Skip to main content

किनवटच्या शिक्षकाचा प्रामाणिकपणा ! एसबीआय बँकेची जास्त आलेली रक्कम परत केली



 किनवट येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षक असलेल्या सुबहान चव्हाण यांनी  बँकेला परत करून इमानदारीचा आदर्श घालून दिला आहे.

सुभान चव्हाणांच्या या प्रामाणिकपणाचे बँक कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून कौतुक होत आहे.

झाले  असे की किनवट येथे उर्दु शाळेमध्ये शिक्षक  असलेले सुबहान चव्हाण यांचे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. 

दिनांक 18 डिसेंबर रोजी त्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे ते आपल्या खात्यातील 3 लाख 40 हजार रुपये उचल करण्यासाठी बँकेत गेले.

 तेथे पैसे उचलण्याची स्लिप भरून दाखल केली असता संबंधित कर्मचाऱ्याने नजरचुकीने 340000 रक्कमे ऐवजी 3 लाख 80 हजार रुपये सुबहान चव्हाण यांच्या हातात दिले.

 रक्कम मोठी असल्यामुळे चव्हाण यांनी मोजणी न करता पूर्ण रक्कम बॅगमध्ये टाकून घरी परतले

 घरी आल्यानंतर पैशाची बॅग जशीच्या तशी कपाटात ठेवून ते नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी  बाहेरगावी गेले. कार्यक्रम आटोपून रविवारी घरी परतल्यानंतर त्यांनी बँकेतून उचललेल्या पैशाची मोजणी केली असता 40 हजार रुपयाची रक्कम 

अधिक आल्याचे त्यांच्या लक्षात आले परंतु 40 हजार रु जास्त आले म्हणून उल्हासित न होता सुबहाण चव्हाण यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया गाठून तेथे बँक मॅनेजर भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगून अधिक आलेले 40 हजार रुपये बँक मॅनेजरला साभार परत केल्यानंतर चौहान यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.पैसे बघितल्यानंतर बऱ्याचदा इमानदारीने वागणाऱ्या व प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या 

माणसाची सुद्धा नियत बिघडत असते याचा आपण नेहमीच अनुभव घेतो परंतु सुबहान चव्हाण सारखी  प्रामाणिक माणसे कशीही 

परिस्थिती असली तरी आपला प्रामाणिकपणा कायम ठेवून लबाड्याना इमानदारीचा आदर्श घालून देत असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने  आला आहे

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते