(प्रतिनिधी माहूर,)
दि: २२:- महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्रालयाकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कालावधीत पृथ्वीस जल,वायू,अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे व स्वच्छ हरित पर्यावरणा बाबत जनजागृतीसाठी माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे.त्याचाच भाग म्हणून २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता हरित शपथ देऊन नगराध्यक्षा कु.शीतल मेघराज जाधव, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मा. नगराध्यक्षा कु. शितल मेघराज जाधव. मा.उपनगराध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तूपडाळे. मा. नगसेवक राजकुमार भोपी. नगरसेविका शकीला बी. नगरसेवक राजेंद्र केशव सर, दीपक कांबळे, रफिक सौदागर, विनोद कदम, रहमत भाई, माझी वसुंधरा अभियान प्रमुख गंगाधर दळवे, शहर समन्वयक कु. प्रणाली मुजमुले. सुरेंद्र पांडे, देविदास जोंधळे, गणेश जाधव, विजय शिंदे व संपूर्ण कर्मचारी नगर पंचायत माहूर. उपस्थित होते.
Comments
Post a Comment