(यवतमाळ/ राळेगाव प्रतिनिधी):
बेटी फाऊंडेशन वणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२० समाजरत्न व कविरत्न असे दोन पुरस्कार राळेगाव जि. यवतमाळ येथील साहित्यिक लेखिका अॅड.रक्षा बबन नगराळे यांना साहित्य क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांच्या उत्कृष्ट विविध विषयावरील लेख व काव्य लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांचे लिखाण समाजातील विविध चित्रण तसेच महीला विषयक , विद्रोह, प्रेम, मराठी वाडःमय , फुले, शाहु,आबेंडकरी चळवळी बद्दलचे साहीत्य याची दखल घेऊन बेटी फाँऊंडेशनच्या संस्थापिका प्रिती माडेकर, सचिव विनोद दरेकर यांच्या तर्फे हा सन्मान दिल्या गेला या पुरस्कारा बद्दल अमोलकचंद विधी महाविद्यालय यवतमाळच्या प्राचार्या सुप्रभा यादगीरवार, प्रा.विजेश मुनोत, प्रा. संदीप नगराळे महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद
यांनी मार्गदर्शन केले या बद्दल त्यांनी अॅड रक्षा नगराळे यांचे त्यांनी कौतुक केले किनवटचे साहित्यिक राजेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व राळेगाव मध्ये आनंद व्यक्त होत आहे
Comments
Post a Comment