किनवट ता प्र.
शिव - शाहू - फुले - आंबेडकर - अण्णाभाऊ विचारमंच किनवट द्वारा आयोजित राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने प्रबोधन पर कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे आज दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता बैठक प्राध्यापक रामप्रसाद तौर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष इसा खान साहेब, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे साहेब, पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाजी गरड पाटील,प्राध्यापक विजय खुपसे सर, मुख्याध्यापक मोहन जाधव सर, प्राध्यापक डॉक्टर सागर शिल्लेवार सर, पत्रकार मिलिंद सर्पे साहेब, डॉक्टर वसंत राठोड सर, प्राध्यापक उमाकांत इंगोले सर, प्राध्यापक जोगदंड सर, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा दादा गोणारकर, उद्धवराव रामतीर्थकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद सर्पे साहेब यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले. या बैठकीस संदीप कोल्हे सर, संजय पवार सर, संदीप इसाये सर, कावळे सर,भाटशंकर सर, वाडगुरे सर, मुनेश्वर सर, डॉक्टर योगेश सोमवंशी सर, सुशील कदम पाटील, बबनराव वानखेडे, सचिन कदम पाटील, डेबुजी फोर्स किनवटचे तालुका अध्यक्ष आकाश तिरमले, बामसेफचे विजय वाघमारे, राजेश कदम सर, रामराव राठोड सर, प्राध्यापक दगडू भरकड या सर्वांच्या उपस्थित 11 व 12 एप्रिल 2025 रोजी दोन दिवसीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा सर यांचे अभ्यासवर्ग व 11 तारखेला सायंकाळी व्याख्यान तसेच 14 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
Comments
Post a Comment