Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

रोजच्या व्यवहारात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करावा: उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे

  किनवट,ता.२९(बातमीदार): मराठी भाषा ही मातृत्वाची भाषा आहे.मराठी भाषेतील शब्द हे आम्हाला जगण्याचे बळ देतात.बोली भाषेतून साहित्य निर्माण व्हावे. रोजच्या व्यवहारात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करावे,असे आवाहन उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी केले.       किनवट न्यायालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी न्यायाधीश श्री.माने हे होते,तर प्रमुख पाहूणे म्हणून न्यायाधीश श्री.मेंढे व वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल सोनकांबळे यांची उपस्थिती होती.     पुढे बोलतांना डॉ.पंजाब शेरे म्हणाले की, मराठी भाषेतील लुप्त होत चाललेली बोलीचे संवर्धन व्हावे.मराठी साहित्याचे वाचन करावे. साहित्य हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. साहित्य वाचनाने माणूस प्रगल्भ विचार करतो . आपल्या परिसरातील बोलीचे संवर्धन करावे‌.       ॲड.डॉ.सागर शिलेवार यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन ॲड.  सम्राट सरपे यांनी केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर यांच्यासह वकील व पक्षकारांची उपस्थिती होती.

पत्रकारांच्या सहकार्यामुळे जनसेवा करण्याचे बळ मिळते सौ. बेबीताई नाईक किनवट तालुका पत्रकार संघटनेची दहेलीतांडा येथे सांत्वनपर भेट

  किनवट प्रतिनिधी:- किनवट विधानसभेचे लाडके माजी आमदार लोकनेते दिवंगत प्रदीप नाईक यांच्या दुःखद निधनाबद्दल किनवट तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी दि 28 जानेवारी रोजी दहेलीतांडा येथे जाऊन नाईक कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. जनतेप्रमाणेच पत्रकारांचेही अतोनात प्रेम आणि सहकार्य प्रदीप नाईक यांना लाभले आहे.यापुढेही पत्रकार बांधवांचे असेच सहकार्य लाभावे अशा अपेक्षा  बेबीताई प्रदीप नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत. जलक्रांतीचे प्रणेते किनवट माहूर विधानसभेचे लाडके माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचे 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हैदराबाद येथे हृदयविकाराच्या  झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात  शोककळा पसरली असून  नेतेमंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर दहेलीतांडा येथे भेट देत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सांत्वन पर भेटी दिल्या दरम्यान 28 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार सदस्यांनी दहिली तांडा येथे जाऊन नाही कुटुंबीयांची भेट घ...

किनवट तालुक्यातील रेशनच्या धान्याच्या मापात पाप क्विंटलमागे तिन ते चार किलो धान्य कमी, दुकानदारांना नुकसान

  किनवट,दि.२४ : किनवट,मांडवी व इस्लापूर या तालुक्यातील तीन शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना द्वारपोच होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामध्ये क्विंटलमागे तिन ते चार किलो धान्य कमी येत असून यामुळे तालुकाभरात द्वारपोच अन्नधान्य योजनेच्या मापात पाप असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.    राज्यात कोणीही उपाशी राहू नये, त्यांना कमी पैशात अन्नधान्य उपलब्ध व्हावे. त्यांचा आर्थिक स्तर उंच व्हावा म्हणून शासनाने गरिबातल्या गरीब नागरिकांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा ही योजना सुरू केली. यासाठी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदूळ देण्याचा निर्णय तत्कालीन केंद्र सरकारने घेतला. तेव्हापासून नागरिकांना मोफत धान्य वितरित केल्या जात आहे. पण शासनाच्याच शासकीय गोदामातून द्वारपोच होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामध्ये एका पोत्यामागे दोन ते तीन किलो धान्य कमी येत आहे. अन्नधान्य कमी येत असल्यामुळे दुकानदारांना नुकसान झेलावे लागत आहे.पर्यायाने त्या नुकसानीचा फटका गोरगरीब लाभार्थ्यांना बसत आहे. -------------------------------------------------------•

किनवट शहराअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळया जवळचे देशी दारूचे दुकान त्वरीत हटवा

  (किनवट  प्रतिनिधी)- किनवट शहराअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी सुरू केलेले देशी दारूचे दुकान त्वरीत हे तरत्र हलवून अनुज्ञप्तीधारक नितीन कन्नलवार, राजु ऊर्फ बालु मुरगुलवार व बळीराम मुरगुलवार याचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. किनवट शहाअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नितीन कन्नलवार, राजु ऊर्फ बालु मुरगुलवार व बळीराम मुरगुलवार बाद या व्यक्तीचे काहि दिवसापूर्वी देशी दारू विक्रिचे दुकान सुरू केले आहे. अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासुन या देशी दारू दुकानाचे अंतर केवळ २० फूट आहे तर याच ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व हु. गोडराजे मैदान आहे या ठिकाणी दिवसभर नागरिकासह वाहनांची वरदल असते तर गोंडराजे मैदान व अण्णाभाऊ साठे पुतळा असल्याने विविध राजकिय व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर क्षेत्र हे संवेदनशिल असतांनाही नितीन कन्नलवार या व्यक्तीचे मुख्य रस्तालगत देशी दारूचे दुकान सुरू केले आहे. या दुकानामुळे दिवसभर मद्यपी वावरत असल्याने अण्णाभाऊ साठे पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका न...

सध्याच्या किनवट तालुक्या पेक्षा चांगले किनवट येणाऱ्या पिढीला द्यावे-अँड विलास सूर्यवंशी

  किनवट (तालुका प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन किनवट येथे दिनांक 22 /1 /2025 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेला पोलीस निरीक्षक ओम बिर्ला साहेब, अँड विलास सूर्यवंशी  अँड एस. एम सरपे व किनवट तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते.. या कार्यक्रमांमध्ये भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष पुरावा कायदा व भारतीय साक्ष अधिनियम या प्रमुख कायद्याच्या बदलाची उद्देश व त्याची अंमलबजावणी या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये अँड सूर्यवंशी यांनी या तिन्ही कायद्या चा फरक सांगितला व सध्याच्या किनवट मध्ये होणारे सायबर क्राईम कमी करन्या साठी या तिन्ही कायद्याची उपयुक्तता सांगितली  झालेल्या तीन कायद्यामधील शब्दाच्या सहजते मध्ये बदल व सुलभते बदल आपल्या अद्वितीय शैलीमध्ये श्रोत्यांना सांगून श्रोत्याच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून श्रोत्याने सध्याच्या किनवट पेक्षा शांततापूर्ण किनवट येणाऱ्या पिढीला द्यावे असे ...

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

बहारदार रचनेने बळीराम पाटील महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न

  स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक मोती कृतार्थ वंसुधरेने झेलावे छातीवरती... किनवट ता. प्रतिनिधी: बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य  डॉ.एस.के.बेंबरेकर , प्रसिद्ध कवी नंदन नांगरे, डॉ.प्रकाश मोगले, वंदना तामगाडगे,रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, यांनी बहारदार रंचना सादर केले.प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी केले. नंदन नांगरे यांनी आपली रचना सादर करतांना म्हणाले आपल्या माणंसासी एक निष्ठ राहा स्वच्छंद पाखरांनी आभाळ पांघरावे. हिरव्या मनामनाला धरणीने मोहरावे. ओल्या निळ्या नभाने शिंपावे माणिक - मोती  कृतार्थ वसुंधरेने झेलावे छातीवरती  मातीच्या गंध फुलांनी वाऱ्यावर मस्त झुलावे. बाई मी दयन दईता  गाते भी...

ब.पा.महाविद्यालयात कवी संमेलन

किनवट,ता.२०(बातमीदार): बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ता.१४ते २८ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने उद्या (ता.२१) कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी दिली.      अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के, बेंबरेकर हे राहतील.कवी संमेलनात प्रसिध्द कवी व नाट्यलेखक नंदन नागरे, प्रसिध्द कवी व समिक्षक प्रा.डाॅ. प्रकाश मोगले, वंदना तामगाडगे, राजेश पाटील, रमेश मुनेश्वर, महेंद्र नरवाडे,प्रा.गजानन सोनोने,हे कवी सहभागी होतील सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक वृंद वर्ग उपस्थित राहावे अशी सुचना प्राचार्य, डॉ.एस.के.बेंबरेकर बळीराम पाटील. महाविद्यालय,किनवट यांंनी केली आहे

मराठी भाषेचा अभिमान बाळगावा- प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी

किनवट तालुका प्रतिनिधी-  मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावे.मराठी भाषेतील विसरत चाललेल्या बोलीचे संवर्धन व्हावे असे मत बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी व्यक्त केले.प्रारंभी थोर समाजसुधारक दिवंगत बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर ,प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी, डॉ.आनंद भालेराव, डॉ. शुभांगी दिवे,मराठी विभागप्रमुख डॉ.पंजाब शेरे उपस्थित होते .प्रास्ताविक डॉ.पंजाब शेरे यांनी केले.    पुढे बोलतांना कुलकर्णी सर म्हणाले,आपली भाषा ही मातृत्व प्राप्त झालेली भाषा आहे.आपण आज मराठी भाषेतील शब्द विसरत चाललो आहे .आपल्या परिसरातील संस्कृती व लोकजीवनाचा अभ्यास करून लेखन करावे.नियमित वाचन करावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अत्यंत संवेदनशील व वा...

२३ वर्षीय युवती महिलेवर अत्याचार... एका आरोपीस अटक नोकरीचे दाखवीले होते अमीष

किनवट, दि. १५ - नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून उमरखेड जवळील खरबी जंगलात महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस किनवट पोलिसांनी अटक केली आहे. एका २३ वर्षीय महिलेस आरोपी विठ्ठल मुंडे (रा. कंधार) यांनी तुला आशा वर्कर म्हणून नोकरीला लावतो, असे म्हणून तिच्याशी जवळीकता साधून तिला १३ जानेवारी रोजी कागदपत्रे घेऊन खरबी रोडवरील साई मंदिर येथे बोलावले. आपल्याला खरबीला जायच आहे असे म्हणून तिला पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर बसवून खरबी नाक्याच्या पुढील जंगलात घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तेथे दोन अज्ञात व्यक्ती वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे त्या दोघांनीही आरोपीस अटक त्या महिलेस पुढे जंगलात ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला व तिच्या पर्समधील ३० हजार रुपये काढून घेतले व तिला थापड बुक्क्यांनी मारहाण करून तिचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ फेसबुकवर टाकून तुझी बदनामी करतो व तुला खतम करतो, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. त्या पीडित महिलेने किनवट पोलिसात तक्रार दिल्यावरून विठ्ठल मुंडे व इतर दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे सकाळपासू...

बळीराम पाटील महाविद्यालयात बँक फायनान्स आणि इन्शुरन्स कोर्स विषयी व्याख्यान संपन्न

किनवट:  बँक फायनान्स आणि इन्शुरन्स कोर्स माहितीवर आधारित व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर , उप प्राचार्य डॉ.पंजाब  शेरे  प्रमुख पाहुणे  सारंग खाकरे,  प्रज्ञा भंडारे विचारमंचावर  उपस्थित होते.  प्रारंभी थोर समाजसुधारक  स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी बोलताना  सारंग खाकरे यांनी 'सीपीबीएफएल स्किल डेव्हलपमेंट कोर्स'ची माहिती दिली. पदवी शिक्षण घेत असताना हे कोर्स केले तर नौकरीमध्ये संधी उपलब्ध  होऊ शकते.या स्पर्धेच्या युगात आभासी पध्दतीने आपण प्रमाणपत्र कोर्स करून स्वावलंबी बनावे असे मत व्यक्त केले.या कोर्स संदर्भात आभासी पध्दतीने गांवडे साहेब यांनी सविस्तर माहिती दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस. एल. दिवे यांनी यांनी केले.  अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ पंजाब शेरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख प्रा आम्रपाली हटकर यांनी केले, तर आभार प्रा. सुनील तिडके यांनी मानले.याप्रसंगी प्रा...

अक्षरोदय साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर; 12 जानेवारीला होणार वितरण

  विशेष प्रतिनिधी नांदेड- येथील अक्षरोदय साहित्य मंडळ या संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा साहित्य गौरव पुरस्कार व शाहीर गौरव पुरस्कार अनुक्रमे सुप्रसिद्ध विद्रोही कवयित्री छाया बेले व ख्यातनाम शाहीर दिगू तुमवाड यांना निवड समितीने जाहीर केले आहेत. अक्षरोदय साहित्य मंडळाच्या कार्यालयात दि. 5 जानेवारी 2025 रोजी एक बैठक होऊन हे पुरस्कार जाहीर करण्यात आले ओहत. 12 जानेवारी 2025 ला होणार्‍या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती अक्षरोदय साहित्य मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मारोती मुंडे हे होते तर यावेळी सहसचिव चंद्रकांत चव्हाण, कोषाध्यक्षा उषाताई ठाकूर, कार्याध्यक्ष सदानंद सपकाळे, कार्यवाह बालिका बरगळ, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे आदींची उपस्थिती होती. अक्षरोदय साहित्य मंडळाच्या पुरस्कार निवड समितीने दिपक सपकाळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा साहित्य गौरव पुरस्कार यावर्षी विद्रोही कवयित्री छाया बेले यांना जाहीर झाला आहे. तर स्मृतीशेष ज्येष्ठ शाहिर विठ्ठलराव जोंधळे यांच्या स्मरणार्थ दिला जा...

तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

  किनवट,दि.८ : तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज(ता.८) राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवाडा साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ.शारदा चोंडेकर या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश कराड हे उपस्थित होते.     प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश राठोड यांनी केले.यावेळी बोलताना अॅड.मिलिंद सर्पे यांनी ग्राहक पंधरवड्यानिमित्त ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती व दिली व ग्राहक प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले,तर सुरेश कराड यांनी  समयोचित विचार  व्यक्त केले.संचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय गड्डमवाड यांनी केले.     यावेळी पुरवठा निरीक्षक सतिश सरनाईक, सहाय्यक महसुली अधिकारी एम.डी मुगटकर,पुरवठा निरीक्षक करण गुसिंगे,महसुल सहाय्यक लिंबेश राठोड, विनोद सोनकांबळे यांच्यासह शिवाजी पाटील, सिद्धार्थ मुनेश्वर, मारोती आडे,जनार्धन पाटील,लतीफ भाई,अशो...

आमदार भिमराव केराम यांच्या मार्फत लाडक्या भावांचे मुख्यमंत्र्याना निवेदन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे पाच ते सहा महिन्या पासुन मानधन रखडले

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे पाच ते सहा महिन्या पासुन मानधन रखडले (किनवट ता. प्रतिनिधी) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (लाडका भाऊ योजने अंतर्गत) काम करणाऱ्या निधीयुक्त युवक कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्या पासुन मानधन मिळाले नसल्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून सुद्धा मानधना अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान किनवट माहुरचे आमदार हे किनवट आगारास भेट दिली असता त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत (ला. भा.) युवकांनी आमदारांना निवेदन दिले यात योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व विनंती केली कि आमच्या मागण्या मुख्यमंत्र्या पर्यंत पोहचवा व आम्हाला आर्थिक धैर्य प्राप्त होईल व काम करण्याचे बळ मिळेल या वेळी आगाराचे प्रमुख वाय खिल्लारे व एस टी महामंडळ स्टॉफ तर्फे आमदारांचा सत्कार करण्यात आला . सदरील निवेदनावर गौतम पाटील , प्रशांत  ठमके ,स्वप्नील दंतवाड, वेदांत कदम ,रुपेश उपलवार ,सागर कोरटलावार ,पद्मनाथ सेलूकर , नेहा डबेवार,श्री सोनवणे,शाम जटाळे, अजय मानकर ,विक्रम राठोड  शिवराम बेले आदींच्या स्...

विभागीय क्रीडा स्पर्धेत किनवट च्या खेळाडूंचे घवघवित यश व राज्यस्तर निवड

  दि 5 जानेवारी नांदेड़ येथे. विभाग स्पर्धा  संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने  विभागीय शालेय युनिफाईड क्रीडा स्पर्धा संपन्न झाले  स्पधचे उद्घाटक मनून लाभलेल संजय   चव्हाण सर कर्मचारी  क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेड़   यांच्या हस्ते झाले व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले   व  सघटना प्रमुख संदीप येशिमोड यांनी   विजयी खेळाडून पुढिल स्पधेस शुभेच्छा दिल्या  व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले जगदीश तिरमनवार ,श्नेहाराणी  नगराज, सागर नगराज ईत्यदीनी मोलाचे मार्गदर्शन केले  राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडू पुढील प्रमाणे यांना राहुल जाधव  अस्मिता लक्ष्मण कानिंदे  वैष्णवी संजय बेंद्रे  श्वेता इंदल राठोड  आद्विका निलेश पेंटावार  तनिष्का आशन्ना चिल्लावर सांची प्रमोद कानिंदे  राजनंदिनी जीवन पवार  जान्हवी जयसिंग जाधव  श्वेता ज्ञानेश्वर वढई  सांचिता ज्ञानेश्वर...

कु.प्रणाली पाटील युवतीची प्रयोगशाळा सहायकपदी निवड अथक परिश्रमाने मिळवले यश

  किनवट, ता. ३ (बातमीदार) : घोटी येथील शेतकऱ्याची मुलगी प्रणाली चंद्रमणी पाटील हिची स्पर्धा परिक्षेतून जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायकपदी नुकतीच निवड झाली आहे. प्रणालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर घोटी येथे तर माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळा किनवट येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा जोतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे झाले. वडिल शेतकरी, शेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने बाबा दुःखी असायचे. शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी तीने वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठात प्रवेश घेवून बी. टेक व नंतर एम. टेक केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शोध सुरु असतानाच स्पर्धा परिक्षेतून महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायकपदी तिची निवड झाली. या पदावरून शेतकऱ्यांची सेवा करून अनेक शोध लावून शेतकरी राजा सुखी करण्याचा निश्चय तिने केला आहे. या प्रणाली पाटील यशाबाबत मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभागी ठमके, विजय पाटील, प्राथमिक शिक्षण व स्पर्धा परिक्षेसाठी सातत्याने मार्गदर्शन करण...

सम्यक सर्पे यांना एम. फिल. प्रदान

  किनवट , प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे सम्यक सर्पे यांना एम.फिल. ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी  " दै. सकाळ मधील विकास विषयक बातम्या एक विश्लेषात्मक अभ्यास" विषयावर लघुशोध प्रबंध सादर केला होता. या प्रसंगी त्यांचे पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिनकर माने ,ॲड. मिलिंद सर्पे, रमेश मूनेश्वर, प्रा.सुबोध सर्पे, प्रा.सिद्धार्थ जिगळेकर, ॲड. दिव्या पाटील ,शंतनु भवरे आदींनी अभिनंदन केले.