पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पाचव्या टप्प्यात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत...
कोलकाता : देशातील वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज (शनिवारी) पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान याअगोदर पार पडलंय तर अजून १५९ जागांवर मतदान बाकी आहे.
मतदानाच्या चौथ्या टप्प्यात सितलकुची भागात झालेल्या गोळीबारानंतर निवडणूक आयोगानं पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचा प्रकार घडल्याचं दिसून येतंय.
Comments
Post a Comment