(तालुका प्रतिनिधी किनवट )
किनवट येथे होऊ घातलेल्या दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयती सोहळ्या निमित्त रमामात मित्र मंडळ तर्फे विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ११ रोजी ठिक ९ वाजता महात्मा फुले चौक येथे अभिवादनचा कार्यक्रम होईल नंतर संत गाडगेबाबा उद्यानसकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रम सुत्रसंचालन मा. उत्तम कानिंदे व प्रा. सुबोध सर्पे करणार आहे
दिनांक १२ एप्रि रोजी सकाळी ९ वाजता संत गाडगेबाबा उद्यान व्हि आय पी कॉलनी येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमाचे परिक्षण जयश्री भरणे, प्रीती मुनेश्वर हे करणार आहे.
तर दुपारी १२ वाजता विद्यार्थी, व्यावसायिकांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन मा. सुनिल बिर्ला पोलिस निरीक्षक किनवट व प्रा. सुभाष परघने गो. श. र. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट हे करणार आहेत .
दिनांक १३ एप्रिल रोजी रमेश मुनेश्वर व सिद्धार्थ खोब्रागडे यांच्या परिक्षणाखाली निबंध स्पर्धा होणार आहे.
दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सामुहिक धम्म वंदना होईल व अभिवादन कार्यक्रम होईल तर रमामाता चौक येथे सकाळी १० वाजता मा. बेबीताई स्व.प्रदिपजी नाईक यांच्या हस्ते पंचशिल धम्म ध्वजारोहण होणार आहे तसेच रमामाता चौक ते शहराच्या प्रमुख मार्गाने मोटार सायकल रॅली आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन निखिल सर्पे राहणा आहे.
तर ११ ते ३ वाजे पर्यंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात डॉ. मनोज घडसिंग, डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. प्रकाश रायघोळ, डॉ. धनंजय कावळे, डॉ. सुरज वाकोडे,डॉ. प्रियंका राठोड, डॉ. अनिल राठोड हे मोफत वैद्यकीय तपासणी करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून स्वागताध्यक्ष विद्यमान आमदार भीमराव केराम हे लाभणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. बेबीताई स्व. प्रदीप नाईक ह लाभणार आहे तर मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांतजी ठमके हे राहणार आहेत .
तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक जिल्हाधिकारी मा.झेनिथ चंद्र दोन्थुला, मा.सुनिल बिर्ला पो. नि. किनवट, मा. डॉ. शारदा चौंडेकर तहसिलदार किनवट, अजय कुरवाडे मुख्याधिकारी किनवट हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला असंख्य भीम अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयुक्त जंयती सोहळ्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष आकाश वी. आळणे, सचिव दिपक ओंकार, उपाध्यक्ष अनिल कांबळे, संघर्ष घुले, सहसचिव गणेश आमले, कोषाध्यक्ष शरण लोखंडे, निवेदक कानिंदे, सहकोषाध्यक्ष कपिल बलखंडे, कार्याध्यक्ष प्रतिकेश ओंकार आदींनी केले आहे
दिनांक १४ एप्रिल रोजी स्पर्धेतिल विजेत्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल असे आयोजकांनी कळवीले आहे.
Comments
Post a Comment