महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांचा पुतळा तात्काळ बसवा ऑल इंडिया पँथर सेनेचा तीव्र आदोंलनाचा इशारा
(अर्धापुर : बातमीदार)
शहरातील प्रज्ञा बौद्ध विहार प्रांगणात पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊन ही बऱ्याच दिवसापासून ती मागणी प्रलंबित असून ती तात्काळ पूर्ण करावी यासाठी या अगोदर वंचित बहुजन आघाडी ने निवेदने देऊनही यांवर कोणतेही पाऊल उचलले नाही. यानंतर जर महापुरुषांचे पुतळे उभारले गेले नाही तर ऑल इंडिया पँथर सेना व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश सावते, वंचित बहुजन आघाडी ता. सचिव आनंद शिनगारे, शरद सरोदे, महेंद्र सरोदे, संतोष पाईकराव,प्रकाश कांबळे, सचिन नरवाडे, गणपत बलखंडे,पप्पू सरोदे, अजय बहादूरे भिमराव शेळके ,विकास सरोदे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment