Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत



 माणगाव : आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नूकतीच क्रीडा कोट्यातून तहसीलदार पदावर नेमणूक करण्यात आली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, माणगाव शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुकाध्यक्ष रिजवान मुकादम, तालुका संघटक प्रसाद देवलेकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. ललिता बाबर यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पी.टी.उषा व कविता राऊत यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम ललिता बाबर यांनी केले आहे. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीपासून सुरूवात करून त्यांनी मॅरेथाॅन स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सलग तीनवेळा त्यांनी मुंबई मॅरेथाॅन जिंकली आहे. मॅरेथाॅननंतर त्यांचं अनेकांना नावही माहिती नसलेल्या तीन हजार मीटर स्टीपलचेस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. या खेळातही त्यांनी आपला ठसा उमटविला. राष्ट्रीय विक्रम तर त्यांनी नोंदवलाच ; पण जखमी असूनही रिओ दी जानरो येथे सन २०१६ मध्ये झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचा पराक्रम केला. त्यांच्या खेळातील या योगदानांबद्दल त्यांना अर्जून पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015 मध्ये स्पोर्टस पर्सन आॅफ दी ईयर हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने क्रीडा कोट्यातून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. सन २०१९ पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्यांची माणगाव येथे परिक्षाविधिन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडू म्हणून काम करतांना पत्रकारांचे सहकार्य सातत्यांने लाभले असल्याची भावना ललिता बाबर यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...