Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी रामजी कांबळे यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन

✍️राजेश पाटील  (किनवट/गोंकुदा प्रतिनिधी): स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन मातोश्री कमलताई ठमके सभागृह गोकुंदा येथे  ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता  रामजी कांबळे यांच्या  'विप्लव', 'आतंक', 'शीलगंध' 'निसर्ग', 'जीवन का कालचक्र' या पाच काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे . या प्रकाशन सोहळ्यास अभियंता प्रशांत ठमके ( भा. बौ. स. ता. अध्यक्ष किनवट), डॉ. अशोक गायकवाड (राष्ट्रीय सरचिटणीस अ.भा. बौद्ध उपासक संघ औरंगाबाद), (गझलकार मधु बावलकर अदिलाबाद), अभि. भीमराव हटकर नांदेड), डॉ. अंबादास कांबळे सरचिटणीस अ.भा. बौद्ध उपासक संघ म. रा .), ॲड. मिलींद सर्पे, उत्तम कानिंदे , महेंद्र नरवाडे, रमेश मुनेश्वर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे तथा प्रा. सुरेश पाटील , अनिल उमरे व संच यांचा बुद्ध भीमवाणी प्रबोधन गीतांचा कार्यक्रम  होणार आहे .

माहूर नगरपंचायत च्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वृक्षारोपण.

( प्रतिनिधी माहूर ,) दि: २२:- महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्रालयाकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कालावधीत पृथ्वीस जल,वायू,अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे व स्वच्छ हरित पर्यावरणा बाबत जनजागृतीसाठी माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे.त्याचाच भाग म्हणून २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता हरित शपथ देऊन नगराध्यक्षा कु.शीतल मेघराज जाधव, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्षा कु. शितल मेघराज जाधव. मा.उपनगराध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तूपडाळे. मा. नगसेवक राजकुमार भोपी. नगरसेविका शकीला बी. नगरसेवक राजेंद्र केशव सर, दीपक कांबळे, रफिक सौदागर, विनोद कदम, रहमत भाई, माझी वसुंधरा अभियान प्रमुख गंगाधर दळवे, शहर समन्वयक कु. प्रणाली मुजमुले. सुरेंद्र पांडे, देविदास जोंधळे, गणेश जाधव, विजय शिंदे व संपूर्ण कर्मचारी नगर पंचायत माहूर. उपस्थित होते.

किनवटच्या शिक्षकाचा प्रामाणिकपणा ! एसबीआय बँकेची जास्त आलेली रक्कम परत केली

 किनवट येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षक असलेल्या सुबहान चव्हाण यांनी  बँकेला परत करून इमानदारीचा आदर्श घालून दिला आहे. सुभान चव्हाणांच्या या प्रामाणिकपणाचे बँक कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून कौतुक होत आहे. झाले  असे की किनवट येथे उर्दु शाळेमध्ये शिक्षक  असलेले सुबहान चव्हाण यांचे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे.  दिनांक 18 डिसेंबर रोजी त्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे ते आपल्या खात्यातील 3 लाख 40 हजार रुपये उचल करण्यासाठी बँकेत गेले.  तेथे पैसे उचलण्याची स्लिप भरून दाखल केली  असता संबंधित कर्मचाऱ्याने नजरचुकीने 340000 रक्कमे ऐवजी 3 लाख 80 हजार रुपये सुबहान चव्हाण यांच्या हातात दिले.  रक्कम मोठी असल्यामुळे चव्हाण यांनी मोजणी न करता पूर्ण रक्कम बॅगमध्ये टाकून घरी परतले  घरी आल्यानंतर पैशाची बॅग जशीच्या तशी कपाटात ठेवून ते नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी  बाहेरगावी गेले.  कार्यक्रम आटोपून रविवारी घरी परतल्यानंतर त्यांनी बँकेतून उचललेल्या पैशाची मोजणी केली असता 40 हजार रुपयाची रक्कम  अधिक आल्याचे त्यांच्या लक्षात आले परंतु 40 हजार रु जास्त आले म्हणून उल्हासित न होता सुबहाण चव्हाण यांनी तात

सावित्रीबाई फुले यांची जयंती "महिला शिक्षण दिन" म्हणून साजरी होणार......

 ( मुंबई वृतसेवा ): महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फुले दाम्पत्याने केले  त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा ( ३ जानेवारी ) जन्मदिन "महिला शिक्षण दिन" म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे.

किनवट : किनवट नगर परीषद तर्फे १८ डिसेंबर रोजी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्लास्टीक वेचा मोहीम स्वच्छता अभियान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले या वेळी नगर परिषदेचे कर्मचारी सफाई कामगार मोहीम राबवतांना. (छाया: राजेश पाटील)

(किनवट : ता. प्रतिनिधी) किनवट शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा योजने अंतर्गत किनवट नगर परिषदेच्या वतीने दिनांक 18 डिसेंबर रोजी प्लास्टिक वेचा मोहीम अभियान तथा स्वच्छता अभियान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,शिवा क्यातमवर, बालाजी धोत्रे, मधुकर अन्नेलवार , राजेंद्र भातनासे,चंद्रकांत दुधारे,अभियंता मरकुले अजहर अली, अब्दुल अल्ताफ, मोहम्मद अली ,स्टॅलिन आडे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी सर्व सफाई कामगार उपस्थित होते.

विना परवाना आरो प्लांट चालकाला नगरपालिकेची नोटीस कागदपत्रे सादर करा; अन्यथा आरो प्लांट सील – मुख्याधिकारी

 किनवट/ता.प्रतिनिधी- शहरातील १३ जल शुद्धीकरण केंद्र (आरओ प्लांट) मालकांना नगरपरिषद प्रशासनाकडून नोटिसा बजावल्या असून, महाराष्ट्र प्रदूषण विभाग, भूजल सर्वेक्षण व अन्न, प्रशासनाची परवानगीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेची कागदपत्रे सादर करण्याचे नगरपरिषद प्रशासनाने सूचित केले आहे. अन्यथा प्लांटलाच सील करण्याचा इशारा दिला आहे. नपाच्या या नोटिसामुळे मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्य शासनाचे प्रदूषण नियंत्रण विभाग, अन्न व प्रशासन आणि भूजल सर्वेक्षण या तिन्ही यंत्रणांच्या परवानगीशिवाय किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी आरओ व पाणी फिल्टर प्लांट सरार्सपणे सुरू असल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे नागरिकांच्या आरोग्याच प्रश्न निर्माण झाल्याचा तक्रारी यंत्रणांकडून आल्या आहेत. विंधन विहिरीचे पाणी केवळ थंड करून ते वाटर फिल्टरच्या नावावर खपवून नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट केली जात असल्याची ही अनेक तक्रारी आहेत. या प्लांट मालकांनी खरोखर नियमानुसार हे प्लांट सुरू केले आहेत की, शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे सुरू केले आहेत. याची खातरजमा करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना

एडव्होकेट.कु. रक्षा नगराळे यांना बेटी फाऊंडेशनचा समाज भुषण व कविरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

  (यवतमाळ/ राळेगाव प्रतिनिधी): बेटी फाऊंडेशन वणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२० समाजरत्न व कविरत्न असे दोन पुरस्कार राळेगाव जि. यवतमाळ येथील साहित्यिक लेखिका अॅड.रक्षा बबन नगराळे यांना साहित्य क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या उत्कृष्ट विविध विषयावरील लेख व काव्य लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांचे लिखाण समाजातील विविध चित्रण तसेच महीला विषयक , विद्रोह, प्रेम, मराठी वाडःमय , फुले, शाहु,आबेंडकरी चळवळी बद्दलचे साहीत्य याची दखल घेऊन बेटी फाँऊंडेशनच्या संस्थापिका प्रिती माडेकर, सचिव विनोद दरेकर यांच्या तर्फे हा सन्मान दिल्या गेला या पुरस्कारा बद्दल अमोलकचंद विधी महाविद्यालय यवतमाळच्या प्राचार्या सुप्रभा यादगीरवार, प्रा.विजेश मुनोत, प्रा. संदीप नगराळे महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद    यांनी मार्गदर्शन केले या बद्दल त्यांनी अॅड रक्षा नगराळे यांचे त्यांनी कौतुक केले किनवटचे साहित्यिक राजेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व राळेगाव मध्ये आनंद व्यक्त होत आहे

लोक अदालतीमध्ये ५९ प्रकरणे निकाली;१२ लाख,८६हजार,४१ रुपये तडजोडीतून वसूल

किनवट ता.१४ : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने किनवट न्यायालयाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५९ प्रकरणे निकाली निघाली.यात दिवाणी १,फौजदारी ३ व दाखल पूर्व ५५ प्रकरणाचा समावेश होता.तसेच प्रकरणातील तडजोडीतून १२ लाख ८६ हजार ४१ रुपयांची तडजोड रक्कम वसूल झाली.    पँनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश जे.आर.पठाण हे,तर सदस्य म्हणून प्राचार्य वि.मा.शिंदे व एड.पंकज गावंडे यांनी काम पाहीले.   लोक अदालतीमध्ये भारतीय स्टेट बँक, किनवट व सारखणी,महाराष्ट्र ग्रामीण बँक,बोधडी,किनवट,उमरी(बा.)व ईस्लापूर, विद्युत वितरण कंपनी व महेंद्रा फायनान्स ,किनवट यांची प्रकरणे होती.यावेळी न्यायाधीश जे.एन.जाधव,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांच्यासह सरकारी वकील अशोक पोटे, अनंत वैद्य,शंकर राठोड, डी.जी.काळे,अरविंद चव्हाण, यशवंत गजभारे,यु.बी.चव्हाण,टी.आर.चव्हाण, बिपिन पवार,गजानन पाटील,सुनील सिरपुरे,सुनिल येरेकार,दिलिप कोट्टावार,के.एम.राठोड,एम.यु.सर्पे(सर्व वकिल),सुभाष दोनकलवार,पोलिस आदी उपस्थित होते.   यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी एस.एम.चिटमलवार,एल.वाय.मिसलवार,ए.एस.धोटे,एस.व्ही.चटलेवार,बी.ए.घुले,

महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांचा पुतळा तात्काळ बसवा ऑल इंडिया पँथर सेनेचा तीव्र आदोंलनाचा इशारा

  (अर्धापुर : बातमीदार) शहरातील प्रज्ञा बौद्ध विहार प्रांगणात पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊन ही बऱ्याच दिवसापासून  ती मागणी प्रलंबित असून ती तात्काळ पूर्ण करावी यासाठी या अगोदर वंचित बहुजन आघाडी ने निवेदने देऊनही यांवर कोणतेही पाऊल उचलले नाही. यानंतर जर महापुरुषांचे पुतळे उभारले गेले नाही तर ऑल इंडिया पँथर सेना व  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश सावते, वंचित बहुजन आघाडी ता. सचिव आनंद शिनगारे, शरद सरोदे, महेंद्र सरोदे, संतोष पाईकराव,प्रकाश कांबळे, सचिन नरवाडे, गणपत बलखंडे,पप्पू सरोदे, अजय बहादूरे भिमराव शेळके ,विकास सरोदे आदी उपस्थित होते.

ऑल इंडिया पँथर सेनेचे परात भेजो आदोलन समाज कल्याण आयुक्तांना दिले निवेदन

नांदेड प्रतिनीधी: विविध मागण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला परात भेजो आंदोलन करण्यात आले, असे निवेदन व परात समाज कल्याण अयुक्त नांदेड यांना देण्यात आले. यावेळी ऑल इंडिया पँथर सेना उत्तर जिल्हाध्यक्ष बालाजी सावंत, जिल्हा महासचिव भिमराव बुक्तरे, दक्षिण जिल्हाअध्यक्ष किरण फुगारे महेंद्र शिंदे, रजनीकांत सावंत सुजित सूर्यवंशी व इतर जण उपस्थित होते. या होत्या त्यांच्या खालील मागण्या विशेष मागन्या :- - स्वाधार योजनेचा प्रलंबित निधी तात्काळ द्या!  - रमाई घरकुलाला वाढीव निधी तात्काळ द्या! - महामंडळाचे कर्ज माफ करता की नाही, महामंडळाला वाढीव निधी देता की नाय उत्तर द्या! - मागासवर्गीयांना जमिनी, ट्रॅक्टर, विहिरी तात्काळ द्या!  - संविधान मूल्य रुजवणाऱ्या समताधुतांचे थकीत मानधन तात्काळ द्या! - बार्टीच्या पात्र विद्यार्थ्यांची फिलोशिप देता की नाही उत्तर द्या? - सारथीला वेगळा न्याय बार्टीला वेगळा न्याय हा जातीयवाद नाही तर काय हाय? - शिष्यवृत्ती एकदम जमा करा!  - अट्रोसिटी ऍक्ट पीडितांचा निधी देता की नाय उत्तर द्या! - सामाजिक न्याय विभाग आमच्या हक्काचं,

ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 नादेंड जिल्हा प्रतिनिधी: भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त  रविवार ता 6 शहरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने  अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड जिल्हा महासचिव भिमराव बुक्तरे यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आनंद शिनगारे,महेंद्र शिंदे , अंकुश सावते, सुरेश सावते, महेंद्र सरोदे, सतीश हिंगोले,संतोष ढेंबरे शरद सरोदे उमेश सरोदे, गोविंद राऊत आदी  आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते .

नसिर तगाले यांना लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार ने सन्मानित.

  किनवट ता.प्रतिनिधी:    किनवट या आदिवासी तालुक्यात असे अनेक चेहरे आहेत जे की महाराष्ट्रात किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागाचे नाव लौकिक करीत  आहेत.          याच भागातील आज कि न्यूज चे संपादक नसिर तगाले यांनी किनवट तालुक्यासह मुंबई येथील बॉलीवुड फिल्म जगत मध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवत अनेक वर्षापासून या क्षेत्रातील बातम्या जनतेपर्यंत पोहोचविता आहेत          त्या अनुषंगाने सन 2020 मध्ये फिल्म इंडस्ट्रीचा महान पुरस्कार समजल्या जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांना 5 डिसेंबर 2020 रोजी अंधेरी मुंबई येथे हे संपन्न झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार मध्ये  फिल्म जगतचे संगीतकार दिलीप सेन तसेच कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा चव्हाण सर यांच्या हस्ते लीजेंड दादासाहेब फाळके 2020 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.       किनवट सारख्या आदिवासी भागातून माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकारांना एवढा मोठा सन्मान दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.            या सोहळ्यात फिल्म इंडस्ट्रीचे अनेक महान कलाकार उपस्थित होते.

युवा पँथर संघटने तर्फे महामानव डॉ. बाबासाहेबांना १०१ जणांचे रक्तदान करून अभिवादन शिबीरास अनेक मान्यवरांच्या भेटी

  किनवट/प्रतिनिधी दि.6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (ता.6) रविवारी रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले.     प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, संदीप केंद्रे तालुका अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल तिरमनवार, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, सपोनि विजय कांबळे, रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, प्रा.डॉ.अंबादास कांबळे, पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, विवेक ओंकार, अॅड.मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे, प्रा.पंजाब शेरे, रमेश मुनेश्वर, मिलिंद धावारे, प्रकाश नगराळे, प्रा.रविकांत सर्पे, अॅड.सुनील येरेकार, मारोती मुनेश्वर, दशरथ पवार, सुरेश कावळे, उमाकांत कराळे, संतोष मरस्कोल्हे, सुरेश जाधव, दशरथ पवार, किशन परेकार, शंकर नगराळे, गौतम पाटील, पवन सर्पे, सम्यक सर्पे, रवी कांबळे, प्रशिक मुनेश्वर, शुभम भवरे, आकाश सर्पे, विशाल गिमेकार, आनंद कावळे, यांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प

सागांवाकार कविवर्य महेंद्र नरवाडे यांची रचना प्रज्ञावंत भीम

  ✍🏻प्रज्ञावंत भीम✍🏻 अंधा-या कोठडीत कोंडलेल्या मनाचा श्वास भीम होता वादळातील नावेला किणारी हाकणारा नावाडी भीम होता व्याकुळलेल्या रोपांची तहान शमविणारा पाऊस भीम होता ओसाड जमिनीवर उद्दान फुलविणारा माळी भीम होता महाडच्या मैदानी रणशिंग फुंकणारा क्रांतीवीर भीम होता लेखणीच्या जोरावर इतिहास घडविणारा प्रज्ञावंत भीम होता कवी-महेंद्र नरवाडे          किनवट.

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सतीष चव्हाण विजयी

औरंगाबाद, दिनांक 04  :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीष चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले. सतीष चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली.  एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे आहे. अ.क्र. उमेदवाराचे नाव पोस्टल मते पहिली फेरी दुसरी  फेरी तिसरी  फेरी चौथी फेरी पाचवी फेरी एकूण 1. सतीश भानुदासराव चव्हाण   600 27250 26627 26739 26700 8722 116638 2. बोराळकर शिरीष भास्करराव 286 11272 13989 14471 14287 4438 58743 3. अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद 3 93 102 97 94 22 411 4. अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर  5 63 71 75 71 19 304 5. कुणाल गौतम खरात 3 278 359 338 305 171 1454 6. ढवळे सचिन राजाराम 23 2455 2716 2800 3070 638 11702 7. प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ 45 1889 2213 2256 2146 444 8993 8. डॉ.रोहित शिवराम बोरकर 10 192 205 210 210 50 877 9. शेख सलीम शेख इब्राह

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत

  माणगाव : आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नूकतीच क्रीडा कोट्यातून तहसीलदार पदावर नेमणूक करण्यात आली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, माणगाव शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुकाध्यक्ष रिजवान मुकादम, तालुका संघटक प्रसाद देवलेकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. ललिता बाबर यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पी.टी.उषा व कविता राऊत यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम ललिता बाबर यांनी केले आहे. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीपासून सुरूवात करून त्यांनी मॅरेथाॅन स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सलग तीनवेळा त्यांनी मुंबई मॅरेथाॅन जिंकली आहे. मॅरेथाॅननंतर त्यांचं अनेकांना नावही माहिती नसलेल्या तीन हजार

अजय पाटिल 'NET/JRF उत्तिर्ण

किनवट:येथील अजय मारोती पाटील हे यू.जी.सी मार्फत घेण्यात आलेल्या मराठी विषयात अधिव्याख्याता या पदासाठी उत्तिर्ण झाले आहे,याआधी सुद्धा ते इतिहास या विषया मध्ये नेट उत्तिर्ण झाले होते.त्यांच्या या यशाबद्दल डॉ अशोक गीणगिने,डॉ किरण पाईकराव,डॉ राजु मोतेराव,प्रा प्रदीप ऐडके,प्रा किशन मिरासे,प्रा शिवदास बोकडे,प्रा कपील पाटील,राजा तामगाडगे,रमेश पडगिलवार , पत्रकार राजेश पाटील, संजय नरवाडे, विशाल गिमेकार, आदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात 67. 25 टक्के मतदान झाले 🔹अनेक नव मतदार युवक युवतींनी पहील्यांदाच बजावला मतदानाचा हक्क 🔹 मतदाना केल्यांचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडुन वाहत होता

  किनवट / तालुका प्रतिनिधी  : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के मतदान झाले असून ही निवडणूक पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे पार पडली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.         किनवट तालुक्यात  2447 पुरुष, 689 स्त्री असे एकूण 3136 मतदार आहेत. यापैकी 1734 पुरुष, 375 स्त्री व एकूण 2109 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  मतदान केंद्र निहाय झालेले मतदान कंसात एकूण मतदार : मतदान केंद्र क्रमांक 411 किनवट शहर -1 : पुरुष  448(624), स्त्री 120 (225 ) व एकूण 568 (849) टक्के 66. 90,  म.कें क्र.412 किनवट ग्रामीण) : पुरुष 472 ( 647), स्त्री 128 (248) व एकूण 600 (895), म. कें.क्र.413 इस्लापूर : पुरुष 155 (241), स्त्री 21 (35), एकूण 176 (276) टक्के 63.77, म.कें. क्र.414 मांडवी : पुरुष 119 (154), स्त्री 20(27) व एकूण 139 (181) टक्के 76.80, म.कें. क्र. 415 बोधडी (बु ) : पुरुष 209 (294), स्त्री 33 ( 64) व एकूण 242 (358 ) टक्के 67.60, म. कें. क्र. 416 सिंदगी