्यक्ष , जितेंद्र कुलसंगे, ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कनाके, डि.जी. भीसे

दुखाचे सावट दुर सारुन माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन जुटले जनतेच्या कामाला

 ता . प्र.किनवट दुखाचे सावट दुर सारून किनवटचे माजी उपनगराध्यक्ष  तथा सामाजिक कार्यकर्ते अभय महाजन हे समता नगर ते अन्य रेल्वे स्टेशन परीसर , सूभाष नगर , सरदार नगर पर्यंत पाणी पुरवठा योजनेच्या काम सुरळीत व्हावे व जनतेला उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावे याकरीता कामाला जुटले आहे या बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे

हबीब कॉलनी ते गोकुंदा दुर्गंधीयुक्त रस्त्यावरील खड्डा बनला डोकेदुखी

   प्रतिनिधी किनवट/ गोकुंदा:- किनवट गोकुंद्याला जोडणारा हबीब कॉलनी जवळील मुख्य रस्त्यावरील मुस्लीम बांधवाचे आस्था असलेले मस्जिद समोरील दुर्गंधीयुक्त खड्डा हा तेथील नागरीकांची डोकेदुखी बनला आहे कारण  मागेच अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांना  सामाजीक कार्यकर्ते दिशा समितीचे मारोती सुंकुलवाड यांनी लेखी निवेदन दिले पंरतु तेथील अधिकारी झोपेच सोंग घेताय कारण या रस्त्यावर अनेक नागरीक , महिला विद्यार्थी तसेच उपजिल्हा रुग्णालयाला जाणारा पर्यायी रस्ता असल्याने तेथील  नागरीक या खराब रस्त्यामुळे ये- जा करणे अवघड होऊन बसले आहे रात्रीच्या वेळी या रस्त्याने विद्युत दिवे देखील रहात नाही अंधार असतो  तरी या गंभीर बाबीकडे संबधीत अधिकारी लोकप्रतिनिधींनी खाजगीने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील स्थानिक नागरीक करीत आहे

राजश्रीताई हेमंत पाटील यांना मातृशोक -----------------------------------------------------

  किनवट/माहूर : खासदार हेमंत पाटील यांच्या सासूबाई व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या आई तथा यवतमाळ येथील महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले  यांच्या पत्नी पुष्पाताई महल्ले यांचे कोरोना आजाराने मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल  मध्ये निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७२ होते.             पुष्पाताई यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवारी १८ एप्रिल रोजी नांदेड येथील अपेक्षा हॉस्पिटल मध्ये  दाखल  करण्यात आले होते. उपचार सुरू असून सुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत  नसल्याने आणि उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकने जसलोक हॉस्पिटल मुबंई येथे नेण्यात आले. सोमवार पासून उपचार सुरू असतांना आचनक  सकाळ पासून तब्येत खालावली होती व उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता अश्यातच  आज(दि.27 )दुपारी  3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात मुलगी राजश्रीताई  पाटील ,पुतणे ,नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार वरळी,मुबंई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविले आ

लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ ताबडतोब आर्थिक मदत मिळावी -किनवट भारतिय जनता पार्टी कडुन सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  (किनवट ता.प्रतिनिधी:) बारा बलुतेदारांचे लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेज ची घोषणा करण्यात यावी अशा प्रकारची मागणी किनवट भाजपा च्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्तिकुमार पुजार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आपण राज्यात लाडावून जाहीर केली आहे. या लॉकडाउन जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु नाही सुतार, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदार छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे आधीच गरीब परिस्थिती असलेल्या हा समाज लॉकडाऊन मुळे अधिक जास्त अडचणीत सापडलेला आहे. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आपण ,लॉकडाउन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक पॅकेज जाहीर केले. परंतु नाव्ही, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदारांसाठी कुठलीही आर्थिक सहायता जाहीर केलेली नाही तेव्हा बारा बलुतेदार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या बाराबलुतेदार मधील परंपरागत व्यवसायिकांना प्रति कुटुंब किमान 5 ह

प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांच्या सारख्या कसबी व्यक्तिमत्व जाण्याने पुढच्या पिढीच मोठ नुकसान झाल -डॉ. अशोक बेलखोडे

  किनवट  : प्रा.डॉ. अंबादास कांबळे ह्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या कसबी, कुशल कार्यकर्त्यांचं जाण हे जिव्हारी लागणारं आहे, पुढच्या पिढीचं मोठं नुकसान करणारं आहे. सर्व बाबतीत संवेदनशील असलेला हा माणूस होता, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले.           येथील नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांचं शुक्रवारी (ता.२३) रोजी निधन झालं. त्यांच्या पावन स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी शनिवारी(ता.२४)  सायंकाळी ६ वाजता साने गुरुजी रुग्णालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. मंचावर ऍड. मिलिंद सर्पे, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.         उत्तम कानिंदे यांनी बुद्धवंदना घेतली व सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  केले. याप्रसंगी  प्रा. चंदेले, प्रा.डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्रा.डॉ.सुनिल व्यवहारे, प्रा. रविकांत सर्पे, प्रा.राजू राठोड,ऍड. मिलिंद सर्पे, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी त्यां

किनवट -अदिलाबाद या आंतरराज्य मार्गावर असलेल्या ध्यानभुमी येथे सम्राट अशोक, महात्मा जोतीराव फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी

प्रतिनिधीं:-   किनवट-आदीलाबाद या आतंरराज्य मार्गावर असलेल्या महाध्यान भूमी महाविहार,तामसी,जिल्हा आदीलाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न,बोधिसत्व,  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महान बौद्ध सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती दिनांक २४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  जयंती सोहळ्याचे उद्घाटक  बोथ मंडळाचे आमदार श्री.बापुराव राठोड यांच्या हस्ते या तिन्ही महामानवांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  महाध्यान भूमी महाविहार केंद्राचे अध्यक्ष भन्ते  शाकू बोधीधम्मा व संस्थेचे पदाधिकारी यांच्या आमदार श्री बापूराव राठोड यांचा शाल,पुष्पहार व "भगवान बुद्ध आणि त्यांचा उपदेश " हे ग्रँथाचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भन्ते शाकू बोधीधम्मा यांनी बोथ मंडळाचे आमदार यांना महाध्यान भूमी महाविहार परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन केली आहे. या परिसराचे सुशोभीकरण करण्याकरिता माझ्या आमदार निधीतून कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार बापुराव राठोड यांनी भन्ते यांना सांगितले आहे.  यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किशनराव ठमके,सचिव

बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक ,नाटककार डॉ. अंबादास कांबळे यांच्या जाण्याने साहीत्य व सांस्कृतीक चळवळ पोरकी झाली

  किनवट : राजर्षी शाहूनगर, गोकुंदा येथील रहिवाशी प्रख्यात नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयातील जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंबादास तोलाजी कांबळे ( वय 56 वर्षे ) यांचे शुक्रवार (दि. 23 एप्रिल 2021 ) राजी रात्री 10 वाजता नांदेड येथे  निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.         प्राणीशास्त्रात त्यांनी पी.एच.डी. घेतली होती परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नाट्यशास्त्रात पदवी घेऊन रंगभूमीवरील आपली आवड सिद्ध केली होती. विविध विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांच्या एकांकिकांनी पारितोषीके पटकाविली आहेत.        देशभरातील विविध विद्यापीठातून त्यांनी शोध निबंध वाचले होते. साहित्य अकादमी, नवी दिल्लीने प्रकाशित केलेल्या एकांकिका संग्रहात त्यांच्या एकांकिकेचा समावेश केला आहे. त्यांचा " गाव हरवलेली माणसं आणि इतर एकांकिका " हा एकांकिका संग्रह प्रकाशित झाला आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामात आंबेडकरी स्वातंत्र्य सैनानींचे ( कार्यकर्त्यांचे ) योगदान हा नाट्यग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.        अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य स

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्रवास सेवा

 मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या सयुंक्त विद्यमाने मुंबई पोलीस, डॉक्टर,नर्स, वार्डबॉय, गरजू नागरिक व पत्रकार यांना लाॅकडाऊन काळात मुंबईमध्ये मोफत रिक्षा प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री महोदयांनी 'ब्रेक दि चेन' या  कोरोना महाभयंकर विषाणूचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी  केलेल्या आवाहनाला साथ देण्यासाठी "सलाम तुमच्या कार्याला" या उक्ती प्रमाणे एक मदतीचा हात म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई (बोरीवली) विभागातील आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देणारे मुंबई पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, गरजू नागरिक आणि पत्रकार यांना लाॅकडाऊन काळात मुंबईमध्ये मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या दोन रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गरजेनुसार रिक्षा वाढवल्या जाणार आहेत. या मोफत प्रवासाचा  गरजूनी लाभ घ्यावा व संघटनेला सहकार्य करावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर व मुंबई संपर्क

कायद्याची माहिती: भाग-३ शेतात जाण्यासाठी रस्ता मागणी आणि रस्‍ता बेकायदेशीर रित्या अडविणे विलास सुर्यवंशी किनवट

  किनवट (तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र हा सुजलाम-सुफलाम झालाच पाहिजे हे स्वप्न आपण सर्व मराठी माणूस हाती घेऊन आपली शेती करतो किंबहुना आपल्या शेतीतून उत्पन्न घेत असताना आपण आपल्या शेतीशी निगडित असलेले प्रश्न शासनाच्या माध्यमातून तसेच सामाजिक परंपरेच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी सुखी तर जग सुखी या म्हणीप्रमाणे आपण आपल्या शेतकरी बांधवाच्या सेवेसाठी सदैव तयार असणे हे अभिप्रेत आहे. मित्रांनो अशाच काही प्रश्न पैकी एक प्रश्न म्हणजे "रस्ता" होय मित्रांनो मानव हा नैसर्गिक रित्या एकमेकावर अवलंबून आहे हे सत्य आपण स्वीकारले तर आपल्याला असा कोणताच प्रश्न अवघड जाणार नाही आणि प्रत्येक गोष्ट ही मानव निर्मित आहे म्हणजेच सरकार सुद्धा मानवाने निर्माण केलेला आहे कायदे सुद्धा मानवाने निर्माण केलेले आहे. या एकमेकाच्या अवलंबी ते पोटी मानव हा नेहमी सर्जनशील असतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निव्वळ रस्त्यामुळे शेतीच्या कामाला खीळ बसलेली  असते मित्रांनो परवाच वर्तमान पत्रा मध्ये बातमी वाचली "शेतात जाण्यासाठी रस्ता द्या अन्यथा हेलिकॉप्टर द

कोव्हीड केअर सेंटर गोकुंदा येथील ऑक्सीजन प्लांटची तपासणी

प्रतिनीधी किनवट:- कोव्हीड १९ च्या पार्श्वभुमीवर रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासु नये म्हणुन व कोव्हीडचा प्रभाव कमी व्हावा या अनुशंगाने किनवट तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय क्षेत्रा जवळील सेंटर ऑक्सीजन प्लांटची उपविभागिय पोलिस अधिकारी मंदारजी नाईक व टिम, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, अग्निशमन दलातील प्रमुख कर्मचारी टिम, नगर परीषद कर्मचारी , डॉ. विकास जाधव यांनी सुरक्षाच्या दृष्टीने पाहणी व तपासणी केली.

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकत्र आलेल्या युवकांनी प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जंयती नावीन्य उपक्रमातुन केली साजरी .... वृतांत ✍️राजेश पाटील

  प्रतिनिधी किनवट/ माहुर:- ज्या मौर्य सम्राट अशोकांनी सर्व भारतावर व भारताच्या बाहेर देखील अधिराज्य गाजवले २६९ ते २३२ एवढा प्रदीर्घ क़ाळ त्यांनी संपुर्ण भारतीय उपखंडावर राज्य केले कलींग युध्दातील रक्तपातानंतर उद्विग्न झालेले सम्राट अशोक हे बुद्ध धम्माकडे वळले व धम्माचा प्रचार केले त्यांनी त्यांच्या हयातीत ८४००० स्तुपांचे निर्माण केले व बौध्द धम्म सर्व जगात पोहचवला म्हणुन त्यांचा धम्म ध्वज भारताने राष्ट्रध्वज व अशोक स्तंभ राजमुद्रा म्हणुन स्विकारली अशा याच कार्याचा वसा घेत  महान सम्राटांची १७१७वी जंयती किनवट- माहुर तालुक्यातील युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकत्र येत सम्राट अशोकांची प्रतिमा प्रत्येक नगरात व विहारास भेट दिली  तालुक्यातील घोटी, सिध्दार्थ नगर, विद्यानगर, गोकुंदा, शाहु नगर, आंबेडकर नगर, कोठारी, अंबाडी, तक्षशिला विहार, वझरा(बु), अशा ठिकाणी प्रतिमा भेट देऊन तथागत गौतम बुध्द व अशोकांचे विचार पेरले यावेळी प्रतिक मुनेश्वर, अमोल नायक, शंतनु कांबळे, अमोल शेंद्रे, अनुपम वासाटे, इंजि. सचीन गिमेकार, सिध्दांत , पवन, निलेश उमरे, विशाल मुनेश्वर आदींनी या साठी परिश्रम घेतले.

नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क सेनीटायझर वाटप करुन साजरा

किनवट :(तालूका प्रतिनिधी)         किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या वाढदिवसा निमीत्त दि. 21 रोजी  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सामाजीक अंतर राखत किनवट पोलीस स्टेशन येथे आनंद मच्छेवार मित्र मंडळातर्फे उपयुक्त मास्क व सॅनिटाइझर चे वाटप करण्यात आले.         सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा आनंद मच्छेवार यांचा मानस होता. ह्याचा विचार करुन मित्र मंडळाने किनवट पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या उपस्थितीत त्यांचे संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी कोरोना महामारीत उपयुक्त मास्क व सॅनिटाइझर चे वाटप केले.         या वेळी भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र भातनासे, तालुका संयोजक बाळकृष्ण कदम, सुनिल मच्छेवार, जगदीश तिरमनवार, किरन कस्तुरवार, आकार रेड्डी, नरसिंग तक्कलवार, गणेश बिरेवार, बालाजी यंम्मलवार आदी उपस्थित होते.

कायद्याची माहिती भाग: २ जमीन मोजणी: फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती कशी करावी.

Article  महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो आपण आपली शेती करतो शेती करत असताना शासन हे आपल्याकडून महसूल गोळा करते तो  योग्यरीतीने जमा करता यावा किंबहुना शेतकऱ्याची सदर जमिनीवर मालकी अबाधित राहावी यासाठी सरकारने "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता", हा अतिशय महत्त्वाचा अधिनियम बनवलेला आहे त्या अधिनियमांतर्गत शेतीच्या संदर्भातील सर्व कायदे बनवण्यात आलेले आहेत. शेतीच्या जमिनीच्या कामकाजाच्या वेळी अनेकदा आपण फेरफार हा शब्द ऐकत असतो, पण आपल्या पैकी बरेच जणांना फेरफार म्हणजे काय, त्याचे प्रकार किती असतात, किंवा त्याच्या नोंदी कशा करतात या बद्दल काहीच माहिती नाही. आणि म्हणुनच आज आपण फेरफार बद्दल माहिती जाणून घेऊ. फेरफार म्हणजेच नाव नमुना नं 6 मधील नोंदी म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही.या नोंदवहीत जमिनीचे सर्व व्यवहार, वारस, खरेदी विक्री, तारीख खरेदी रकमा व संबंधित माहिती तपशीलवार मिळते. या फेरफार नोंदवाहिवरील नोंदीच ७/१२ वर येतात. ७/१२ वर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं ६, फेरफार ची नोंदवही अस म्हणतात.अनेक ठिकाणी हा नमुना ड म

वाढत्या घटना पाहता महावितरण कर्मचाऱ्यांना विद्युत टुल किट्स पुरवावे व कार्यालयात मनुष्यबळ वाढवावे

✍️राजेश पाटील/ किनवट:- किनवट येथील महावितरण कार्यालयात एकुण कार्यरत कर्मचारी संख्या १२ आहे त्या पैकी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपतकालीन परीस्थीत  काम करणारे ४ कर्मचारी आहेत त्यापैकी बाह्यस्त्रोत कर्मचारी १ आहे तर किनवट शहरातील एकुण ग्राहक संख्या १५०००च्या वर आहे  किनवट तालुक्यातील मांडवी व सारखणी येथील नुकतेच घडलेल्या घटना पाहता महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे( हॅन्डग्लब्ज , टुलकीट, शॉटींग रॉड, किटकॅट लग्ज, कॉपर वायर) अशा अन्य विद्युत संसाधणाची आवश्यकता आहे असे महावितरण कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी सत्य परीस्थीतीचे मनोगत सांगीतले कुठे वायर स्पार्क झाला डिपीवर फ्युज मध्ये कॉपर एवजी  अॅल्युमिनीयम तार वापरावी लागते ती जळाल्यास  पुर्ण फिडर बंद करुन काम करावे लागते  व कमी मनुष्यबळ अभावी तीन ते चार लोकावर ताण येतो त्यामुळे सहायक अभियंत्यानी वरीष्ठांशी चर्चा करुन कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधन सामग्री टुल किट्स पुरवावी त्यामुळे कार्यालयातील कामाचे योग्य नियोजन होईल असे कर्मचाऱ्यांचे म्हणने  आहे. ठळक मुद्दे:- ◼️हॅन्डग्लब्ज , टुलकीट, शॉटींग रॉड, किटकॅट लग्ज, कॉपर वायरचा पुरवठा व

2021 : पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पाचव्या टप्प्यात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत... कोलकाता : देशातील वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज (शनिवारी) पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान याअगोदर पार पडलंय तर अजून १५९ जागांवर मतदान बाकी आहे. मतदानाच्या चौथ्या टप्प्यात सितलकुची भागात झालेल्या गोळीबारानंतर निवडणूक आयोगानं पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचा प्रकार घडल्याचं दिसून येतंय.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने फुटपाथवरील कुटुंबाना नास्ता व आर्थिक मदत

  ठाणे : ‘ब्रेक दि चैन ‘ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. पण या संचारबंदीचा फटका फुटपाथवरील कुटुंबाना बसल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने संचारबंदी व कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून ठाणे येथील साई बाबा मंदिर, वर्तकनगर व इतर ठिकाणी फुटपाथवर जीवन जगणा-या ३०० कुटुंबाना नास्ता व आर्थिक मदत करण्यात आली.  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, ठाणे जिल्हा युवा महिलाध्यक्षा ज्योती अहिरे, पत्रकार अभिजीत मोपकर, पत्रकार नितीन सागवेकर आदी पदाधिका-यांनी विशेष परिश्रम  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंबीय व इतर गोर गरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करीत आहे. ज्यांच्या हातातोडांची गाठच पडत नाही असे फुटपाथवर आपलं आयुष्य संघर्षमय पद्धतीने जगणा-या कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सातत्याने पुढाकार घेत आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रेस

कायद्याची माहिती भाग १ Article पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल? FIR म्हणजे काय? FIR कोण दाखल करु शकतो? तक्रारदार महिला असेल तर.?

पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल? FIR म्हणजे काय? FIR कोण दाखल करु शकतो? तक्रारदार महिला असेल तर.? FIR म्हणजे First Information Report, प्रथम खबर अहवाल या बद्दल आपण सगळ्यांनी च ऐकलं आहे पण FIR म्हणजे नक्की काय असतो, तो कसा करायचा किंवा पोलिसात तक्रार कशी दाखल करायची हे आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच FIR म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ. प्रथम माहिती अहवाल म्हणजे झालेल्या गुन्ह्याविषयी पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून तिच्या आधारे पोलीस तपस करण्यास सुरु करतात.जी कोणी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्वात पहिले पोलिसांना देते त्या व्यक्तीच्या नाव व सहीने प्रथम माहिती अहवाल दाखल होतो. त्याची एक प्रत त्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे. भारतीय कायद्यामध्ये गुन्ह्याचे दोन प्रकार पडतात १.दखलपात्र गुन्हा, २.अदखलपात्र गुन्हादखलपात्र गुन्हयामध्ये चोरी, घरफोडी, मोटरवाहनचोरी,अपघात, सोनसाखळी चोरी, हल्ला, बलात्कार, हल्ल्याचा प्रयत्न, खंडणी हे दखलपात्र गुन्हे आहेत.अशा गुन्ह्यात पोलीस आरोपीला वॉरंट शिवाय अटक करु शकतात, तसेच कोर्टाच्या आदेशाशिवाय पोलीस केस चा तपास कर

टिपू सुलतान ब्रिगेड, यवतमाळ तर्फे नरसिंहानंद सरस्वती विरुद्ध तक्रार दाखल

    यवतमाळ प्रतिनिधी:- दि. 2 एप्रिल, 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रेस क्लब द्वारे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दीपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती नावाच्या एका साधू वेषातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जगाला प्रेम, मानवता आणि शांतीचा संदेश देणारे महामानव इस्लामचे शेवटचे प्रेषित मुहम्मद स. अ. स. यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा घोर अपमान केला आहे. त्याचा तो विडीओ सोशल मीडिया वर वायरल सुद्धा झालेला आहे. प्रेषित मुहम्मद स. अ. स. यांच्या प्रती जगातील सर्व जाती आणि धर्मातील लोकांमध्ये अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यामुळे  नरसिंहानंद सरस्वती बद्दल लोकांमध्ये, विशेषतः मुस्लीम समुदायामध्ये प्रचंड रोष आहे. नरसिंहानंद सरस्वतीने जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखविण्याचा आणि समाजात दुही व तेढ निर्माण करून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी नरसिंहानंद सरस्वतीवर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल अटक करण्यात यावी अशी तक्रार टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. जहीरुद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनाखाली टिपू सुलतान ब्रिगेड, जिल्हा यवतमाळच्या वतीने उमरखेड पोलीस ठाण्यात देण्य