Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी



किनवट,दि.१४ : महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज(दि .१४)शहरासह गोकुंद्यात विविध ठिकाणी  उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास संपन्न झाला.

     प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्याहस्ते पंचशिल ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी  अनिल उमरे यांनी ध्वज गीत घेतले.नंतर उपस्थित  भिक्खुनी सामुहिक वंदना घेतली. उपस्थित मान्यवरांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याठीकाणी ॲड.सुनिल येरेकार व अंकुश भालेराव यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले.     

तसेच एस टी महामंडळाच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शालेय मुलींनी भीम गितावर लेझीम नृत्य सादर केले व महामंडळा तर्फे भोजनदान देण्यात आले.

सिद्धार्थनगरातील जेतवन बुद्ध विहारात सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले .त्रिसरण, पंचशिल व सामुहिक वंदना अनिल उमरेड यांनी  घेतली.नंतर भोजनदान देण्यात  आले. सायंकाळी पाच वाजता महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली.

तसेच रमामाता चौक जवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

 शिव - शाहू - फुले - आंबेडकर - अण्णाभाऊ विचारमंचा द्वारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात श्रीकांत देशमुख, सुप्रसिध्द कवी व कथाकार यांचे व्याख्यान होणार आहे.जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमास विविध पक्ष,संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, डॉक्टर,वकील, लोकप्रतिनिधी यांच्यासह समाजातील सर्व  स्तरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यात महीला व बालकांचा सहभाग लक्षणीय होता. जयंतीच्या पूर्वदिवशी ता.१३ रोजी रात्री १२ वाजता डॉ . आंबेडकर पुतळ्याजवळ व  रमामाता चौकात फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी बाजी करण्यात आली. यावेळी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे,किनवट वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...