Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

आज किनवट येथे जागर संविधानाच महोत्सव कार्यक्रम

  ( किनवट) हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा विचारमंच , शहीद विजय वाकोडे नगरी किनवट येथे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले व राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमीत्त जागर संविधानाचा महोत्सव २०२५ चे दि.३० ठिक ६.३० वा. रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.जोगेंद्र कवाडे हे लाभणार आहे तर उद्घाटक म्हणून कॅबीनेट मंत्री दर्जा प्राप्त हरिद्रा, विधीमंडळ अंदाज समिती  मा. हेमंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख  अतिथी म्हणून राज्यमंत्री दर्जा प्राप्त लघु उद्योग विकास महामंडळाचे मा. जयदिप कवाडे, अदिलाबादचे खासदार नागेश घोडाम, आर्णीचे आमदार राजु तोडसाम, पिरिपी एकतावादी युवा नेते भैयासाहेब इंदिसे, प्रदेश महासचिव पिरिपी बापुराव गजभारे तर स्वागताध्यक्ष म्हणून किनवट माहुरचे आमदार भीमरावजी केराम हे लाभणार आहेत. या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे या मध्ये आमदार बाबुराव कदम कोहळीकर...

पंढरपुरात नाभिक समाजाकडून गोंडर कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांचा भव्य सत्कार

  पंढरपुर- गोंडर या बहुचर्चित कादंबरीला आजवर महाराष्ट्रात 24 पुरस्कार मिळाले आणि 25 वा पुरस्कार पंढरपुरात प्रदान करण्यात आला.ज्ञानवर्धिनी वाचनालय पंढरपूर येथील वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट वांग्मय पुरस्काराने ही कादंबरी सन्मानित झाली ही कादंबरी नागरिक समाजाचं प्रतिनिधित्व करत असून समाजाच्या भावना वेदना दुःख या कादंबरीत व्यक्त झाले आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी जातो त्या ठिकाणी नाभिक समाजाच्या वतीने सत्कार सन्मान होतात पंढरपूर येथे ज्ञानवर्धिनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलो असता पंढरपुर येथील नाभिक बांधवांनी मला सत्कार सन्मान केला माझी भेट घेतली मोठ्या कौतुकाने सन्मानित केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समाज माझ्या सोबत आहे असेही ग्वाही त्यांनी दिली हे समाजाच्या वतीने मिळालेली ताप आणि प्रोत्साहन सत्कार सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा राग असून प्रचंड बळ देणार आहे या सत्कार सन्मानासाठी नाभिक समाजाचे ज्येष्ठ वक्ते तथा सेवा संघाचे पदाधिकारी माननीय प्रकाश पडणे तसेच डांगे साहेब तसेच सांगोला येथून पंढरपूरला आलेले उमेश काळे आधी सर्व समाज बांधव यांनी हा सत्कार सन्मान घ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

महावितरण लक्की ड्रा योजनेचे बक्षीस वितरण

ता. प्र.किनवट:-  दि. : महावितरण मध्ये ऑनलाईन विज देयक भरा आणि जिंका बक्षिसे या योजने अंतर्गत तीन मासिक लक्की ड्रा योजना - उपविभागीय कार्यालय किनवट अंतर्गत असलेल्या सारखणी शाखेत  नुकतीच काढण्यात आली.  त्यात दहेली या गावचे रहिवाशी प्रविणलाल नंदलाल जैस्वाल यांना एक  एआय फंक्शन स्मार्ट फोन लक्की ड्रा मध्ये मिळाला. हे बक्षीस देताना सारखणी शाखेतील कर्मचारी  डी.एस. पवार , अभिजित गुंडेराव व साईनाथ कमातमवाड हे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी

किनवट,दि.१४ : महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज(दि .१४)शहरासह गोकुंद्यात विविध ठिकाणी  उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास संपन्न झाला.      प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्याहस्ते पंचशिल ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी  अनिल उमरे यांनी ध्वज गीत घेतले.नंतर उपस्थित  भिक्खुनी सामुहिक वंदना घेतली. उपस्थित मान्यवरांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याठीकाणी ॲड.सुनिल येरेकार व अंकुश भालेराव यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले.      तसेच एस टी महामंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शालेय मुलींनी भीम गितावर लेझीम नृत्य सादर केले व महामंडळा तर्फे भोजनदान देण्यात आले. सिद्धार्थनगरातील जेतवन बुद्ध विहारात सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार  यांच्या हस्ते ...

क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची198 वी जयंती उत्साहात

 (क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची198 वी  जयंती उत्साहात अभिवादन करतांना मान्यवर) राजेश पाटील/किनवट तालुका बातमीदार  : महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आज (दि.११) उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा बसस्थानकाजवळील महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी ११वाजता संपन्न झाला.यानिमित्त झालेल्या प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मार्क्स -फुले-आंबेडकर('माफुआ'), चळवळीचे जेष्ठ  विचारवंत प्रा.रामप्रसाद तौर यांनी विचार व्यक्त केलेत. प्रास्ताविक फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी केले.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. मंचावर माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, आनंदराव वाढे,आनंद मच्छेवार,राम भरणे, किनवट न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वर, ॲड.जय खराटे , दादाराव कयापाक , प्रशांत ठमके , प्राचार्या शुभांगीताई ठमके, श्रीनिवास  नेम्मानिवार यांची प्रमुख उपस्थिती होती.      प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी महात्मा जोतिबा व साव...

फुले - आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी व सोमवारी प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन

  किनवट,दि.१० : शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ विचारमंच, किनवट तर्फे महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी व सोमवारी (दि.११ व १४ )  साने गुरूजी रुग्णालय सभागृहात प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.   शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ७ वाजता   अहिल्यानगरचे प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुधाकर शेलार यांचे व्याख्यान  आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे हे करणार आहेत ,तर अध्यक्षस्थानी साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अशोक बेलखोडे हे राहणार आहेत.     सोमवारी (दि.१४) सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत प्रसिध्द कवी, कादंबरीकार  श्रीकांत देशमुख हे विद्यार्थी व युवकांचा अभ्यासवर्ग घेतील तसेच सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत व्याख्यान देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम हे राहतील,कार्यक्रमाचे उद्घाटन इसा खान, माजी नगराध्यक्ष हे करतील.उपस्थित राहण्याचे आवाहन शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे. ----------------...

भारतीय माजी सैनिक संघटनेच्या किनवट/ माहूर तालुकाध्यक्ष पदी मेजर तुकाराम मसीदवार यांची निवड, कार्यकारिणीने सहायक जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केला सत्कार

  किनवट (प्रतिनिधी) : किनवट  / माहूर तालुक्यातल्या माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन दिनांक ०१/०४/२०२५ रोजी भारतीय माजी सैनिक संघटना शाखेची स्थापना करुन तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. किनवट माहुर तालुका अध्यक्ष श्री. सुभेदार मेजर तुकाराम मसीदवार, उपाध्यक्ष अशोक सिडाम, सचिव शेख मस्तान अब्दुल रहीम, कोषाध्यक्ष बळीराम नागोराव कुडमते, सदस्य भीमराव सुंगाजी तोडसाम, दत्ता हौसाजी कुरुडे, भगवान ईश्वर मोरे यांची किनवट माहुर तालुका कार्यकारणी म्हणुन भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र नांदेड जिल्हा केंद्र यांनी २०२५ ते २०३० पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. भारतीय माजी सैनिक संघटना केंद्र तालुका किनवट माहुर संपुर्ण कार्यकारणी दिनांक ९/०४/२०२५ रोजी भारतीय माजी सैनिक संघटना किनवट व माहुर संपुर्ण कार्यकारणीने श्री. झेनिथ चंद्र दोनथुला (IAS) सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आ.ए.वि.किनवट येथे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व माजी सैनिक यांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली या वेळी उपस्थीत तालुका अध्यक्ष श्री. सुभेदार म...

परिवर्तन गायन कला मंचची किनवट विश्रामगृह येथे बैठक, किशनराव ठमके यांची अध्यक्षपदी निवड

(किनवट ता. प्र.)  ता. 0४- रोजी विश्रामग्रह परिसर किनवट येथे तालुक्यातील  गायक कवि संगीतवादक कलावंताची बैठक पार पडली . या बैठकीमध्ये सर्वानुमते  असे ठरले कि  किनवट माहुर परिसरातील ग्रामीण भागात चांगल्या प्रकारचे उत्कृष्ठ गायक वादक कवि गितकार कलावंत आहेत परंतु त्यांना प्रसिद्धी नाही व ते दुर्लक्षीत आहेत त्यासाठी नाव प्रतिनिधी श्री आत्मानंद सत्यवंश यांनी परिर्वतन गायक कला मंच स्थापन करण्याचा उपस्थित कलाकारासमोर  इच्छा व्यक्त केली .  तसेच हा ग्रुप व्हाटसप तयार करण्याचे ठरवले व कलाकारांनी या ग्रुपवर गायन वादन महापुरुषावरील गिते भजन गवळन संगीत टाकून प्रसिद्ध व्हावे असे ठरले  यावेळी ग्रुपचे संस्थापक श्री आत्मानंद सत्यवंश यांनी सुचविल्याप्रमाणे परिर्वतन गायन कला मंच किनवट चे अध्यक्ष म्हणून जेष्ठ गायक श्री किशनराव ठमके यांची निवड सर्वानुमते करण्यांत आली  मार्गदर्शक कलावंत :- श्री सुरेश शेंडे (कवि) साडी माडी फेम श्री बालाजी वाढवे  जेष्ठ गायक श्री रामस्वरूप मडावी ( कवि - काहुर फेम ) श्री विवेकजी ओंकार ( इन्स्टा रिल स्टार ), श्री महेंद्र नरवाडे (कवि - सा...

प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

  किनवट ता प्र. शिव - शाहू - फुले - आंबेडकर - अण्णाभाऊ विचारमंच किनवट द्वारा आयोजित राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने प्रबोधन पर कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे आज दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी  सायंकाळी पाच वाजता बैठक प्राध्यापक रामप्रसाद तौर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष इसा खान साहेब, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे साहेब, पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाजी गरड पाटील,प्राध्यापक विजय खुपसे सर, मुख्याध्यापक मोहन जाधव सर, प्राध्यापक डॉक्टर सागर शिल्लेवार सर, पत्रकार मिलिंद सर्पे साहेब, डॉक्टर वसंत राठोड सर,  प्राध्यापक उमाकांत इंगोले सर, प्राध्यापक जोगदंड सर, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा दादा गोणारकर, उद्धवराव रामतीर्थकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद सर्पे साहेब यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले. या बैठकीस संदीप कोल्हे सर, संजय पवार सर, संदीप इसाये सर, क...

महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध शैक्षणिक उपक्रम

(तालुका प्रतिनिधी किनवट ) किनवट येथे होऊ घातलेल्या दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयती सोहळ्या निमित्त रमामात मित्र मंडळ तर्फे विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ रोजी ठिक ९ वाजता महात्मा फुले चौक येथे अभिवादनचा कार्यक्रम होईल नंतर संत गाडगेबाबा उद्यानसकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात येणार आहे. कार्यक्रम सुत्रसंचालन मा. उत्तम कानिंदे व प्रा. सुबोध सर्पे करणार आहे दिनांक १२ एप्रि रोजी सकाळी ९ वाजता संत गाडगेबाबा उद्यान व्हि आय पी कॉलनी येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमाचे परिक्षण जयश्री भरणे, प्रीती  मुनेश्वर हे करणार आहे. तर दुपारी १२ वाजता विद्यार्थी, व्यावसायिकांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन मा. सुनिल बिर्ला पोलिस निरीक्षक किनवट व प्रा. सुभाष परघने गो. श. र. शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था किनवट हे करणार आहेत . दिनांक १३ एप्रिल रोजी रमेश मुनेश्वर व सिद्धार्थ खोब्रागडे यांच्या परिक्षणाखाली निबंध स्पर्धा होणार आहे. दिनांक १४ ए...

अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड. के.के. मुनेश्वर तर सचिवपदी ॲड.माझ बडगुजर

  किनवटः अभिवक्ता संघ निवडणूक २०२५-२०२७ मध्ये अध्यक्षपदी ॲड. के के मनेश्वर, उपाध्यक्ष ॲड. टी आर चव्हाण, सचिव ॲड. माज बडगुजर, कोषाअध्यक्ष ॲड. सम्राट सर्पे बिनविरोध, ग्रंथपाल ॲड. विशाल कानिंदे बीनविरोधनिवड झाली आहे या निवडी बद्दल अभिवक्ता संघ, पत्रकारसंघ , व्यापारी संघ, डॉक्टर असोसिएशन , राजकीय क्षेत्र  , मित्र मंडळी इ .क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.