भारतीय माजी सैनिक संघटनेच्या किनवट/ माहूर तालुकाध्यक्ष पदी मेजर तुकाराम मसीदवार यांची निवड, कार्यकारिणीने सहायक जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केला सत्कार
किनवट (प्रतिनिधी) : किनवट / माहूर तालुक्यातल्या माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन दिनांक ०१/०४/२०२५ रोजी भारतीय माजी सैनिक संघटना शाखेची स्थापना करुन तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. किनवट माहुर तालुका अध्यक्ष श्री. सुभेदार मेजर तुकाराम मसीदवार, उपाध्यक्ष अशोक सिडाम, सचिव शेख मस्तान अब्दुल रहीम, कोषाध्यक्ष बळीराम नागोराव कुडमते, सदस्य भीमराव सुंगाजी तोडसाम, दत्ता हौसाजी कुरुडे, भगवान ईश्वर मोरे यांची किनवट माहुर तालुका कार्यकारणी म्हणुन भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र नांदेड जिल्हा केंद्र यांनी २०२५ ते २०३० पर्यंत मान्यता देण्यात आली आहे.
भारतीय माजी सैनिक संघटना केंद्र तालुका किनवट माहुर संपुर्ण कार्यकारणी दिनांक ९/०४/२०२५ रोजी भारतीय माजी सैनिक संघटना किनवट व माहुर संपुर्ण कार्यकारणीने श्री. झेनिथ चंद्र दोनथुला (IAS) सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आ.ए.वि.किनवट येथे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व माजी सैनिक यांच्या विविध समस्येवर चर्चा करण्यात आली या वेळी उपस्थीत तालुका अध्यक्ष श्री. सुभेदार मेजर तुकाराम मसीदवार, उत्तम नारायणराव कागणे सल्लागार माजि सैनिक/मा.तहसिलदार, श्री.अनिल कवडे कक्षअधिकारी आदिवासी एकात्मीक विभाग किनवट व माजी सैनिक संघटनेचे सुपर्ण कार्यकारणी उपस्थीत होते.

Comments
Post a Comment