किनवट, ता. ३ (बातमीदार) :
घोटी येथील शेतकऱ्याची मुलगी प्रणाली चंद्रमणी पाटील हिची स्पर्धा परिक्षेतून जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायकपदी नुकतीच निवड झाली आहे.
प्रणालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर घोटी येथे तर माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळा किनवट येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा जोतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे झाले. वडिल शेतकरी, शेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने बाबा दुःखी असायचे. शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी तीने वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठात प्रवेश घेवून बी. टेक व नंतर एम. टेक केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शोध सुरु असतानाच स्पर्धा परिक्षेतून महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायकपदी तिची निवड झाली. या पदावरून शेतकऱ्यांची
सेवा करून अनेक शोध लावून शेतकरी राजा सुखी करण्याचा निश्चय तिने केला आहे. या प्रणाली पाटील यशाबाबत मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभागी ठमके, विजय पाटील, प्राथमिक शिक्षण व स्पर्धा परिक्षेसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे शालेय पोषण आहार अधिक्षक अनिलकुमार महामुने, दीपक महामुने (मामा), गौतम महामुने, किशनराव ठमके, शेषेराव लढे मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, पर्यवेक्षक किशोर डांगे यांचेसह महात्मा फुले विद्यालय गोकुंदा, घोटी व सुभाषनगरचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या मातोश्री व महात्मा जोतिबा फुले विद्यालयातील शिक्षिका संगीता महामुने-पाटील यांचे तिला पाठबळ, मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment