नादेंड जिल्हा प्रतिनिधी:
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त रविवार ता 6 शहरात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड जिल्हा महासचिव भिमराव बुक्तरे यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आनंद शिनगारे,महेंद्र शिंदे , अंकुश सावते, सुरेश सावते, महेंद्र सरोदे, सतीश हिंगोले,संतोष ढेंबरे शरद सरोदे उमेश सरोदे, गोविंद राऊत आदी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते .
Comments
Post a Comment