(किनवट ता. प्र.)
ता. 0४- रोजी विश्रामग्रह परिसर किनवट येथे तालुक्यातील गायक कवि संगीतवादक कलावंताची बैठक पार पडली . या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरले कि किनवट माहुर परिसरातील ग्रामीण भागात चांगल्या प्रकारचे उत्कृष्ठ गायक वादक कवि गितकार कलावंत आहेत परंतु त्यांना प्रसिद्धी नाही व ते दुर्लक्षीत आहेत त्यासाठी नाव प्रतिनिधी श्री आत्मानंद सत्यवंश यांनी परिर्वतन गायक कला मंच स्थापन करण्याचा उपस्थित कलाकारासमोर इच्छा व्यक्त केली .
तसेच हा ग्रुप व्हाटसप तयार करण्याचे ठरवले व कलाकारांनी या ग्रुपवर गायन वादन महापुरुषावरील गिते भजन गवळन संगीत टाकून प्रसिद्ध व्हावे असे ठरले
यावेळी ग्रुपचे संस्थापक श्री आत्मानंद सत्यवंश यांनी सुचविल्याप्रमाणे परिर्वतन गायन कला मंच किनवट चे अध्यक्ष म्हणून जेष्ठ गायक श्री किशनराव ठमके यांची निवड सर्वानुमते करण्यांत आली
मार्गदर्शक कलावंत :-
श्री सुरेश शेंडे (कवि) साडी माडी फेम
श्री बालाजी वाढवे जेष्ठ गायक
श्री रामस्वरूप मडावी ( कवि - काहुर फेम )
श्री विवेकजी ओंकार ( इन्स्टा रिल स्टार ),
श्री महेंद्र नरवाडे (कवि - सांगावा फेम ),श्री विजय वाघमारे गायक,
श्री रहेमत अली गीतकार
श्री शाहीर मुनेश्वर
श्री साहेबराव वाढवे ढोलकी सम्राट
श्री राजेश पाटील (कवि गायक, पत्रकार इन्स्टा रिलस्टार )
आदीची उपस्थिती होती
श्री सुरेश शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment