Skip to main content

शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी बांधव खावटी अनुदानापासुन वंचीत- भाजपा अनसुचीत जमाती मोर्चा नादेंड ग्रा. मोर्चाचे सहायक जिल्हाधिकारी , प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

ता. प्र. किनवट:-

राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदीवासी बांधवांना खावटी अनुदान वंचित असल्याने त्यांना त्वरीत खावटी अनुदान द्यावे असे भाजप नांदेड ग्रामिण अनु.जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण मार्फत निवेदन ता.३०रोजी देण्यात आले.

 किनवट माहुरचे लोकप्रिय आमदार व भाजप अनुसुचीत जमाती मोर्चा ग्रामिण महाराष्ट्र  यांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठवले आहे .


या खावटी अनुदान वाटप संदर्भात खालील मागण्यांचा समावेश

१) खावटी अनुदान प्रति ४०००रू.लाभार्थ्याच्यां (DBT)थेट बँक खात्यात जमा करावे.

२) आदीवासी बांधवाना वस्तु खरेदी ऐच्छीक करण्याबाबत 

वस्तु, धान्य, किराणा, स्वरूपाच्या मटकी , चवळी ,हरभरा,वटाणा, उडीद, तुरदाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला , मिरची पावडर, मीठ , चहा, ई. मानवी जीवनावश्यक वस्तु करीता प्रती २००० नमूद आहे ती आदीवासी बांधवाना ऐच्छीक असावी 

३) आदीवासी बांधवाना निरक्षर समजु नये

४) स्थानिक पातळीवर हक्क देण्यात यावे 

अशा मागण्या आहेत या निवेदनावर

आमदार भीमराव केराम, गोवींद अंकुलवार, नादेंड ग्रामीण अ.ज. मोर्चा जिल्हाध्यक्ष , जितेंद्र कुलसंगे, ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कनाके, डि.जी. भीसे, रमेश परचाके, संतोष प्र. पहुरकर , शंकर सिडाम, साई नैताम आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.






Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.