( किनवट)
हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा विचारमंच , शहीद विजय वाकोडे नगरी किनवट येथे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले व राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमीत्त जागर संविधानाचा महोत्सव २०२५ चे दि.३० ठिक ६.३० वा. रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.जोगेंद्र कवाडे हे लाभणार आहे तर उद्घाटक म्हणून कॅबीनेट मंत्री दर्जा प्राप्त हरिद्रा, विधीमंडळ अंदाज समिती मा. हेमंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री दर्जा प्राप्त लघु उद्योग विकास महामंडळाचे मा. जयदिप कवाडे, अदिलाबादचे खासदार नागेश घोडाम, आर्णीचे आमदार राजु तोडसाम, पिरिपी एकतावादी युवा नेते भैयासाहेब इंदिसे, प्रदेश महासचिव पिरिपी बापुराव गजभारे तर स्वागताध्यक्ष म्हणून किनवट माहुरचे आमदार भीमरावजी केराम हे लाभणार आहेत.
या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे
या मध्ये आमदार बाबुराव कदम कोहळीकर, उपायुक्त संजय गायकवाड, कार्यकारी संचालक गोदावरी खोरे स. नगर संतोष तिरमनवार , सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, मुख्याधिकारी विजय कावळे, दादाराव कयापाक जेष्ठनेते रिपाई, अभियंता प्रशांत ठमके भा. बौ. महासभा, प्रभु सावंत अ. म.शिक्षक संघ, ॲड प्रतीक केराम, डॉ. विजय कांबळे यांचा सन्मान होणार आहे .
या कार्यक्रमानंतर राजाभाऊ शिरसाठ, नागसेनदादा सावदेकर, अविनाश नाईक या महाराष्ट्रतिल प्रसिद्ध गायक कलावंताचा बुद्ध भीम गितावरील कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कनिंदे हे करणार आहेत तर या कार्यक्रमास उपासक उपासिका ,युवक, पत्रकार बांधव महिला भिम अनुयायांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त जयंती अध्यक्ष /आयोजक विनोद भरणे व आयोजन समिती शंकर नगराळे, ज्ञानेश्वर मुनेश्वर, प्रसेनजीत कावळे, निखील कावळे, गौतम पाटील, निखिल सर्पे अनिकेत भरणे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment