नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क सेनीटायझर वाटप करुन साजरा
किनवट :(तालूका प्रतिनिधी)
किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या वाढदिवसा निमीत्त दि. 21 रोजी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सामाजीक अंतर राखत किनवट पोलीस स्टेशन येथे आनंद मच्छेवार मित्र मंडळातर्फे उपयुक्त मास्क व सॅनिटाइझर चे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा आनंद मच्छेवार यांचा मानस होता. ह्याचा विचार करुन मित्र मंडळाने किनवट पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या उपस्थितीत त्यांचे संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी कोरोना महामारीत उपयुक्त मास्क व सॅनिटाइझर चे वाटप केले.
या वेळी भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र भातनासे, तालुका संयोजक बाळकृष्ण कदम, सुनिल मच्छेवार, जगदीश तिरमनवार, किरन कस्तुरवार, आकार रेड्डी, नरसिंग तक्कलवार, गणेश बिरेवार, बालाजी यंम्मलवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment