किनवट, दि. १५ - नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून उमरखेड जवळील खरबी जंगलात महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस किनवट पोलिसांनी अटक केली आहे.
एका २३ वर्षीय महिलेस आरोपी विठ्ठल मुंडे (रा. कंधार) यांनी तुला आशा वर्कर म्हणून नोकरीला लावतो, असे म्हणून तिच्याशी जवळीकता साधून तिला १३ जानेवारी रोजी कागदपत्रे घेऊन खरबी रोडवरील साई मंदिर येथे बोलावले. आपल्याला खरबीला जायच आहे असे म्हणून तिला
पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर बसवून खरबी नाक्याच्या पुढील जंगलात घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तेथे दोन अज्ञात व्यक्ती वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे त्या दोघांनीही
आरोपीस अटक
त्या महिलेस पुढे जंगलात ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला व तिच्या पर्समधील ३० हजार रुपये काढून घेतले व तिला थापड बुक्क्यांनी मारहाण करून तिचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ फेसबुकवर टाकून तुझी बदनामी करतो व
तुला खतम करतो, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. त्या पीडित महिलेने किनवट पोलिसात तक्रार दिल्यावरून विठ्ठल मुंडे व इतर दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे सकाळपासूनच किनवट पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.
पीडित महिलेचे नातेवाईक यातील अन्य दोन आरोपींना अटक करा म्हणून किनवट पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे करत आहेत.
Comments
Post a Comment