Skip to main content

कायद्याची माहिती भाग १ Article पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल? FIR म्हणजे काय? FIR कोण दाखल करु शकतो? तक्रारदार महिला असेल तर.?



पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल? FIR म्हणजे काय? FIR कोण दाखल करु शकतो? तक्रारदार महिला असेल तर.?


FIR म्हणजे First Information Report, प्रथम खबर अहवाल या बद्दल आपण सगळ्यांनी च ऐकलं आहे पण FIR म्हणजे नक्की काय असतो, तो कसा करायचा किंवा पोलिसात तक्रार कशी दाखल करायची हे आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच FIR म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊ. प्रथम माहिती अहवाल म्हणजे झालेल्या गुन्ह्याविषयी पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून तिच्या आधारे पोलीस तपस करण्यास सुरु करतात.जी कोणी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्वात पहिले पोलिसांना देते त्या व्यक्तीच्या नाव व सहीने प्रथम माहिती अहवाल दाखल होतो. त्याची एक प्रत त्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे. भारतीय कायद्यामध्ये गुन्ह्याचे दोन प्रकार पडतात १.दखलपात्र गुन्हा, २.अदखलपात्र गुन्हादखलपात्र गुन्हयामध्ये चोरी, घरफोडी, मोटरवाहनचोरी,अपघात, सोनसाखळी चोरी, हल्ला, बलात्कार, हल्ल्याचा प्रयत्न, खंडणी हे दखलपात्र गुन्हे आहेत.अशा गुन्ह्यात पोलीस आरोपीला वॉरंट शिवाय अटक करु शकतात, तसेच कोर्टाच्या आदेशाशिवाय पोलीस केस चा तपास करू शकतात. या साठी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करावा लागतो. दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद नोंदविल्यावर FIR ची  प्रत फिर्यादीस विनामूल्य देण्यात येते. अदखलपात्र गुन्ह्यामध्ये किरकोळ गुन्हे येतात. अशा गुन्हामध्ये वॉरंट शिवाय आरोपीला अटक करता येत नाही. तसेच कोर्टाच्या आदेशाशिवाय केसचा तपास सुरू करता येत नाही.अदखलपात्र गुन्हा पोलीस किरकोळ प्रकरणात दाखल करतात. अशा प्रकरणात खटला चालविण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करू शकत नाही. FIR हा अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीनेच नोंदवावा असे नाही, तर अत्याचाराला सामोरे गेलेल्या व्यक्तीच्या वतीने त्याचे नातेवाईक, पालक, मित्र मैत्रिणी देखील FIR साक्षीदार म्हणून नोंदवू शकतात.तुम्हाला तक्रार कोणत्याही पोलीस स्थानकात नोंदवता येतो, ज्या हद्दीत गुन्हा घडला त्याच हद्दीतील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवा अशी सक्ती पोलिस करू शकत नाहीत. तक्रार नोंदवून ती योग्य त्या पोलीस स्थानकात वर्ग करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. तुम्ही तक्रार दाखल करायला गेल्यावर लिखित स्वरूपात ही तुमची तक्रार दाखल करू शकता. अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवरूनही करता येते.मात्र दखलपात्र गुन्हा असो किंवा अदखलपात्र FIR किंवा एन सी ची प्रत तक्रारदाराला तातडीने देणे बंधनकारक आहे. पोलिसांना गुन्ह्याची माहिती लेखी किंवा तोंडी स्वरूपात देता येते, जेव्हा तक्रार तोंडी दिली जाते तेव्हा तिचे लिखित स्वरूपात रूपांतर करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. गुन्ह्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीचा जबाब तिच्याच शब्दात लिहणे आवश्यक आहे. तक्रार व जबाब लिहून झाल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस जी भाषा कळते त्या भाषेत समजावून सांगून त्यावर सही घेणे आवश्यक आहे.(फौजदारी प्रक्रिया संहिता कलम१५४(१)) अत्याचारपीडित व्यक्ती स्त्री असेल व ती स्वतः गुन्हा नोंदवत असेल तर प्रथम खबर अहवाल महिला पोलीस अधिकारी किंवा कुठल्याही महिला अधिकारी यांच्याकडून नोंदवला जावा (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५४). महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्यास पुरुष पोलीस अधिकारी यांनी  महिला हवालदार यांच्या उपस्थितीत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. महिला तक्रारदारांना रात्रीच्या वेळी फोन वरून तक्रार नोंदवण्याचा अधिकार आहे.अशावेळी महिला पोलीसांच्या उपस्थित तक्रार नोंदवून घेऊ शकतात. चौकशी व जबाब नोंदवताना अपमानास्पद वाटेल, लाज वाटेल अथवा त्यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल, त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण होईल असे प्रश्न पोलीस विचारू शकत नाहीत. एकदा पोलिसांना घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती दिल्यावर पीडित व्यक्तीला योग्य वाटेल अशा ठिकाणीच तिचा जबाब नोंदवणे पोलिसांची जबाबदारी आहे. सदर ठिकाण म्हणजे पीडित महिलेचे घर, हॉस्पिटल, किंवा इतर कुठलीही जागा असू शकते.पोलिसांकडे खोटा गुन्हा दाखल करणे हा गुन्हा आहे. गुन्हा दाखल करताना पोलिसांना खोटी अवास्तव माहिती देणे, त्यांची दिशाभूल करणे हा भारतीय दंड संहितेनुसार अपराध ठरतो. खोटा FIR देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. भारतीय दंड विधानाच्या कलम १४२ नुसार ज्या पोलीस अधिकाऱ्याने खोटा FIR दाखल करून घेतला त्याच्यावर देखील कारवाई होते व अधिकारी शिक्षेस पात्र ठरतो. परंतु पोलिस यंत्रणा ही स्वतंत्र अशी यंत्रणा आहे ती निप:क्षपातीपणे तिचे काम करत असते दुर्दैवाने पोलीस यंत्रणेच्या हातून शक्यतो चूक होत नाही, जर चूक होण्याची शक्यता असल्यास ज्या पोलिस अधिकाऱ्याने चूक केली आहे त्या पोलिस अधिकाऱ्यावर त्याच्या वरिष्ठांकडून कठोर अशी कारवाई होते. पोलीस विभाग हे जनतेच्या संरक्षणासाठी निर्माण झाले असल्याकारणाने ते सतत जनतेच्या हिताचा विचार करत असतात परंतु म्हणतात ना "पाची बोटं सारखी नसतात" म्हणजेच "व्यक्ती तेवढ्या प्रवर्ति" पोलीस विभागातही असे महाभाग असू शकतात जे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा असे होते त्यावेळेस समाजातील सज्जन हा निष्पाप नसतो. म्हणून बेकायदेशीर कृती समाजातील सज्जन व्यक्ती टाळू शकतो, म्हणतात ना दुर्जनांच्या अयोग्य कृती पेक्षा सजना चा शांतपणा समाजाला जास्त धोकादायक असतो. तर मित्रांनो एखादा एफ. आय. आर. जर खोटा दाखल झाला तर आपण तो एफ. आय. आर .सन्माननीय उच्च न्यायालयात दाद मागून रद्द करता येतो. पोलिस यंत्रणा ही नागरिकांच्या  हितासाठीच काम करत असते,  हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे पोलिसाच्या हातून ज्यावेळेस एखादे बेकायदेशीर कृत्य होते, त्या कृत्याला कठोर अशी शिक्षा आहे. या मध्ये दुमत नाही परंतु याचा अर्थ असा होत नाही की, समाजातील गुन्हेगार हे पोलिसांना वेठीस  धरतील,  गुन्हेगाराला त्याच्या कृतीप्रमाणे वागणूक मिळालीच पाहिजे म्हणजेच कायद्यात सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, समाजाचा समतोल राखण्याचे काम म्हणजे समाजात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत होत असते. नि:पक्ष पोलीस यंत्रणेला आपण शंकेच्या नजरेतून पाहण्याऐवजी, त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे याचा अर्थ असाही होत नाही की  अयोग्य कृती करणाऱ्या पोलीस विभागातील महाभागाला पाठीशी घालने, जर आपण सज्जन नागरिक शांत राहिलो तर आपण निर्माण केलेल्या कायद्याला काहीच अर्थ राहणार नाही. तेव्हा मित्रांनो खोट  एफ. आय. आर. नोंदवणे म्हणजे गुन्हाच  आहे.  असे आपल्याला म्हणावे लागेल उपरोक्त लेखाद्वारे लेखक हा वाचकाला त्याच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलीस एजन्सीचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न करत आहे.


विलास सुर्यवंशी 

मारेगाव (खा) ता.किनवट 

मो.9922910080 

Advertisement जाहिरात:





Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला